राज्यपाल आचार्य देवव्रत म्हणाले, देश सर्व क्षेत्रात प्रगती करीत असून
स्टार्टअप्स, आत्मनिर्भर भारत अभियानामुळे भारत जागतिक पातळीवर वेगाने प्रगती करत आहे. भारत आज जगातील चौथी मोठी अर्थव्यवस्था बनला असून, तिसऱ्या क्रमांकाकडे वाटचाल करीत आहे. विकासाचा लाभ समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचत आहे. युवकांमध्ये देशाला आत्मनिर्भर, समृद्ध आणि शक्तिशाली बनविण्याची क्षमता असल्याचे सांगून राज्यपाल आचार्य देवव्रत म्हणाले युवकांनी अपयश आल्यास खचून न जाता परिश्रम, चिकाटी आणि सकारात्मक विचार करून विकसित राष्ट्र निर्माणात आपले योगदान द्यावे.
या संवाद कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांवरही राज्यपालांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या शेवटी निवड झालेल्या युवकांना प्रातिनिधिक स्वरूपात मान्यवरांच्या हस्ते किटचे वाटप करण्यात आले.
No comments:
Post a Comment