Tuesday, 18 November 2025

पुणे ते शिरूर, शेंद्रा ते बिडकीन, बिडकीन ते ढोरेगाव रस्ते निर्मितीला मान्यता छत्रपती संभाजीनगर ते अहिल्यानगर रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी

 पुणे ते शिरूरशेंद्रा ते बिडकीनबिडकीन ते ढोरेगाव रस्ते निर्मितीला मान्यता

छत्रपती संभाजीनगर ते अहिल्यानगर रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी

-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबईदि. १८ : पुणे ते शिरूर राष्ट्रीय महामार्गावरील ५३.४ किलोमीटर अंतरातील चार पदरी जमिनीला समांतर (ॲट ग्रेड) व सहा पदरी उन्नत महामार्गासह छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेंद्रा औद्योगिक वसाहत ते बिडकीन औद्योगिक वसाहत आणि बिडकीन ते ढोरेगाव (छत्रपती संभाजीनगर ते पुणे महामार्ग) सहा पदरी रस्ते निर्मितीला मंत्रालयात आयोजित मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. यासोबतच नवीन ग्रीनफिल्ड रस्ता छत्रपती संभाजीनगर - जालना डीएमआयसी नोड क्रमांक एक करमाड ते बिडकीन मार्गे समृद्धी महामार्गास सहा पदरी रस्ता जोडणी या नवीन आखणीस तत्वतः मान्यता देण्यात आली. छत्रपती संभाजी नगर ते अहिल्यानगर दरम्यान सद्यस्थितीत असलेल्या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करून नागरिकांचा त्रास कमी करावाअसे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले.

बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री अजित पवारमहसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेसार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसलेमुख्य सचिव राजेश कुमार उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेपुणे ते शिरूर या महामार्गावरील सहा पदरी उन्नत मार्ग आणि चार पदरी जमिनीच्या समतल (ॲट ग्रेड) मार्गाचे काम तीन वर्षात पूर्ण करावे. रस्ता विहित कालावधीत पूर्ण करण्यात यावा. या रस्त्याच्या निर्मितीमध्ये कुठेही दिरंगाई होऊ नये. पुणे ते छत्रपती संभाजीनगर महामार्गावर पुणे ते शिरूर दरम्यान औद्योगिक वसाहती असल्याने वाहनांची वर्दळ आणि भविष्यातील वाढणारी वाहनांची संख्या लक्षात घेता महामार्गाचे काम तात्काळ सुरू करावे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi