Monday, 17 November 2025

कुष्ठरोग शोध अभियान अंतर्गत राज्यात १७ नोव्हेंबर ते २ डिसेंबर दरम्यान घरोघरी तपासणी

 कुष्ठरोग शोध अभियान अंतर्गत राज्यात

 १७ नोव्हेंबर ते २ डिसेंबर दरम्यान घरोघरी तपासणी

मुंबई, दि.१४ : केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यात मागील पाच वर्षांप्रमाणे यंदाही कुष्ठरोग शोध अभियान राबविण्यात येत आहे. १७ नोव्हेंबर ते २ डिसेंबर २०२५ या कालावधीत राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये व्यापक सर्वेक्षणाद्वारे कुष्ठरोगाचे रुग्ण शोधण्याची मोहीम हाती घेण्यात येणार आहे.

यंदाच्या अभियानात ८.६६ कोटी लोकसंख्या आणि १ कोटी ७३ लाख २५ हजार घरे सर्वेक्षणासाठी निवडली असून६५,८३२ पथके आणि १३,१६६ पर्यवेक्षक या मोहिमेसाठी नियुक्त करण्यात आले आहेत. ग्रामीण भागात प्रत्येक पथक दररोज २० घरेतर शहरी भागात २५ ते ३० घरांना भेट देऊन प्रत्यक्ष शारीरिक तपासणी करणार आहे. प्रत्येक पथकात एक आशा स्वयंसेविका आणि एक पुरुष स्वयंसेवक सहभागी असूनते सलग १४ दिवस सर्वेक्षण करतील.


डिझेल, पेट्रोल व पेट्रोलियम सदृश्य द्रव पदार्थाची अनधिकृत साठवणूक व विक्री करणाऱ्यांविरुध्द कडक कारवाई

 डिझेलपेट्रोल व  पेट्रोलियम सदृश्य द्रव पदार्थाची

 अनधिकृत साठवणूक व विक्री करणाऱ्यांविरुध्द कडक कारवाई

 

 मुंबई, दि. 14 : मुंबई ठाणे शिधावाटप यंत्रणेच्या भरारी पथकामार्फत टागोर नगरगुरुव्दाराजवळविक्रोळी (पुर्व)मुंबई  या ठिकाणी डिझेलपेट्रोल व पेट्रोलयम सदृश्य द्रव पदार्थाची अनधिकृत साठवणूक व विक्री करणाऱ्यांविरुध्द कारवाई करण्यात आली. सदर कारवाईमध्ये पेट्रोल व डिझेलचा अंदाजित साठा 14,795 लिटर्स व टेम्पो असा एकुण रुपये 33,51,719/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला  असल्याची माहिती  नियंत्रक, शिधावाटप व संचालक नागरी पुरवठामुंबई कार्यालयाने प्रसिद्धीपत्राद्वारे दिली आहे. 

 

विश्वविख्यात वाळूशिल्पकार सुदर्शन पटनायक यांचे पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीमध्ये

 विश्वविख्यात वाळूशिल्पकार सुदर्शन पटनायक यांचे पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीमध्ये

१८ ते २३ नोव्हेंबर या कालावधीत प्रदर्शन 

मुंबईदि. १५ जागतिक कीर्तीचे वाळूशिल्पकार सुदर्शन पटनायक यांच्या कलाकृतींचे प्रदर्शन बघण्याची संधी प्रथमच मुंबईकरांना मिळणार आहे. प्रभादेवी येथील पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या तळमजल्यावरील व पहिल्या मजल्यावर प्रदर्शन दालनांमध्ये हे प्रदर्शन दिनांक १८ ते २३ नोव्हेंबर 2025या कालावधीत सकाळी ११ ते ७ या वेळेत रसिकांसाठी खुले असेल.

पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीसांस्कृतिक कार्य विभागाच्यावतीने राज्यात प्रदर्शनासाठी प्रथमच श्री पटनाईक यांना निमंत्रित करण्यात आले असून रसिक प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या अद्वितीय कलेचा अनुभव लाभ घ्यावाअसे आवाहन सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड आशिष शेलार यांच्या वतीने करण्यात येत आहे.

ओडिशा येथील समुद्र किनाऱ्यांवर वाळूच्या माध्यमातून कलाकृती साकार करणारे सुदर्शन पटनाईक हे त्यांच्या अनोख्या वाळूशिल्पांमुळे जगविख्यात झाले आहेत. समुद्रकिनारी वाळूपासून ते अतिशय कलात्मक शिल्प तयार करत असून त्यांची अनेक वाळूशिल्पे ही सामाजिक मुद्यांवर भाष्य करणारी तसेच जनजागृती करणारी असतात.

श्री.पटनायक यांनी आजपर्यंत ६५ हून अधिक आंतरराष्ट्रीय वाळूशिल्प स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. पद्मश्री (२०१४)गोल्डन सॅण्ड मास्टर अवॉर्ड (२०२४) आणि युनायटेड किंग्डममधील फ्रेड डॅरिंग्टन सॅण्ड मास्टर अवॉर्ड (२०२५) यांसारख्या अनेक प्रतिष्ठित सन्मानांनी त्यांची कलायात्रा गौरवली गेली आहे.

 अलीकडील काळात त्यांनी मिश्र-माध्यमातील कलाकृतींमध्ये उल्लेखनीय प्रयोग केले आहेत. गोल्डन सॅण्ड आर्ट इन्स्टिट्यूट या संस्थेद्वारे ते नव्या पिढीतील कलाकार घडवत आहेत. 

भारताच्या प्रगतीचा पाया डिझाइन थिंकिंगमध्येच

 भारताच्या प्रगतीचा पाया डिझाइन थिंकिंगमध्येच आहे. अभियांत्रिकीवास्तुकलाउत्पादनअ‍ॅनिमेशनगेमिंगडिजिटल कंटेंटतंत्रज्ञान आदी सर्व क्षेत्रांत डिझाइन नवोपक्रमाची मुख्य ताकद बनली आहे. नवीन अभ्यासक्रम कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) एआर/व्हीआर (Augmented & Virtual Reality) UX/UI Creative Technologies बरोबर उद्योग-शैक्षणिक सहकार्य वाढवून विद्यार्थ्यांना हँड्स-ऑनव्यावहारिकप्रोजेक्ट-आधारित शिक्षण आणि मोठ्या प्रमाणत रोजगार निर्मिती करण्यात येत आहे. असेही मंत्री श्री पाटील यांनी सांगितले.

नवे शैक्षणिक धोरण व्यावहारिक असून, यात संशोधनावरही भर

 मंत्री श्री चंद्रकांत पाटील नवे शैक्षणिक धोरण व्यावहारिक असूनयात संशोधनावरही भर देण्यात आला आहे. याशिवाय नव उद्योजकस्टार्टर्स अप यांना प्रोत्साहन दिले जात आहे. त्यासाठी कमी व्याजावर कर्ज उपलब्ध करून दिले जात असूनबाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी शासनाकडून मदतही केली जात आहे. यातूनच स्टार्टअपच्या क्षेत्रात भारत आघाडीवर आहे. मंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणालेकीउर्मीजच्या कला मंचा तर्फे डिझाइनला शालेय स्तरावरील सर्जनशीलता आणि करिअरच्या संधी तसेच एक्स्पोच्या माध्यमातून एकाच छताखाली पोर्टफोलिओ प्रदर्शनकरिअर समुपदेशनविद्यापीठ भागीदारी आणि उद्योग संवाद आयोजित करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना योग्य दिशा देणारे असे उपक्रम प्रेरणादायी ठरतील . अशा उर्मीजच्या कला मंचा एक्स्पोमुळे महाराष्ट्रातील डिझाइन गुणवत्तेला राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी उपलब्ध होतील. 

 

मुलांच्या शिक्षणात आणि विकासात कला आणि सर्जनशील विषयांची भूमिका महत्त्वाची असते. डिझाइन हा आपल्या जीवनाच्या प्रत्येक पैलूचा अविभाज्य भाग बनला आहेडिझाईन आता केवळ चित्रकलेपुरते मर्यादित न राहता विज्ञानसौंदर्यशास्त्रमानवी गरजा आणि तंत्रज्ञान यांचा समन्वय साधणारे एक व्यापक व्यावसायिक क्षेत्र आहे. एक्स्पोचे आयोजन हे महाराष्ट्रातील सर्जनशीलतेला योग्य दिशा देणारे पाऊल  ठरणार आहेअसे मंत्री श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.

 

शैक्षणिक धोरण युवा पिढीचे भवितव्य घडवणारे

 शैक्षणिक धोरण युवा पिढीचे भवितव्य घडवणारे

     उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

 

नेक्स्ट इन डिझाईन फ्युचरयुएएफ एक्सपोचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री यांच्या हस्ते उद्घाटन

 

            मुंबई दि.15 : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण युवा पिढीचे भवितव्य घडवणारे आहे. हे शैक्षणिक धोरण अतिशय व्यावहारिक तसेच सर्जनशीलतेस बळ देणारे आणि आधुनिक स्पर्धेत विद्यार्थ्यांना पुढे नेणारे आहे असे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी केले.

विलेपार्ले येथील प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुल येथे डिझाईन क्षेत्रातील भविष्यातील संधीसाठी उर्मीज आर्ट फोरमतर्फे आयोजित 'नेक्स्ट इन डिझाईन फ्युचरया युएएफ एक्सपोचे उद्घाटन मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते झाले.

 

मंत्री श्री चंद्रकांत पाटील नवे शैक्षणिक धोरण व्यावहारिक असूनयात संशोधनावरही भर देण्यात आला आहे. याशिवाय नव उद्योजकस्टार्टर्स अप यांना प्रोत्साहन दिले जात आहे. त्यासाठी कमी व्याजावर कर्ज उपलब्ध करून दिले जात असूनबाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी शासनाकडून मदतही केली जात आहे. यातूनच स्टार्टअपच्या क्षेत्रात भारत आघाडीवर आहे. मंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणालेकीउर्मीजच्या कला मंचा तर्फे डिझाइनला शालेय स्तरावरील सर्जनशीलता आणि करिअरच्या संधी तसेच एक्स्पोच्या माध्यमातून एकाच छताखाली पोर्टफोलिओ प्रदर्शनकरिअर समुपदेशनविद्यापीठ भागीदारी आणि उद्योग संवाद आयोजित करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना योग्य दिशा देणारे असे उपक्रम प्रेरणादायी ठरतील . अशा उर्मीजच्या कला मंचा एक्स्पोमुळे महाराष्ट्रातील डिझाइन गुणवत्तेला राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी उपलब्ध होतील. 

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाइन भूमिपूजन व लोकार्पण

 मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाइन भूमिपूजन व लोकार्पण 

सुराबर्डीनागपूर येथील गोंडवाना आदिवासी सांस्कृतिक संग्रहालय तथा आदिवासी संशोधन व प्रशिक्षण उपकेंद्राचे भूमिपूजनशासकीय आश्रमशाळाघानवळएकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प जव्हारजि. पालघर येथील इमारतीचे लोकार्पणशासकीय आश्रमशाळा पळसुंडाएकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प जव्हारजि. पालघर येथील प्रयोगशाळा इमारतीचे लोकार्पण. शासकीय आश्रमशाळादेवगावएकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पनाशिक येथील संकुलात मुलींच्या वसतिगृहाचे लोकार्पण मुख्यमंत्री  श्री फडणवीस यांच्या हस्ते दूरदृष्यप्रणालीद्वारे करण्यात आले.

 

            आदिवासी विभागाच्यावतीने आयोजित विविध सांस्कृतिक स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरवही त्यांच्या हस्ते करण्यात आला.

 

            तत्पूर्वीमुख्यमंत्री यांच्या हस्ते 'भगवान बिरसा मुंडा यांच्या जीवनकार्यावर आधारित  चित्रमय पुस्तका'चे  आणि 'आदिवासी परंपरा व सर्जनशिलतायावर आधारित कॉफीटेबल बुकचे प्रकाशन झाले. आमदार सर्वश्री रविंद्र चव्हाणडॉ. आशिष देशमुखमाजी केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांचीही यावेळी उपस्थिती होती.

 

Featured post

Lakshvedhi