Monday, 17 November 2025

आदिवासींच्या सर्वांगीण विकासाचा संकल्प करूया

 आदिवासींच्या सर्वांगीण विकासाचा संकल्प करूया

-          केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

देशाच्या विकासात आदिवासी समाजाचे मोठे योगदान आहे. भगवान बिरसा मुंडा हे या समाजाच्या अभिमान व स्वाभिमानाचे प्रतिक आहेत. निसर्गाच्या सानिध्यात राहून आपली समृद्ध परंपरा जपण्याचे कार्य हा समाज करीत असून त्यांच्या सर्वांगिक विकासाठी संकल्प करण्याचे आवाहन यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. जंगलात राहत असल्याने व शहरी भागापासून दूर असल्याने त्यांच्या विकासासाठी काम होणे गरजेचे आहे. आदिवासींना योग्य संधी मिळण्याची आवश्यकता आहे. म्हणूनच हस्तउद्योगकुटीर उद्योग आदींच्या माध्यमातून व आदिवासी विकासाच्या विविध योजना केंद्र व राज्य शासनाद्वारे राबविण्यात येत आहेत. आदिवासींच्या सामाजिकशैक्षणिकसांस्कृतिक विकासासाठी केंद्र व राज्य शासन प्रयत्नरत आहे. त्यांच्या आर्थिक प्रगतीसाठी आर्थिक विकासाचे मॉडेल आखून शासन कार्य करीत असल्याचेही त्यांनी सांगितले.

 

          आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके म्हणाले कीएप्रिल महिन्यापासून भगवान बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर आदिवासी विकास विभागाच्यावतीने भगवान बिरसा सांस्कृतिक मंचाची स्थापना केली. याद्वारे 40 हजार युवा-युवतींची नोंदणी व विविध सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. जनजातीय गौरव वर्षांतर्गत करण्यात आलेल्या विविध आयोजनांची त्यांना माहिती दिली. राणी दुर्गावती योजनेच्या माध्यमातून आदिवासी महिला लखपती दीदी होत असल्याचेही त्यांनी सांगितले.

प्रशासकीय अधिकाऱ्यांनी नैसर्गिक शेतीला चालना द्यावी

 4418

प्रशासकीय अधिकाऱ्यांनी नैसर्गिक शेतीला चालना द्यावी: राज्यपाल आचार्य देवव्रत

 

मुंबई, दि. 16 : रासायनिक खताच्या अति वापरामुळे जमिनीची उत्पादक क्षमता बाधित होत असून त्यासोबतच कॅन्सर, मधुमेह, उच्च रक्तदाब अशा विविध आजारांचे प्रमाण अनेक पटींनी वाढत आहे.  हे सर्व रोखण्यासाठी  नैसर्गिक शेतीलाच प्रथम प्राधान्य देणे गरजेचे आहे. त्यामुळे प्रशासकीय अधिकारी व प्रबुद्ध समाजाने आपल्या स्तरावर नैसर्गिक शेतीचे महत्त्व शेतकऱ्यांना पटवून द्यावे असे आवाहन महाराष्ट्र व गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी आज येथे केले.

'संकल्प फाउंडेशन' या प्रशासकीय अधिकारी घडवणाऱ्या सेवाभावी संस्थेतर्फे प्रशासकीय अधिकारी तसेच विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित लोकांसाठी 'नैसर्गिक कृषी : अनुपम भारतीय वारसा' या विषयावर राजभवन मुंबई येथे आयोजित चर्चासत्रामध्ये संवाद साधताना राज्यपाल बोलत होते.  

मोठ्या प्रमाणात होत असलेली रासायनिक खतांची आवक थांबवली पाहिजे या खतांमुळे गहू व तांदूळ यातील पोषणमूल्य कमी झाले आहे. भावी पिढ्यांची अन्नधान्य व जलसुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी नैसर्गिक शेती आवश्यक आहे असे त्यांनी सांगितले.

नैसर्गिक व जैविक शेतीमध्ये मोठा फरक आहे असे सांगून रासायनिक तसेच जैविक शेती पेक्षा नैसर्गिक शेती मानव तसेच सूक्ष्म जीव कल्याणाची आहे असे राज्यपालांनी सांगितले.

धर्म, अर्थ व काम यांच्या माध्यमातून मोक्षप्राप्तीसाठी निरामय आरोग्य आवश्यक आहे व आरोग्यासाठी दिनचर्या, भोजन यांसह पर्यावरण महत्वाचे आहे असे राज्यपालांनी सांगितले. आज जागतिक तापमानवाढ जगापुढे मोठे संकट आहे. त्याचा थेट परिणाम शेतीवर पडत आहे. त्यामुळे सर्वांनी नैसर्गिक शेतीला चालना द्यावी व नैसर्गिक उत्पादने खरेदी करावी असे आवाहन राज्यपालांनी केले.      

संकल्प फाउंडेशनचे अध्यक्ष संतोष कुमार तनेजा यांनी आपल्या प्रास्ताविकात संकल्प फाउंडेशनने आजवर हजारो प्रशासकीय अधिकारी घडवले असून ते भारतीय सांस्कृतिक विचार पुढे नेत असल्याचे सांगितले.

कार्यक्रमाला रा. स्व. संघाचे मुंबई येथील संघचालक सुरेश भगेरिया, संकल्पचे महासचिव संतोष पाठक, सचिव राजू चौहान तसेच इतर निमंत्रित उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते एक्सएसआयओ इंडस्ट्रीयल अँड लॉजिस्टिक पार्कचे भूमिपूजन

 मुख्यमंत्र्यांच्या हस्ते एक्सएसआयओ इंडस्ट्रीयल अँड लॉजिस्टिक पार्कचे भूमिपूजन

 

एक्सएसआयओ इंडस्ट्री व ब्लॅकस्टोन कंपनीचा उद्योग विभागासोबत हजार 127 कोटींचा करार

 

नागपूरदि.15: राज्य शासनाने उद्योगांसाठी पुरक असे लॉजिस्टिक धोरण आणले असून उद्योग क्षेत्रात उत्तम दळणवळच्या सोयी उपलब्ध करून देत लॉजिस्टिक दर कमी करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नरत आहे. एक्सएसआयओच्या माध्यमातून नागपूर शहराला देशाचे लॉजिस्टिक हब बनविण्याच्या दिशेने गती मिळेलअसा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. तसेच मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत राज्याच्या विविध भागात गुंतवणुकीसाठी एक्सएसआयओ इंडस्ट्री व ब्लॅकस्टोन कंपनी आणि उद्योग विभागासोबत पाच हजार 127 कोटींच्या करारावर स्वाक्षऱ्या झाल्या.

 

मुख्यमंत्री  म्हणाले की, समृद्धी महार्गालगत वडगाव परिसरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते एक्सएसआयओ इंडस्ट्रीयल अँड लॉजिस्टीक पार्कचे भूमिपूजन व शिलान्यास करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.  आमदार समीर मेघे आणि डॉ. आशिष देशमुखउद्योग विभागाचे सचिव डॉ. पी. अबलगमएक्सएसआयओ कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आशिष अग्रवालब्लॅक स्टोन कंपनीचे तूहीन पारेख आदी यावेळी उपस्थित होते.

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कीब्रिटिशांनी नागपूरला भौगोलिकदृष्ट्या झिरो माईल हे मध्य भारताचे केंद्र बिंदू म्हणून घोषित केले होते. आता हे शहर देशाचे लॉजिस्टिक हब होण्याच्या मार्गाने पुढे जात आहे. एक्सएसआयओ इंडस्ट्रीयल अँड लॉजिस्टीक पार्कच्या माध्यमातून या कार्यास गती मिळेल. नागपूर हे नागरी विमान क्षेत्रातही पुढे जात आहे. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय विमानांच्या फेऱ्या या शहरात दररोज होत आहे. समृद्धी महामार्गामुळे उद्योग क्षेत्रातील दळणवळास चालना मिळाली आहे.  

Maharashtra Governor appeals to administrative officers to promote natural farming

 Maharashtra Governor appeals to administrative officers to promote natural farming

 

The Governor of Maharashtra and Gujarat Acharya Devvrat today appealed to civil servants and administrative officers to promote natural farming among farmers and to buy naturally produced fruits and foodgrains.

 

The Governor was delivering a talk on the theme of 'Natural Farming: India's Unparalleled Heritage' at Raj Bhavan, Mumbai on Sunday (16 Nov).  The talk session attended by senior officers of Indian Administrative, Police, Revenue and other services and Swayamsevaks was organised by the Samkalp Foundation. 

 

Suresh Bhageriya of RSS Mumbai Region, Santosh Kumar Taneja, Chairman of Samkalp Foundation, Santosh Pathak, General Secretary and Raju Chauhan, Secretary of Samkalp were present on the occasion.

 

 

 

 

 

 

 

 

Swami Ramanand Teerth’s Invaluable Contribution to Marathwada Liberation Struggle

 Swami Ramanand Teerth’s Invaluable Contribution to Marathwada Liberation Struggle – Chief Minister Devendra Fadnavis

Unveiling of Swami Ramanand Teerth’s Statue and Kamal Talav by the Chief Minister

Chhatrapati Sambhajinagar, Nov 16: Swami Ramanand Teerth inspired patriotism among the youth during the Marathwada Liberation Struggle and, along with women and other freedom fighters, led efforts to free Marathwada from the oppressive rule of the Nizam. His contribution to the movement is invaluable, said Chief Minister Devendra Fadnavis.

The statue of Swami Ramanand Teerth at Kranti Chowk and the historic Kamal Talav, inaugurated online, were unveiled by Chief Minister Fadnavis. The event was attended by Backward Classes Welfare, Dairy Development and Non-Conventional Energy Minister Atul Save, MP Sandipan Bhumre, Rajya Sabha MP Dr. Bhagwat Karad, MLAs Sanjay Kenekar and Anuradha Chavan, Municipal Commissioner G. Shrikant, and family members of freedom fighters who contributed to the Marathwada Liberation Struggle.

Chief Minister Fadnavis said that Swami Ramanand Teerth led a disciplined and dedicated life. Like Swami Vivekananda, he awakened patriotism among the youth. After India gained independence, Marathwada took nearly 13 months to become free, as it was part of the Nizam’s estate. The atrocities committed by the Razakars had reached their peak, and a major struggle was undertaken against them. Swami Ramanand Teerth provided leadership in this struggle, igniting the flame of independent identity in Hyderabad and Marathwada, motivating many youth and women to participate. Then Home Minister Sardar Vallabhbhai Patel responded to the call of these freedom fighters with military action, leading to Marathwada’s liberation on September 17, 1948—a day now celebrated annually as Marathwada Liberation Day. The unveiling of Swami Ramanand Teerth’s statue honors his pivotal contribution, said the Chief Minister. Sculptor Niranjan Madilgekar was felicitated by Chief Minister Fadnavis for his work on the statue.

The historic Kamal Talav was also inaugurated by Chief Minister Fadnavis, who noted that it has added value to the city’s tourist attractions. After the inauguration, the Chief Minister personally purchased a ticket to officially open Kamal Talav to the public.

The Coming Era Will Be the Golden Age of Ayurveda

 The Coming Era Will Be the Golden Age of Ayurveda

– Chief Minister Devendra Fadnavis

 

Inauguration of New Building of ShriYash Ayurvedic College &

 Hospital Research Center

Chhatrapati Sambhajinagar, Nov 16: The significance of Ayurveda, a treatment system in harmony with nature, has been recognized worldwide. The Ministry of AYUSH has promoted this system in various ways, including education, clinical practice, and research. The coming era will be the golden age of Ayurveda, said Chief Minister Devendra Fadnavis today.

The Chief Minister inaugurated the new building of ShriYash Ayurvedic College & Hospital Research Center located in the Satar Tanda area. The event was attended by Backward Classes Welfare Minister Atul Save, Rajya Sabha MP Dr. Bhagwat Karad, ShriYash Pratishthan’s Basavaraj Mangrul, Secretary Sangita Mangrul, Hospital Superintendent Dr. Paresh Deshmukh, Director Swati Itge, and other dignitaries.

The Chief Minister stated that Ayurveda, a treatment system aligned with Indian lifestyle and in harmony with nature, is mentioned in the Vedas. Treatments in Ayurveda address the root cause of diseases, not just the symptoms, making it a sustainable healthcare system. The global use of Ayurveda is increasing, and many people come to India for Ayurvedic treatments. Ayurveda has contributed to science-based treatment methods and even developed surgical techniques.

During the COVID period, Ayurvedic medicines formed the major part of supplements that strengthened immunity. The central government is actively promoting this system, and Ayurvedic colleges are being encouraged to train skilled practitioners. The Chief Minister added that India is poised to become one of the world’s leading economies in the coming decade, aiming to achieve major economic power status by 2047. In Marathwada, support is being given to the industrial sector, and Chhatrapati Sambhajinagar is emerging as a capital for electric vehicles

00000

माजी मुख्यमंत्री दिवगंत वसंतराव नाईक यांचे कार्य राज्याला दिशादर्शक

 माजी मुख्यमंत्री दिवगंत वसंतराव नाईक यांचे कार्य राज्याला दिशादर्शक

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री दिवगंत वसंतराव नाईक

यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण

 

छत्रपती संभाजीनगरदि.16 (विमाका) :- महाराष्ट्राचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेले दिवगंत वसंतराव नाईक यांनी राज्याच्या दुष्काळमुक्तीसाठी केलेली जलसंधारणाची कामे तसेच अन्नधान्यांमध्ये स्वयंपूर्णतेसाठी राबविलेल्या उपक्रमांचा आजही राज्याला मोठा लाभ होत आहे. राज्याला दिशा देणारे आणि परिवर्तनाची प्रेरणा देणारे त्यांचे कार्य खऱ्या अर्थाने दिशादर्शक असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.

 

छत्रपती संभाजीनगर शहरातील सिडको येथे हरित क्रांतीचे प्रणेतेमाजी मुख्यमंत्री दिवगंत वसंतराव नाईक यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते आज झालेत्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाटइतर मागास बहुजन कल्याणदुगधविकासअपारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावेपर्यावरण व वातावरणीय बदलपशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडेखासदार संदिपान भुमरेखासदार डॉ. कल्याण काळेखासदार डॉ. भागवत कराडआमदार संजय केणेकरआमदार अनुराधा चव्हाणमनपा आयुक्त जी. श्रीकांत उपस्थित होते.

 

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणालेहरित क्रांतीचे प्रणेतेमाजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा राज्याच्या जडणघडणीमध्ये मोलाचा वाटा आहे. राजकारणात विविध पदावर काम करताना महाराष्ट्र स्वयंपूर्ण करण्याचे देखील काम केले. बंजारा समाजामध्ये मोठ्या प्रमाणात जागृती निर्माण केली. समाजाला शिक्षणाकडे वळविण्यासाठी अनेक शिक्षण संस्थांची निर्मिती केली असून समाजातल्या विविध परंपरा जोपासल्या पाहिजेत यासाठीही त्यांनी प्रयत्न केलाराजकीय सामाजिक जीवनामध्ये नगराध्यक्ष पदापासून आमदारखासदारमुख्यमंत्री अशा विविध पदांवर नाईक साहेबांनी काम केले. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये सर्वाधिक काळ राहिलेले मुख्यमंत्री म्हणून ‍दिवंगत नाईक साहेबांच्या नावाची नोंद असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

 


Featured post

Lakshvedhi