Wednesday, 3 December 2025

पुण्यातील मालधक्का चौकातील जागेबाबत प्रस्ताव सादर करावा

 पुण्यातील मालधक्का चौकातील जागेबाबत प्रस्ताव सादर करावा

- उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

 

मुंबईदि. २ : पुणे स्टेशनलगत मालधक्का चौकातील महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) ताब्यातील जागा शासनाकडे हस्तांतरित करून ती जनहितासाठी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले.

विधानभवन येथे झालेल्या बैठकीस अपर मुख्य सचिव (नगरविकास) असीम गुप्तावैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव धीरजकुमारएमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाडवैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. अजय चंदनवालेमहाव्यवस्थापक श्रीमंत पाटोळेतसेच पुणे जिल्हाधिकारी कार्यालय व पुणे महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे शैलेंद्र मोरेदीपक गायकवाडनिखिल दुर्गाईजीवन घोंगडेआनंद घेडेनीता अडसुळेस्वाती गायकवाडअर्चना केदारी, संदीप शिंदेमिलिंद अहिरेसुधीर कुरूमकर उपस्थित होते.

उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे म्हणाल्या, संबंधित जागा सार्वजनिक उपयोगासाठी उपलब्ध करुन देण्यासंदर्भातील प्रस्ताव सादर करण्यात यावा. यासंदर्भातील सर्व मुद्यांची दखल घेवून आवश्यक कार्यवाही पूर्ण करण्याचे निर्देशही उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी दिले.

0000

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi