मंत्री श्री चंद्रकांत पाटील नवे शैक्षणिक धोरण व्यावहारिक असून, यात संशोधनावरही भर देण्यात आला आहे. याशिवाय नव उद्योजक, स्टार्टर्स अप यांना प्रोत्साहन दिले जात आहे. त्यासाठी कमी व्याजावर कर्ज उपलब्ध करून दिले जात असून, बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी शासनाकडून मदतही केली जात आहे. यातूनच स्टार्टअपच्या क्षेत्रात भारत आघाडीवर आहे. मंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणालेकी, उर्मीजच्या कला मंचा” तर्फे डिझाइनला शालेय स्तरावरील सर्जनशीलता आणि करिअरच्या संधी तसेच एक्स्पोच्या माध्यमातून एकाच छताखाली पोर्टफोलिओ प्रदर्शन, करिअर समुपदेशन, विद्यापीठ भागीदारी आणि उद्योग संवाद आयोजित करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना योग्य दिशा देणारे असे उपक्रम प्रेरणादायी ठरतील . अशा उर्मीजच्या कला मंचा एक्स्पोमुळे महाराष्ट्रातील डिझाइन गुणवत्तेला राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी उपलब्ध होतील.
मुलांच्या शिक्षणात आणि विकासात कला आणि सर्जनशील विषयांची भूमिका महत्त्वाची असते. डिझाइन हा आपल्या जीवनाच्या प्रत्येक पैलूचा अविभाज्य भाग बनला आहे, डिझाईन आता केवळ चित्रकलेपुरते मर्यादित न राहता विज्ञान, सौंदर्यशास्त्र, मानवी गरजा आणि तंत्रज्ञान यांचा समन्वय साधणारे एक व्यापक व्यावसायिक क्षेत्र आहे. एक्स्पोचे आयोजन हे महाराष्ट्रातील सर्जनशीलतेला योग्य दिशा देणारे पाऊल ठरणार आहे, असे मंत्री श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.
No comments:
Post a Comment