Wednesday, 3 December 2025

कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर काळाची गरज

 कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर काळाची गरज

- ज्येष्ठ पत्रकार सम्राट फडणीस

 

मुंबईदि. २ : माध्यमांशी  संवाद साधण्यासाठी काळानुरूप नव्या तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करणे आवश्यक आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), विविध डिजिटल अॅप्स, ‘टेक्स्ट-टू-व्हिडिओ’ प्लॅटफॉर्मचॅट जीपीटीसारखी साधने वापरून प्रसिद्धी साहित्य तयार केल्यास कामाचा वेग आणि गुणवत्ता दोन्ही वाढू शकते असे ज्येष्ठ पत्रकार सम्राट फडणीस यांनी सांगितले.

            माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार सम्राट फडणीस बोलत होते. यावेळी संचालक (माहिती)(वृत्त व जनसंपर्क) गोविंद अहंकारीसामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव अजय भोसलेउपसंचालक (वृत्त) वर्षा आंधळेतसेच अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

सम्राट फडणीस म्हणालेआज अनेक इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये डिजिटल अँकर्सचा वापर वाढला असून त्यामुळे मनुष्यबळाची गरज कमी होतेअचूकता वाढते आणि वेळेची बचत होते. सोशल मीडियावर वाढत्या प्रमाणात दिशाभूल करणारी माहिती पसरत असल्याने पुढील दहा वर्षांत फॅक्ट-चेकिंगची गरज आणखी वाढेलयासाठी आधुनिक विश्लेषण प्रणालीडिजिटल ट्रॅकिंग तंत्रज्ञान यांचा विभागाने सक्षमपणे वापर करणे गरजेचे आहे.

पुण्यातील मालधक्का चौकातील जागेबाबत प्रस्ताव सादर करावा

 पुण्यातील मालधक्का चौकातील जागेबाबत प्रस्ताव सादर करावा

- उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

 

मुंबईदि. २ : पुणे स्टेशनलगत मालधक्का चौकातील महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) ताब्यातील जागा शासनाकडे हस्तांतरित करून ती जनहितासाठी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले.

विधानभवन येथे झालेल्या बैठकीस अपर मुख्य सचिव (नगरविकास) असीम गुप्तावैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव धीरजकुमारएमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाडवैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. अजय चंदनवालेमहाव्यवस्थापक श्रीमंत पाटोळेतसेच पुणे जिल्हाधिकारी कार्यालय व पुणे महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे शैलेंद्र मोरेदीपक गायकवाडनिखिल दुर्गाईजीवन घोंगडेआनंद घेडेनीता अडसुळेस्वाती गायकवाडअर्चना केदारी, संदीप शिंदेमिलिंद अहिरेसुधीर कुरूमकर उपस्थित होते.

उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे म्हणाल्या, संबंधित जागा सार्वजनिक उपयोगासाठी उपलब्ध करुन देण्यासंदर्भातील प्रस्ताव सादर करण्यात यावा. यासंदर्भातील सर्व मुद्यांची दखल घेवून आवश्यक कार्यवाही पूर्ण करण्याचे निर्देशही उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी दिले.

0000

Tuesday, 2 December 2025

राज्यात त्रिस्तरीय समग्र कर्करोग उपचार सेवा (एल 1,एल 2,एल 3) रुग्णालये

 राज्यात त्रिस्तरीय समग्र कर्करोग उपचार सेवा (एल 1,एल 2,एल 3) रुग्णालये

 

    राज्यात त्रिस्तरीय समग्र कर्करोग उपचार सेवा उपलब्ध होणार आहेत. L1 मध्ये टाटा स्मारक रूग्णालय ही कर्करोगाकरिता शिखर संस्था म्हणून काम करणार आहे. एल 2  या स्तरावरती कायमस्वरूपी संपूर्ण कर्करोग शिक्षण व सेवा असेल यामध्ये छत्रपती संभाजीनगरचंद्रपूर,नागपूर,मुंबई (जे.जे.),कोल्हापूर,पुणे (बैरामजी जिजीभॉय शासकीय महाविद्यालय)नांदेड येथील सात शासकीय महाविद्यालयांशी संलग्नित रूग्णालयेनाशिक व अमरावती येथील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अखत्यारितील दोन संदर्भ सेवा रूग्णालयांचा यामध्ये  समावेश आहे. अशी नऊ केंद्रे एल 2 मध्ये समाविष्ट आहेत.  एल 3 यास्तरामध्ये मध्ये कर्करोग निदान आणि डे-केअर रेडिओथेरिपी व किमोथेरिपी युनिटस यामध्ये कार्यरत असणार आहेत. अंबाजोगाई (बीड)यवतमाळमुंबई(कामा व आल्ब्लेस रूग्णालय)साताराबारामतीजळगाव व रत्नागिरी येथील शासकीय महाविद्यालयांशी संलग्नित सात रूग्णालयेठाणे जिल्हा रूग्णालय संलग्नित व शिर्डी संस्थानचे रूग्णालय अशी एकूण नऊ केंद्रे एल 3 म्हणून कार्यरत होतील.एल 2 स्तरामध्ये व एल 3 स्तरामध्ये एकूण 18 रूग्णालये कार्यरत असतील. एल 3 स्तरावरील कर्करोग रूग्णालयांचे बांधकाम शासनामार्फत होवून ही रूग्णालये सार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावर उभारण्यात येतील मात्र या रूग्णालयावर शासनाचे सर्व नियंत्रण असेल.                                 

राज्यातील जनतेस सर्वसमावेशक कर्करोग सेवा उपलब्ध होणार · राज्यात त्रिस्तरीय समग्र कर्करोग उपचार सेवा होणार उपलब्ध · शिखर संस्था म्हणून टाटा स्मारक रूग्णालय काम पाहणार pl share

 राज्यातील जनतेस सर्वसमावेशक कर्करोग सेवा उपलब्ध होणार

·         राज्यात त्रिस्तरीय समग्र कर्करोग उपचार सेवा होणार उपलब्ध

·         शिखर संस्था म्हणून टाटा स्मारक रूग्णालय काम पाहणार

 

मुंबई,दि.2 : कर्करोगाचे वाढते प्रमाण व कर्करोग उपचाराचे गांभीर्य विचारात घेता राज्यातील जनतेस सर्वसमावेशक कर्करोग सेवा  राज्य शासनाकडून उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. केंद्र शासनाच्या आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्रालयाने दिलेल्या सूचनेनुसार 'आसाम कॅन्सर केअर मॉडेलच्याधर्तीवर  राज्यात त्रिस्तरीय समग्र कर्करोग उपचार सेवा एल 1,एल 2,एल 3 उपलब्ध होणार आहेत. एल 1 या स्तरामध्ये टाटा स्मारक रूग्णालय ही कर्करोगाकरिता शिखर संस्था म्हणून काम करणार आहे. एल 2एल 3 या स्तरावर असणाऱ्या या रूग्णालयात कर्करोगासंबधित प्रशिक्षण मनुष्यबळ निर्माण करणे तसेच या आजाराविषयी संशोधन कार्यात प्रगती करण्यात येणार आहे. वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाने याबाबत धोरण निश्चीत केले आहे.जिल्हास्तरावर सुरू होणाऱ्या उपचारामुळे अनेक कर्करोगग्रस्त रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांचा वेळ वाचणार आहे आणि स्थानिक जिल्ह्यातच आरोग्य सुविधा उपलब्ध होणार असल्याने या रूग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे.

जागतिक मृद दिन विशेष लेख चला माती परीक्षण करुया आपली जमीन समृद्ध करुया!

  जागतिक मृद दिन विशेष लेख

 

चला माती परक्षण करुया

 आपली जमीन समृद्ध करुया!

 

जागतिक माती दिन अर्थात जागतिक मृदा दिन दरवर्षी 5 डिसेंबर रोजी  साजरा केला जातोमातीचे संवर्धनसुपिकता तिच्या महत्त्वाविषयी जागरूकता निर्माण व्हावीहा या दिवासाचा उद्देश आहेानवास जगण्यासाठी अन्नाची आवश्यता आहेती गरज मातीतून पिकणाऱ्या अन्न धान्यामुळे पूर्ण होतेजमिनीमधील मातीचे परिक्षण करुन योग्य द्धतीने उत्पादन घेतले तर पिकांचे उत्पादन वाढेलशेतातील माती निरोगी असेल तर समृध्द शेती होईलत्यासाठी मातीचे परक्षण करुन समृध्दता वाढविण्यावर भर दिला  जात आहेत्यामुळे तुम्ही जर शेतकरी आहात तुमच्याकडे जमीन आहेतर तुम्ही माती परीक्षण केले पाहिजे.

मातीचे महत्त्व

अन्नवस्त्रनिवारा या मुलभूत गरजा माती शिवाय पुर्ण होऊ शकत नाहीमाती विना शेती हो शकत नाहीत्यामुळे निरोगी माती ही समृद्ध शेतीसाठी अत्यंत आवश्क आहेमानवाने विज्ञान  तंत्रज्ञानातून कितीही

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ स्टॉलद्वारे पर्यटन स्थळांचे दर्शन

 महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ स्टॉलद्वारे पर्यटन स्थळांचे दर्शन

या महोत्सवात महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचा (एमटीबीसीविशेष माहिती स्टॉल देखील असणार आहे. या स्टॉलद्वारे महाराष्ट्रातील ऐतिहासिकधार्मिक आणि नैसर्गिक पर्यटन स्थळांची माहिती देण्यात येईल. पर्यटन स्थळांच्या माहितीपत्रकांचे वितरण करून महाराष्ट्राच्या पर्यटनाला अधिकाधिक चालना देण्याचा मानस असल्याचे निवासी आयुक्त श्रीमती विमला यांनी यावेळी सांगितले.

महाराष्ट्राच्या अस्सल चवीचा संस्कृतीचापर्यटनाचा अनुभव घेण्यासाठी दिल्लीतील नागरिकांनी या तीन दिवसीय खाद्य महोत्सवाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावेअसे आवाहन निवासी आयुक्त श्रीमती विमला यांनी केले आहे.

००००

महोत्सव सांस्कृतिक कार्यक्रम आणि बालकांसाठी विशेष आकर्षण

 सांस्कृतिक कार्यक्रम आणि बालकांसाठी विशेष आकर्षण

हा महोत्सव केवळ खाद्यपदार्थांपुरता मर्यादित नसूनमहाराष्ट्राची समृद्ध कला आणि संस्कृती दर्शवणारे विविध सांस्कृतिक कार्यक्रमही आयोजित करण्यात आले आहेत.लहान मुलांसाठी खास आकर्षण म्हणून 'करमणूकीचे'चे खेळ आणि जादूचे प्रयोग याचे आयोजन करण्यात आले. ज्यामुळे कुटुंबातील सर्व सदस्यांना या महोत्सवाचा आनंद घेता येईल.

Featured post

Lakshvedhi