Thursday, 20 November 2025

राज्य कौशल्य विद्यापीठासाठी ३३९ पदांच्या निर्मितीस मान्यता

 राज्य कौशल्य विद्यापीठासाठी ३३९ पदांच्या निर्मितीस मान्यता

 

रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठासाठी २३२ शिक्षक आणि १०७ शिक्षकेतर अशा एकूण ३३९ पदनिर्मितीस मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. 

            राज्यातील युवक युवतींना एकात्मिक आणि समग्र स्वरूपाचे कौशल्य प्रशिक्षण देण्यासाठी कौशल्य विद्यापीठ स्थापन करण्यात आले आहे. युवकांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील कौशल्याधारित उच्च शिक्षणाद्वारे रोजगार व स्वयंरोजगारांच्या संधी निर्माण करण्याचे विद्यापीठाचे उद्दिष्ट आहे.  या विद्यापीठाचे कामकाज पूर्ण क्षमतेने होण्यासाठी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची आवश्यकता होती. या सर्व पदांना मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

पदांचा तपशील पुढीलप्रमाणे :- शिक्षक पदे- प्राध्यापक-३४सहयोगी प्राध्यापक-६०सहाय्यक प्राध्यापक-१३८ एकूण २३२.

            शिक्षकेतर पदे – उप कुलसचिव – सहाय्यक कुलसचिव – कक्ष अधिकारी-१४सहाय्यक कक्ष अधिकारी – वरिष्ठ लेखापाल – लेखापाल-१२माहिती तंत्रज्ञान अधिकारी तथा सिनियर प्रोग्रामर-१वरिष्ठ ग्रंथालय सहायक-१कनिष्ठ ग्रंथालय सहायक-२कनिष्ठ लिपिक-८वरिष्ठ लिपिक-८कनिष्ठ सहायक (सर्वसामान्य)-१कनिष्ठ सहायक (वित्त)-१तंत्रसहायक-८प्रयोगशाळा सहायक-२४ एकूण १०७.

००००

निष्क्रिय मालमत्ता शोधण्यासाठी राज्यभर शिबिरांचे आयोजन ; मुंबई उपनगरात 21 नोव्हेंबरला मेळावा

 निष्क्रिय मालमत्ता शोधण्यासाठी राज्यभर शिबिरांचे आयोजन ;

 मुंबई उपनगरात 21 नोव्हेंबरला मेळावा

 

मुंबईदि. १९ : वित्तीय सेवा विभागअर्थ मंत्रालयनवी दिल्ली यांच्या सल्ल्यानुसार राज्यस्तरीय बँकर्स समिती (एसएलबीसीमहाराष्ट्र व जिल्हा अग्रणी बँकेतर्फे राज्यात हक्क न सांगितलेल्या मालमत्तेचा निपटारा या उपक्रमांतर्गत शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाचा उद्देश विविध बँका व वित्तीय संस्थांमधील दीर्घकाळापासून निष्क्रिय ठेवीशेअर्सलाभांशविमा पॉलिसीभविष्य निर्वाह निधी (पीएफयांसारख्या मालमत्तेबाबत जनजागृती करणे आणि योग्य हक्कदारांना माहिती उपलब्ध करून देणे हा आहे.

 

मुंबई उपनगर जिल्ह्यातील शिबिराचे आयोजन 21 नोव्हेंबर 2025 रोजी करण्यात येणार असूनहा मेळावा उत्तर भारतीय संघटीचर्स कॉलनीच्या मागेवांद्रे (पूर्व)मुंबई येथे सकाळी 10.00 ते दुपारी 2.00 या वेळेत होणार आहे.

 

शिबिरादरम्यान नागरिकांना निष्क्रिय खात्यांची माहितीदाव्याची प्रक्रियाआवश्यक कागदपत्रांबाबत मार्गदर्शनतसेच संबंधित बँक अधिकाऱ्यांशी थेट संवादाची सुविधा उपलब्ध होणार आहे. याशिवाय ऑनलाइन पोर्टलद्वारे मालमत्तेची तपासणी करण्यास मदत उपलब्ध करून दिली जाणार आहे.

 

राज्यस्तरीय बँकर्स समितीने नागरिकांना आवाहन केले आहे कीया शिबिरात सहभाग घेऊन स्वतःची किंवा कुटुंबीयांच्या निष्क्रिय ठेवी व वित्तीय मालमत्ता तपासून आवश्यक दावा सादर करावा. वरिष्ठ बँक अधिकारीजिल्हा प्रशासनाचे प्रतिनिधी आणि संबंधित संस्थांचे अधिकारी या शिबिरात उपस्थित राहणार आहेत.

००००

मौजे कोलशेत येथील जमीन प्रकरणी अहवाल सादर करावा

 मौजे कोलशेत येथील जमीन प्रकरणी अहवाल सादर करावा

-विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे

 

मुंबई, दि. 19 : ठाण्यातील मौजे कोलशेत येथील विवादित जमीन प्रकरणी पाहणी करुन सविस्तर अहवाल आठ दिवसांत सादर करण्याचे निर्देश विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी दिले.

 

या बैठकीस महसूल विभागाचे उपसचिव महेश वरूडकरठाणे उपविभागीय अधिकारी  उर्मिला पाटीलनायब तहसीलदार दिनेश पैठणकर, संबंधित अर्जदार तसेच विकासक उपस्थित होते.

विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे म्हणाले, मौजे कोलशेत येथील संबंधित जमीन प्रकरणी प्रत्यक्ष स्थळ पाहणी करुन सविस्तर अहवाल आठ दिवसांत सादर करण्यात यावा.


अकोला व यवतमाळ येथील सुपर स्पेशालिटी रुग्णालये तातडीने सुरू करा

 अकोला व यवतमाळ येथील सुपर स्पेशालिटी रुग्णालये तातडीने सुरू करा

-विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे

 

मुंबईदि. १९ : वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागांतर्गत अकोला व यवतमाळ येथील सुपर स्पेशालिटी रुग्णालये खासगी भागीदारी (पीपीपीतत्वावर तातडीने सुरू करण्याचे निर्देश विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी दिले.

विधानभवनात वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागांतर्गत लातूरअकोलाछत्रपती संभाजीनगर आणि यवतमाळ येथील चार सुपर स्पेशालिटी रुग्णालये खासगी भागीदारी धोरणानुसार सुरू करण्याबाबत आढावा बैठक झाली. बैठकीस वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव धीरजकुमारवैद्यकीय शिक्षण व आयुष विभागाचे आयुक्त अनिल भंडारी तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

उपाध्यक्ष अण्णा बनसोडे म्हणाले, अकोला व यवतमाळ येथील सुपर स्पेशालिटी रुग्णालये तात्काळ सुरू करण्यात यावीत. छत्रपती संभाजीनगर व लातूर सुपर स्पेशालिटी रुग्णालयासंदर्भातील कार्यवाहीही तातडीने  करण्याचे निर्देश उपाध्यक्ष श्री. बनसोडे यांनी दिले.

0000

उद्योग समूहांकडे असलेला अनुभव या उपक्रमामध्ये उपयोगी पडणार

    कौशल्य मंत्री लोढा म्हणाले कीउद्योग समूहांकडे असलेला अनुभव या उपक्रमामध्ये उपयोगी पडणार आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षण काळातच उद्योग समुहांनी त्यांच्या आवश्यकतेनुसार प्रशिक्षण दिले तर यासाठी लागणारा वेळ आणि खर्च वाचेल. उद्योग समूहांना त्यांच्या गरजेनुसार विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देता यावेयासाठी आयटीआय परिसरात स्वतंत्र जागा उपलब्ध करुन दिली जाईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र बुलेट ट्रेनच्या वेगाने पुढे जात आहे. म्हणूनच महाराष्ट्रात विदेशी गुंतवणूक मोठ्या प्रमाणात येत आहे. उद्योगांसाठी महाराष्ट्रात पूरक वातावरण आहे. कुशल मनुष्यबळाच्या शोधात  उद्योग समूहांचा वेळ आणि पैसा दोन्ही खर्च होतो. शासनासोबत भागीदारी केल्यास उद्योग समूहांची कुशल मनुष्यबळाची गरज पूर्ण होईल आणि रोजगार निर्मितीही होईलअसेही लोढा यांनी सांगितले.

‘आयटीआय’च्या राज्यभरात मोठ्या पायाभूत सुविधा आहेत. राज्याच्या मध्यवर्ती शहरी भागात, औद्योगिक भागात तसेच तालुका स्तरावरही

 कौशल्य मंत्री लोढा म्हणाले की‘आयटीआय’च्या राज्यभरात मोठ्या पायाभूत सुविधा आहेत. राज्याच्या मध्यवर्ती शहरी भागातऔद्योगिक भागात तसेच तालुका स्तरावरही आयटीआयने विद्यार्थ्यांसाठी सर्व सुविधा उभारलेल्या आहेत. उद्योगांनी शासनाशी भागीदारी केल्यास त्यांना संबंधित ‘आयटीआय’मध्ये त्यांना आवश्यक असलेल्या मनुष्यबळानुसार अतिरिक्त अभ्यासक्रम शिकविता येईल. त्याकरिता संबंधित उद्योग समुहाला कार्यालयासाठी अथवा सेवा केंद्रासाठी लागणारी जागा त्याच ‘आयटीआय’मध्ये उपलब्ध करुन दिली जाईल. दिवसभरात विद्यार्थ्यांच्या नियमित अभ्यासक्रमानंतर सायंकाळी उद्योग समूहास त्यांना आवश्यक असलेला अभ्यासक्रम स्वतंत्ररित्या विद्यार्थ्यांना शिकविता येईल. याशिवाय काही अल्प काळाचे अभ्यासक्रमही येथे शिकविता येतील असेही कौशल्यमंत्री लोढा यांनी सांगितले.

कुशल व रोजगारक्षम मनुष्यबळासाठी उद्योग क्षेत्राच्या गरजेनुसार नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम शिकविणार

 कुशल व रोजगारक्षम मनुष्यबळासाठी

उद्योग क्षेत्राच्या गरजेनुसार नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम शिकविणार 

-         कौशल्य,रोजगारउद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा

 

    मुंबई, दि. १९ : राज्य शासनाकडे ‘आयटीआय’च्या माध्यमातून उपलब्ध असलेल्या पायाभूत सुविधाउद्योग क्षेत्रातील ज्ञानअनुभव या सहभागातून कुशल व रोजगारक्षम मनुष्यबळ निर्माण होईल. उद्योग समूहांना त्यांच्या गरजेनुसार विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देता यावेयासाठी कौशल्य विभाग प्रयत्नशील राहील असे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सांगितले.

            सह्याद्री अतिथीगृह येथे पीपीपी मॉडेल बाबत विविध उद्योजकांशी संवाद साधताना कौशल्य,रोजगारउद्योजकता व नाविन्यता मंत्री  मंगल प्रभात लोढा बोलत होते. यावेळी  कौशल्य विकास विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा वर्मामित्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रविण परदेशीराज्य नाविन्यता सोसायटीचे कौशल्य विकास आयुक्त लहुराज माळी,व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या संचालक माधवी सरदेशमुखरतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू प्रा.डॉ.अपूर्वा पालकर,राज्य नाविन्यता सोसायटीचे सहसचिव श्रीकांत पाटील उद्योग क्षेत्रातील मान्यवरकौशल्य विकास विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Featured post

Lakshvedhi