सचिव तुकाराम मुंढे म्हणाले, दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी पदसुनिश्चिती प्रक्रियेसंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. शासकीय, निमशासकीय संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था तसेच स्वायत्त संस्था आणि महामंडळांमधील मंजूर पदांचा सखोल आढावा घेऊन दिव्यांग व्यक्ती कोणत्या पदांवर कार्यक्षमतेने काम करू शकतील, हे ओळखणे आता बंधनकारक राहणार आहे. प्रत्येक मंत्रालयीन विभागात यासाठी तज्ज्ञांचा समावेश असलेली समिती स्थापन करेल.
सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Thursday, 4 December 2025
दिव्यांगांच्या पदसुनिश्चितीसाठी तज्ज्ञ समितीची पुनर्रचना
दिव्यांगांच्या पदसुनिश्चितीसाठी तज्ज्ञ समितीची पुनर्रचना
-सचिव तुकाराम मुंढे
· प्रक्रियेसाठी एकसमान कार्यपद्धती निश्चित
मुंबई, दि. ०३ : दिव्यांग व्यक्तींना शासकीय, निमशासकीय सेवेत नियुक्ती आणि पदोन्नतीमध्ये चार टक्के आरक्षणाचा कायदेशीर हक्क प्रभावीपणे मिळावा, यासाठी पदसुनिश्चिती प्रक्रियेसाठी एकसमान कार्यपद्धती (एसओपी) तयार केली आहे. पदसुनिश्चिती प्रक्रिया अधिक शास्त्रीय आणि पारदर्शक करण्याच्या हेतूने तज्ज्ञ समितीची पुनर्रचना करण्यात आली आहे. या निर्णयामुळे राज्यातील लाखो दिव्यांग उमेदवारांसाठी रोजगार, सर्व स्तरांवर समान संधी सुनिश्चित होण्यास मदत होणार असल्याचे दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांनी सांगितले.
नक्षलग्रस्त व अतिदुर्गम भागातील मानसेवी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सेवासमावेशाचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर सादर करणार -
नक्षलग्रस्त व अतिदुर्गम भागातील मानसेवी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सेवासमावेशाचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर सादर करणार
- सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर
मुंबई, दि. 03:- राज्यातील अतिदुर्गम व नक्षलग्रस्त आदिवासी जिल्ह्यांमध्ये कार्यरत मानसेवी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सेवासमावेशाचा प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळाच्या मंजुरीसाठी सादर करण्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले .
आरोग्य भवन येथे आरोग्य मंत्री आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी आरोग्य सेवा सचिव डॉ. निपुण विनायक व ई. रवींद्रन, आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, आरोग्य संचालक डॉ. नितीन अंबाडेकर, यांच्यासह आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
सार्वजनिक आरोग्य विभागात वैद्यकीय आरोग्य सेवा गट- ब (बीएएमएस) हे पद असून, या पदावर सेवा प्रवेश नियमानुसार दहा वर्षे सेवा पूर्ण झालेल्या मानसेवी वैद्यकीय अधिकारी यांना सामावून घेण्याबाबत प्रस्ताव मंत्रीमंडळासमोर सादर करण्याचे निर्देश आरोग्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या नवसंजीवनी योजनेअंतर्गत 1995 पासून राज्यात मानसेवी वैद्यकीय अधिकारी कार्यरत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
earlier a flyover was considered at this location, but due
CM Fadnavis said that earlier a flyover was considered at this location, but due to lack of space and dense traffic movement, it was not feasible. As this area is even more congested than Mohammed Ali Road Flyover, a tunnel became the only practical and safe solution. The tunnel will pass beneath nearly 700 properties, century-old heritage structures, as well as the Western and Central Railway lines. Notably, it will be dug 50 meters below Metro Line 3. CM Fadnavis described the project as an “engineering marvel”.
The project aims to be completed by December 2028, with efforts to finish it six months earlier. Renowned engineering company L&T has been entrusted with the work. After the Worli–Sewri Sea Link opens next year and the Coastal Road gets connected, residents of the western suburbs will have two routes to reach the Navi Mumbai Airport. This project will save thousands of hours for commuters and marks a historic milestone for Mumbai’s transport system, CM Fadnavis noted.
Orange Gate Tunnel Project Launched; Major Relief for Mumbai Traffic:
Orange Gate Tunnel Project Launched; Major Relief for Mumbai Traffic:
- CM Devendra Fadnavis
TBM operation for Orange Gate–Marine Drive Urban Tunnel Project inaugurated by Chief Minister and Deputy Chief Minister
Mumbai, Dec 3:Due to the Eastern Freeway, citizens can reach South Mumbai from the eastern suburbs in just 20–25 minutes. However, the onward journey would take an additional 30–45 minutes due to heavy traffic congestion. Similarly, commuters from the western suburbs and South Mumbai had to take a longer route to reach the Navi Mumbai Airport. To address these issues, the concept of the Orange Gate Tunnel was developed. This project will provide major relief to Mumbai’s traffic, informed Chief Minister Devendra Fadnavis.
विद्यार्थ्यांना जागतिक ज्ञान एका क्लिकवर उपलब्ध होत आहे. डिजिटल रीडिंग झोनमुळे
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, विद्यार्थ्यांना जागतिक ज्ञान एका क्लिकवर उपलब्ध होत आहे. डिजिटल रीडिंग झोनमुळे वाचन संस्कृतीला मोठी चालना मिळेल आणि विद्यार्थ्यांना संशोधनासाठी उपयुक्त माहिती सहज उपलब्ध होईल.
या उपक्रमात जागतिक दर्जाच्या नामांकित अशा १० हजारपेक्षा अधिक जर्नल्सचा समावेश आहे. तसेच विद्यार्थ्यांना कुठेही, कधीही अभ्यासाची सोय, ऑफलाइन डाउनलोड करण्याची सोय उपलब्ध होणार आहे. तसेच स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक अभ्यास सामग्री, चालू घडामोडी, जनरल स्टडीज साहित्य आणि परीक्षा निहाय वर्गीकृत माहिती प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे.
चंद्रपूर अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या‘डिजिटल स्मार्ट रीडिंग झोनचा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते शुभारंभ · विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक डिजिटल सुविधा उपलब्ध
चंद्रपूर अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या‘डिजिटल स्मार्ट रीडिंग झोनचा
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते शुभारंभ
· विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक डिजिटल सुविधा उपलब्ध
मुंबई, दि.३:- विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा लक्षात येऊन विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक डिजिटल शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.असे अभिनव उपक्रम महाविद्यालयांनी राबवावेत असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले. मंत्रालयात' डिजिटल स्मार्ट रीडिंग झोन’ उपक्रमाचा शुभारंभ उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते दूरदृश्यप्रणालीद्वारे करण्यात आला.
यावेळी आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके (ऑनलाइन), उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, तंत्रशिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर, महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाचे संचालक डॉ. प्रमोद नाईक, ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर, तसेच विभागातील अधिकारी, प्राचार्य, प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.
Featured post
-
नर्सिंग विद्यार्थ्यांसाठी जर्मनीत प्रशिक्षण व करिअरची सुवर्णसंधी -वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ · महाराष्ट्र-बाडेन...
-
कोण होता 'चेन्दरू मडावी'...? (विदेशी फिल्म ला ऑस्कर मिळवून देणारा जगातला एकमेव भारतीय आदिवासी मोगली चेन्दरू मडावी...) एक ...
-
टी.एन. शेषन हे भारताचे निवडणूक आयुक्त (Chief Election Commissioner) म्हणून 1990–1996 या काळात अत्यंत कठोर, निर्भीड आणि सुधारक म्हणून ओळखले ...