कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर काळाची गरज
- ज्येष्ठ पत्रकार सम्राट फडणीस
मुंबई, दि. २ : माध्यमांशी संवाद साधण्यासाठी काळानुरूप नव्या तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करणे आवश्यक आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), विविध डिजिटल अॅप्स, ‘टेक्स्ट-टू-व्हिडिओ’ प्लॅटफॉर्म, चॅट जीपीटीसारखी साधने वापरून प्रसिद्धी साहित्य तयार केल्यास कामाचा वेग आणि गुणवत्ता दोन्ही वाढू शकते असे ज्येष्ठ पत्रकार सम्राट फडणीस यांनी सांगितले.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार सम्राट फडणीस बोलत होते. यावेळी संचालक (माहिती)(वृत्त व जनसंपर्क) गोविंद अहंकारी, सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव अजय भोसले, उपसंचालक (वृत्त) वर्षा आंधळे, तसेच अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
सम्राट फडणीस म्हणाले, आज अनेक इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये डिजिटल अँकर्सचा वापर वाढला असून त्यामुळे मनुष्यबळाची गरज कमी होते, अचूकता वाढते आणि वेळेची बचत होते. सोशल मीडियावर वाढत्या प्रमाणात दिशाभूल करणारी माहिती पसरत असल्याने पुढील दहा वर्षांत फॅक्ट-चेकिंगची गरज आणखी वाढेल, यासाठी आधुनिक विश्लेषण प्रणाली, डिजिटल ट्रॅकिंग तंत्रज्ञान यांचा विभागाने सक्षमपणे वापर करणे गरजेचे आहे.
No comments:
Post a Comment