राज्यात त्रिस्तरीय समग्र कर्करोग उपचार सेवा (एल 1,एल 2,एल 3) रुग्णालये
राज्यात त्रिस्तरीय समग्र कर्करोग उपचार सेवा उपलब्ध होणार आहेत. L1 मध्ये टाटा स्मारक रूग्णालय ही कर्करोगाकरिता शिखर संस्था म्हणून काम करणार आहे. एल 2 या स्तरावरती कायमस्वरूपी संपूर्ण कर्करोग शिक्षण व सेवा असेल यामध्ये छत्रपती संभाजीनगर, चंद्रपूर,नागपूर,मुंबई (जे.जे.),कोल्हापूर,पुणे (बैरामजी जिजीभॉय शासकीय महाविद्यालय), नांदेड येथील सात शासकीय महाविद्यालयांशी संलग्नित रूग्णालये, नाशिक व अमरावती येथील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अखत्यारितील दोन संदर्भ सेवा रूग्णालयांचा यामध्ये समावेश आहे. अशी नऊ केंद्रे एल 2 मध्ये समाविष्ट आहेत. एल 3 यास्तरामध्ये मध्ये कर्करोग निदान आणि डे-केअर रेडिओथेरिपी व किमोथेरिपी युनिटस यामध्ये कार्यरत असणार आहेत. अंबाजोगाई (बीड), यवतमाळ, मुंबई(कामा व आल्ब्लेस रूग्णालय), सातारा, बारामती, जळगाव व रत्नागिरी येथील शासकीय महाविद्यालयांशी संलग्नित सात रूग्णालये, ठाणे जिल्हा रूग्णालय संलग्नित व शिर्डी संस्थानचे रूग्णालय अशी एकूण नऊ केंद्रे एल 3 म्हणून कार्यरत होतील.एल 2 स्तरामध्ये व एल 3 स्तरामध्ये एकूण 18 रूग्णालये कार्यरत असतील. एल 3 स्तरावरील कर्करोग रूग्णालयांचे बांधकाम शासनामार्फत होवून ही रूग्णालये सार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावर उभारण्यात येतील मात्र या रूग्णालयावर शासनाचे सर्व नियंत्रण असेल.
No comments:
Post a Comment