Wednesday, 19 November 2025

संकल्पना आधारित आयकॉनिक शहर विकासासाठी धोरण जाहीर

 संकल्पना आधारित आयकॉनिक शहर विकासासाठी धोरण जाहीर

 

सिडकोसह राज्यातील विविध प्राधिकऱणांकडील लॅँड बँकेचा सुयोग्य वापर व्हावा यासाठी संकल्पना आधारित- आयकॉनिक शहर विकासाच्या आदर्श धोरणास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. 

सिडको महामंडळाकडून विविध वापरांसाठी भूखंडांचे लिलाव पध्दतीने भाडेतत्त्वावर वाटप केले जाते. या भूखंडांवर संबंधितांना प्रकल्पांचे बांधकाम करता येते. मात्र यासाठी भाडेपट्टा करारनाम्यातील अटी व शर्ती तसेच एकत्रित विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली-२०२० मधील नियमांचे पालन करावे लागते. यातील काही भूखंड हे वेगवेगळ्या बांधकाम व विकास संचलनकर्त्यांच्या (सिडीओज-कन्स्ट्रक्शन ॲण्ड डेव्हलपमेंट ऑपरेटर) ताब्यात असल्यामुळे या ठिकाणी एकसंधपणे आणि एकात्मिक वसाहत धोरणाप्रमाणे विकास प्रकल्प पूर्ण करणे शक्य नसते. यासाठी सिडकोच्या संचालक मंडळाने संकल्पना आधारित – आयकॉनिक शहर विकासाचे धोरण तयार केले असून त्याबाबतचा प्रस्ताव शासनास सादर केला आहे. या प्रस्तावाच्या अनुषंगानेमंत्रिमंडळ बैठकीत या धोरणास मान्यता देण्यात आली. या धोरणामुळे राज्यातील सिडकोसहविविध प्राधिकरणांकडील जमिनीभूखडांचा सुयोग्य वापर निश्चित करण्यास प्राधान्य मिळणार आहे. संबंधित प्राधिकरणाला बांधकाम व विकास संचलनकर्ता-सिडीओजची निविदा प्रक्रियेद्वारे नेमणूक करता येणार आहे. यामुळे सिडीओजला निवासी एकात्मिक वसाहत किंवा आंतरराष्ट्रीय व्यावसायिक क्षेत्रांची उभारणी करता येणार आहे. त्याला विकसनाचे हक्क मिळणार आहे. तसेच प्रकल्पातील सदनिकां व व्यवसायिक मालमत्तेची विक्री करता येणार आहे. या धोरणात वसाहतींच्या उभारणीसाठी कालबध्दतेची अट घालण्यात आली असून सीडीओची जबाबदारीधोरण उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी संरक्षक उपायआयकॉनिक विकास संकल्पनांची निवड-संक्षिप्त आराखडाविकासक निवड प्रक्रियाप्रकल्पासाठी विकास आराखडाजमिनीचा ताबा हस्तांतरणमहसूल हिश्श्याचे वाटपदेयक अटीप्रकल्प समाप्तीसंदर्भातील तरतुदी अशा बाबींचा या धोरणात समावेश आहे.

०००


अमरावती, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरच्या भूसंपादन प्राधिकरणाकरिता प्रत्येकी चार नवीन पदे

 अमरावतीनाशिक आणि छत्रपती संभाजीनगरच्या भूसंपादन प्राधिकरणाकरिता

प्रत्येकी चार नवीन पदे

 

भूसंपादनाच्या प्रलंबित प्रकरणांचा जलदगतीने निपटारा होण्यासाठी अमरावतीनाशिक आणि छत्रपती संभाजीनगर येथील भूसंपादनपुनर्वसन व पुनर्स्थापना प्राधिकरणामध्ये प्रत्येकी चार अशा एकूण १२ पदांची निर्मिती करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. 

            भूसंपादनपुनर्वसन व पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम२०१३ नुसार नाशिकनागपूरअमरावती आणि छत्रपती संभाजीनगर येथे प्राधिकरण आहे. नाशिक प्राधिकरणाचे अधिकारक्षेत्र नाशिककोकण आणि पुणे या तीन महसुली विभागाकरिता आहे. चारही प्राधिकरणाकडे भूसंपादन कायद्याच्या कलम ६४७६ आणि ७७ नुसार प्रलंबित संदर्भाची संख्या २८ हजार १५१ आहे.  

या संदर्भाचा जलद गतीने निपटारा करण्यासाठी एक पीठासीन अधिकारीएक निम्नश्रेणी लघुलेखकएक कंत्राटी शिपाई आणि एक कंत्राटी वाहनचालक अशी चार पदे प्रत्येकी अमरावतीनाशिक आणि छत्रपती संभाजीनगर प्राधिकरणाकरिता मंजुरी देण्यात आली.

०००

रोजच्या जेवणात २ चमचे तुपाचा समावेश करा आणि २० फायदे मिळवा

 *रोजच्या जेवणात २ चमचे तुपाचा समावेश करा आणि २० फायदे मिळवा.....!*


जाड व्यक्ती दिसली, की उपहासाने लोक म्हणतात, तूप जरा कमी खात जा. वास्तविक पाहता, जाडेपणाचा आणि तुपाचा दुरान्वये संबंध नाही. अर्थात अतिप्रमाणात सेवन केले, तर कोणतीही गोष्ट वाईटच! परंतु तूप हे शरीराला अपायकारक नसून उपायकारक आहे. थंडीत तर तूप खाणे 'मस्ट' आहे! एका श्लोकात वर्णन केलेले आहे, 

*स्मृती, बुद्धी, अग्नी, शुक्र, ओज: कफमेदोविवर्धनम सर्वंस्नेहोत्तमम शीतम मधुरं रसपाकयो:*


स्मरणशक्ती, बुद्धी, अग्नी, शुक्र, ओज, कफ, मेद यांचे वर्धन करणारे तूप सर्व स्नेहात उत्तम असून त्याचा रस आणि विपाक मधुर असल्याने ते सर्व गुणांनी युक्त असते. 


*१. तुपामध्ये व्हिटामिन ए, डी आणि कॅल्शियम, फॉरस्फोरस, मिनरल्स, पोटॅशियम यांसारखे अनेक पोषक तत्व असतात. देशी तूप खाल्यानं सांधेदुखी त्रास कमी होण्यास मदत होते.


*२. रोज शुद्ध तूप खाल्ल्याने वात आणि पित्त याचा त्रास होत नाही.


*३. शुद्ध तुप खाण्याने पचनक्रिया चांगली राहते.


*४. तुपामुळे डोळ्यांवर पडणारा ताण कमी होण्यास मदत होते.


*५. हृदयाच्या नलिकांमध्ये ब्लॉकेज असल्यास शुद्ध तूप लुब्रिकेंटचे काम करते.


*६. गॅसेसचा त्रास कमी करण्यासाठी तुप खुप फायदेशीर ठरतं.


*७. उन्हाळ्यात पित्त वाढतं त्यासाठी तुपाचे सेवन केल्यास त्याचं प्रमाण कमी होतं.


*८. डाळ शिजवताना तूप टाकल्याने गॅस होण्याचा त्रास कमी होतो.


*९. शुद्ध तुपामुळे स्किन सॉफ्ट राहते. शुद्ध तुपाने चेहऱ्याचे मसाज करणे फायदेशीर असतं.


*१०.तुपामध्ये तेलापेक्षा अधिक पोषक तत्व असतात. बटर पेक्षा तुपाचं सेवन करणं अधिक चांगलं असतं. तुप घरी तयार करणं अधिक उत्तम आहे.


*११. आहारात नियमित तुपाचे सेवन केले असता बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही. 


*१२. उचकी थांबत नसेल तर अर्धा चमचा गायीचे तूप खावे. 


*१३. अर्धशिशीचा त्रास असणाऱ्यांनी नाकात गायीच्या तुपाचे २ थेंब टाकावेत. 


*१४. मोबाईल, टीव्ही, कॉम्प्युटरमुळे शिणलेल्या डोळ्यांचा दिवसभराचा ताण घालवायचा असेल, तर रात्री झोपताना डोळ्यात दोन थेंब तूप टाका. 


*१५ . तुपाचा तुमच्या मेंदूच्या आरोग्यावरदेखील चांगला फायदा होतो. ज्यामुळे तुमची स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढते. 


*१६. हाता-पायाची जळजळ होत असल्यास गायीच्या तुपाने, पायाच्या तळव्यांना मालिश केल्यास जळजळ कमी होण्यास मदत होते.


*१७. मूत्रमार्गाशी संबंधित आजार असल्यास जेवणाआधी आणि जेवणानंतर दोन चमचे औषधी तूप खावे. 


*१८. हे सर्व फायदे आपल्याप्रमाणे एखाद्या गरजवंताला देखील मिळावेत म्हणून शास्त्रात घृत दानाला अर्थात तुपाचे दान करण्याला महत्त्व दिले आहे. त्यानुसार सणासुदीला यथाशक्ती तुपाचे दान करावे अन्यथा साजूक तुपात केलेले पदार्थ दान करावेत.


*डॉ. सुनील इनामदार, 


*माहिती आवडली तर इतर ग्रुप वर शेअर करा 🙏*


*

Tuesday, 18 November 2025

पुणे ते शिरूर, शेंद्रा ते बिडकीन, बिडकीन ते ढोरेगाव रस्ते निर्मितीला मान्यता छत्रपती संभाजीनगर ते अहिल्यानगर रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी

 पुणे ते शिरूरशेंद्रा ते बिडकीनबिडकीन ते ढोरेगाव रस्ते निर्मितीला मान्यता

छत्रपती संभाजीनगर ते अहिल्यानगर रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी

-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबईदि. १८ : पुणे ते शिरूर राष्ट्रीय महामार्गावरील ५३.४ किलोमीटर अंतरातील चार पदरी जमिनीला समांतर (ॲट ग्रेड) व सहा पदरी उन्नत महामार्गासह छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेंद्रा औद्योगिक वसाहत ते बिडकीन औद्योगिक वसाहत आणि बिडकीन ते ढोरेगाव (छत्रपती संभाजीनगर ते पुणे महामार्ग) सहा पदरी रस्ते निर्मितीला मंत्रालयात आयोजित मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. यासोबतच नवीन ग्रीनफिल्ड रस्ता छत्रपती संभाजीनगर - जालना डीएमआयसी नोड क्रमांक एक करमाड ते बिडकीन मार्गे समृद्धी महामार्गास सहा पदरी रस्ता जोडणी या नवीन आखणीस तत्वतः मान्यता देण्यात आली. छत्रपती संभाजी नगर ते अहिल्यानगर दरम्यान सद्यस्थितीत असलेल्या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करून नागरिकांचा त्रास कमी करावाअसे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले.

बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री अजित पवारमहसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेसार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसलेमुख्य सचिव राजेश कुमार उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेपुणे ते शिरूर या महामार्गावरील सहा पदरी उन्नत मार्ग आणि चार पदरी जमिनीच्या समतल (ॲट ग्रेड) मार्गाचे काम तीन वर्षात पूर्ण करावे. रस्ता विहित कालावधीत पूर्ण करण्यात यावा. या रस्त्याच्या निर्मितीमध्ये कुठेही दिरंगाई होऊ नये. पुणे ते छत्रपती संभाजीनगर महामार्गावर पुणे ते शिरूर दरम्यान औद्योगिक वसाहती असल्याने वाहनांची वर्दळ आणि भविष्यातील वाढणारी वाहनांची संख्या लक्षात घेता महामार्गाचे काम तात्काळ सुरू करावे.

जंगलात भक्ष्य मिळण्यासाठी उपाययोजना करा

 जंगलात भक्ष्य मिळण्यासाठी उपाययोजना करा – वन मंत्री गणेश नाईक

जंगलामधील भक्ष्य कमी झाल्यामुळे बिबटे हे मानवी वस्तीत येऊन हल्ले करत आहेत. त्यामुळे जंगलामध्येच त्यांना भक्ष्य मिळण्यासाठी बिबट्यांची संख्या जास्त असलेल्या जंगलात शेळ्या सोडण्यात यावेत. जेणेकरून ते मानवी वस्तीत येणार नाहीत. तसेच बिबट्यांना पकडण्यासाठी पुणे जिल्ह्यात टप्प्याटप्प्याने 1200 पिंजरे पुरविण्यात येत आहेतअशी माहिती वन मंत्री नाईक यांनी यावेळी दिली.

माजी मंत्री दिलीप वळसे-पाटीलदौंडचे आमदार राहूल कुलकोपरगावचे आमदार आशुतोष काळेश्रीरामनगरचे आमदार लहू कानडे त्यांच्या भागातील समस्या सांगून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली.

बिबट्यांचा वावर असलेल्या ठिकाणच्या शाळांची वेळ बदला –

 बिबट्यांचा वावर असलेल्या ठिकाणच्या शाळांची वेळ बदला  उपमुख्यमंत्री अजित पवार

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले कीबिबट्यांच्या हल्ल्यामुळे अनेक ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. नागरिकांमधील भीती कमी करण्यासाठी तातडीने उपाययोजना राबविण्यात याव्यात. बिबट्यांचा वावर असलेल्या ठिकाणी पोलीस व वन विभागाने गस्त वाढवावी. तसेच बिबट्यांचा वावर असलेल्या पुणेअहिल्यानगर व नाशिक जिल्ह्यातील भागांमध्ये शाळांची वेळ सकाळी 9.30 ते 4.00 अशी करण्यात यावी. रेस्क्यू सेंटर उभारण्यासाठी तातडीने निधीचा प्रस्ताव देण्यात यावे.

बचाव केंद्रांची क्षमता तातडीने वाढवावी

 बचाव केंद्रांची क्षमता तातडीने वाढवावी – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 उपमुख्यमंत्री शिंदे यांनी बिबट्यांची समस्या वाढल्यामुळे लोकांमध्ये रोष निर्माण झाल्याचे सांगितले. यावर तातडीने उपाययोजना करण्यासाठी गाव व शहराजवळ फिरणाऱ्या बिबट्यांना ड्रोनच्या सहाय्याने शोधून त्यांना पकडण्यात यावे. त्यासाठी आवश्यक मनुष्यबळ तातडीने वाढविण्यात यावे. नागरी वस्तीत बिबटे आल्यास तो नरभक्षक समजूनच त्याला पकडण्यात यावे. बिबट्यांचा वावर असलेल्या भागात रेस्क्यू टीम व वाहनांची संख्याही वाढवावी. सध्या असलेल्या माणिकडोह व इतर ठिकाणच्या रेस्क्यू सेंटरची क्षमता वाढवावीअशा सूचना त्यांनी दिल्या.

Featured post

Lakshvedhi