भारताच्या न्यायप्रशासनात ऐतिहासिक बदल घडवणाऱ्या नवीन फौजदारी कायद्यांवर आधारित प्रात्यक्षिक प्रदर्शनाने नागरिक, विधिविद्यार्थी, पोलीस अधिकारी तसेच न्यायव्यवस्थेतील विविध घटकांना नव्या कायद्यांचा प्रत्यक्ष अनुभव देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले. न्यायसंस्थेच्या सर्व स्तरांवर पारदर्शकता, गतीमानता आणि नागरिकाभिमुखता वाढवण्याच्या दृष्टीने तयार करण्यात आलेल्या या नव्या कायद्यांचे तत्त्वज्ञान, अंगभूत प्रक्रिया आणि त्यांचा प्रत्यक्ष वापर या प्रदर्शनामधून प्रभावीपणे उलगडण्यात आला.
सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Tuesday, 2 December 2025
भारताच्या न्यायप्रशासनात ऐतिहासिक बदल
भारताच्या न्यायप्रशासनात ऐतिहासिक बदल घडवणाऱ्या नवीन फौजदारी कायद्यांवर आधारित प्रात्यक्षिक प्रदर्शनाने नागरिक, विधिविद्यार्थी, पोलीस अधिकारी तसेच न्यायव्यवस्थेतील विविध घटकांना नव्या कायद्यांचा प्रत्यक्ष अनुभव देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले. न्यायसंस्थेच्या सर्व स्तरांवर पारदर्शकता, गतीमानता आणि नागरिकाभिमुखता वाढवण्याच्या दृष्टीने तयार करण्यात आलेल्या या नव्या कायद्यांचे तत्त्वज्ञान, अंगभूत प्रक्रिया आणि त्यांचा प्रत्यक्ष वापर या प्रदर्शनामधून प्रभावीपणे उलगडण्यात आला.
नवीन फौजदारी कायद्यांचे प्रदर्शनातील प्रात्याक्षिकाद्वारे ज्ञान..!
नवीन फौजदारी कायद्यांचे प्रदर्शनातील प्रात्याक्षिकाद्वारे ज्ञान..!
देशात 1 जुलै 2024 पासून भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता व भारतीय पुरावा कायदा हे तीन नवीन कायदे लागू झाले आहेत. या नवीन फौजदारी कायद्यांच्या पार्श्वभूमीवर, नागरिकांना गुन्हा घडल्यापासून अंतिम शिक्षा होईपर्यंतची संपूर्ण प्रक्रिया समजावी, यासाठी आयोजित करण्यात आलेल्या प्रदर्शनात प्रात्यक्षिक विशेष आकर्षण ठरले. या प्रात्यक्षिक प्रदर्शनाने गुन्हा नोंदणीपासून शिक्षा आणि पुनर्वसनापर्यंतचा संपूर्ण न्यायप्रक्रियेचा प्रवास अत्यंत स्पष्ट, जिवंत आणि लोकशिक्षणात्मक स्वरूपात मांडला आहे. नवीन फौजदारी कायद्यांमुळे वैज्ञानिक तपास, तत्काळ प्रतिसाद, डिजिटल पुरावे, कठोर शिक्षा आणि पीडित केंद्रित न्याय या तत्त्वांना प्राधान्य मिळाले आहे. हे प्रदर्शन जनजागृतीचा एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरले आहे. प्रदर्शनात 25 ते 30 हजार नागरिकांनी भेट देऊन या कायद्यांसंदर्भातील ज्ञान अवगत केले.
महापरिनिर्वाणदिनाच्या पूर्वतयारीचा कोकण विभागीय आयुक्तांनी घेतला आढावा
महापरिनिर्वाणदिनाच्या पूर्वतयारीचा
कोकण विभागीय आयुक्तांनी घेतला आढावा
मुंबई दि. १ :- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी येथे लाखो अनुयायी अभिवादन करण्यासाठी येत असतात. या अनुयायांना पुरविण्यात येणाऱ्या आवश्यक सोयी-सुविधांच्या पूर्वतयारीचा आढावा कोकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी घेतला.
कोकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त करावयाच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने आढावा बैठक मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे घेण्यात आली.
बैठकीस मुंबई शहर जिल्हाधिकारी आंचल गोयल, कोकण विभाग अपर आयुक्त फरोग मुकादम, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे यांच्यासह विविध संघटनांचे प्रतिनिधी तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी म्हणाले, महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रत्येक विभागाने आपल्याला दिलेली जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडावी. चैत्यभूमी परिसरात वाहतूक कोंडी होऊ नये या दृष्टीकोनातून पोलीस बंदोबस्त याबाबत काटेकोर नियोजन करण्यात यावे, असे निर्देश दिले.चैत्यभूमी परिसरातील स्वच्छता, साफ- सफाई याबाबत संबंधित यंत्रणांनी काटेकोरपणे जबाबदारी पार पाडावी असेही निर्देश त्यांनी यावेळी दिले.
बैठकीत नियंत्रण कक्ष, आरोग्यसेवा, रुग्णवाहिका, रेल्वे व्यवस्था, बेस्ट आणि एसटी परिवहन व्यवस्था, पिण्याचे पाणी, भोजन व्यवस्था, सीसीटीव्ही देखरेख, पोलीस बंदोबस्त तसेच वाहतूक नियोजन या संदर्भातही विभागीय आयुक्तांनी निर्देश दिले.
बैठकीस कोकण विभागातील सर्व जिल्हाधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.
000000
नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकीच्या काही मतदारसंघातील सार्वजनिक सुट्टी रद्द
नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकीच्या काही मतदारसंघातील सार्वजनिक सुट्टी रद्द
मुंबई, दि. 1 :- नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 2 डिसेंबर 2025 रोजी मतदान होत आहे. यापूर्वी मतदानाच्या दिवशीची जाहीर केलेली सुट्टी काही मतदारसंघात न्यायालयीन अपील दाखल झाल्यामुळे केवळ त्या मतदारसंघापुरती रद्द करण्यात आली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी 2 डिसेंबर 2025 रोजी 16 जिल्ह्यांतील नगरपरिषद / नगरपंचायतीमध्ये सार्वजनिक सुट्टी रद्द करण्यात आली आहे. यात ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ, अहिल्यानगर (कोपरगाव, देवळाली प्रवरा, पाथर्डी, नेवासा), पुणे (बारामती, फुरसुंगी-उरुळी देवाची), सोलापूर (अनगर, मंगळवेढा), सातारा (महाबळेश्वर, फलटण), छत्रपती संभाजीनगर (फुलंब्री), नांदेड (मुखेड, धर्माबाद), लातूर (निलंगा, रेणापूर), हिंगोली (वसमत), अमरावती (अंजनगावसूर्जी), अकोला (बाळापूर), यवतमाळ (यवतमाळ), वाशिम (वाशिम), बुलढाणा (देऊळगावराजा), वर्धा (देवळी) आणि चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस यांचा समावेश आहे, असे सामान्य प्रशासन विभागाने कळविले आहे.
0000
भारत–इथिओपिया आरोग्य सहकार्य अधिक
प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालक तसेच महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अजय चंदनवाले आणि हाफकिन जैव औषध निर्माण महामंडळाचे महाव्यवस्थापकीय संचालक सुनील महेंद्रकर यांच्या हस्ते झाले. डॉ. चंदनवाले यांनी दोन्ही देशांमध्ये संयुक्त संशोधन आणि नावीन्यपूर्ण प्रकल्प राबविण्याबाबत प्रस्ताव मांडला. महेंद्रकर यांनी या सहकार्यामुळे आरोग्य क्षेत्रात नवीन संधी उपलब्ध होतील, असे नमूद केले.
शिष्टमंडळाने परळ येथील ओरल पोलिओ लस उत्पादन केंद्राला भेट देऊन कार्यपद्धतीची माहिती घेतली. ९ डिसेंबर पर्यंत हा उपक्रम असून प्रशिक्षणादरम्यान विषाणूशास्त्र आणि सेल बायोलॉजी विभागाच्या सहायक संचालिका डॉ. उषा पद्मनाभन यांच्या नेतृत्वाखालील तज्ज्ञ पथक शिष्टमंडळाला मार्गदर्शन करणार आहे.
भारत–इथिओपिया आरोग्य सहकार्य अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने हे पाऊल अत्यंत महत्त्वपूर्ण ठरत असून स्थिरता, प्रगती आणि परस्पर विकासाच्या उद्दिष्टांना अधिक बळ मिळणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
०००००
हाफकिन मध्ये इथिओपियन शिष्टमंडळाला लस विश्लेषण प्रशिक्षण
हाफकिन मध्ये इथिओपियन शिष्टमंडळाला लस विश्लेषण प्रशिक्षण
मुंबई, दि. १ :- संयुक्त राष्ट्रांच्या प्रकल्प सेवा कार्यालयाने (यूएनओपीएस) मेसर्स टेकइन्व्हेन्शन लाइफकेअर मार्फत इथिओपियातील सार्वजनिक आरोग्य अधिकारी आणि लस तज्ज्ञांचे शिष्टमंडळ परळ येथील हाफकिन शिक्षण, संशोधन आणि चाचणी संस्थेला लस विश्लेषणावरील विशेष प्रशिक्षणाकरिता भेट दिली. या उपक्रमाचा उद्देश दोन्ही देशांमधील आरोग्य क्षेत्रातील द्विपक्षीय सहकार्य वृद्धिंगत करणे हा आहे.
इथिओपियाच्या सार्वजनिक आरोग्य मंत्रालयाचे वरिष्ठ सल्लागार हैलू अशेनाफी डेनिसे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाचे स्वागत हाफकिन संस्थेच्या संचालिका डॉ. सुवर्णा खरात यांनी केले. त्यांनी संस्थेतील संशोधन उपक्रम, नवोन्मेषी प्रकल्प आणि भविष्यातील संयुक्त सहकार्याच्या संधींबाबत सविस्तर माहिती दिली.
Featured post
-
नर्सिंग विद्यार्थ्यांसाठी जर्मनीत प्रशिक्षण व करिअरची सुवर्णसंधी -वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ · महाराष्ट्र-बाडेन...
-
टी.एन. शेषन हे भारताचे निवडणूक आयुक्त (Chief Election Commissioner) म्हणून 1990–1996 या काळात अत्यंत कठोर, निर्भीड आणि सुधारक म्हणून ओळखले ...
-
कोण होता 'चेन्दरू मडावी'...? (विदेशी फिल्म ला ऑस्कर मिळवून देणारा जगातला एकमेव भारतीय आदिवासी मोगली चेन्दरू मडावी...) एक ...