महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ स्टॉलद्वारे पर्यटन स्थळांचे दर्शन
या महोत्सवात महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचा (एमटीबीसी) विशेष माहिती स्टॉल देखील असणार आहे. या स्टॉलद्वारे महाराष्ट्रातील ऐतिहासिक, धार्मिक आणि नैसर्गिक पर्यटन स्थळांची माहिती देण्यात येईल. पर्यटन स्थळांच्या माहितीपत्रकांचे वितरण करून महाराष्ट्राच्या पर्यटनाला अधिकाधिक चालना देण्याचा मानस असल्याचे निवासी आयुक्त श्रीमती विमला यांनी यावेळी सांगितले.
महाराष्ट्राच्या अस्सल चवीचा संस्कृतीचा, पर्यटनाचा अनुभव घेण्यासाठी दिल्लीतील नागरिकांनी या तीन दिवसीय खाद्य महोत्सवाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन निवासी आयुक्त श्रीमती विमला यांनी केले आहे.
००००
No comments:
Post a Comment