Saturday, 15 November 2025

साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कार प्रदान · डॉ. सुरेश सावंत यांच्या ‘आभाळमाया’ला मराठीसाठी पुरस्कार · देशातील २४ भाषांतील बाल साहित्यिकांचा सन्मान

 साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कार प्रदान

·         डॉ. सुरेश सावंत यांच्या आभाळमायाला मराठीसाठी पुरस्कार

·         देशातील २४ भाषांतील बाल  साहित्यिकांचा सन्मान

 

नवी दिल्ली, दि. १४: प्रतिष्ठित साहित्य अकादमीन व बाल साहित्य पुरस्कार २०२५ चे वितरण नवी दिल्ली येथे संपन्न झाले. यात मराठीसाठीचा पुरस्कार ज्येष्ठ बाल साहित्यकार व कवी डॉ. सुरेश सावंत यांना आभाळमाया’ या कवितासंग्रहासाठी प्रदान करण्यात आला. डॉ. सावंत यांच्यासह देशातील २४ भाषांमधील साहित्यकारांना हा सन्मान मिळाला. पुरस्कार वितरण सोहळा  तानसेन मार्गावरील त्रिवेणी कला संगम येथे झाला.

 

साहित्य अकादेमीचे अध्यक्ष माधव कौशिक यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. मुख्य अतिथी म्हणून प्रख्यात गुजराती लेखिका वर्षा दास उपाध्यक्षा कुमुद शर्मा, सचिव पल्लवी प्रशांत होळकर उपस्थित होत्या.प्रत्येक विजेत्याला मानपत्र आणि ५०,००० रुपये रोख रक्कम देण्यात आली. पुरस्कारांची घोषणा १८ जून २०२५ रोजी करण्यात आली होती.

कुष्ठरोग शोध अभियान अंतर्गत राज्यात १७ नोव्हेंबर ते २ डिसेंबर दरम्यान घरोघरी तपासणी

 कुष्ठरोग शोध अभियान अंतर्गत राज्यात

 १७ नोव्हेंबर ते २ डिसेंबर दरम्यान घरोघरी तपासणी

मुंबई, दि.१४ : केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यात मागील पाच वर्षांप्रमाणे यंदाही कुष्ठरोग शोध अभियान राबविण्यात येत आहे. १७ नोव्हेंबर ते २ डिसेंबर २०२५ या कालावधीत राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये व्यापक सर्वेक्षणाद्वारे कुष्ठरोगाचे रुग्ण शोधण्याची मोहीम हाती घेण्यात येणार आहे.

यंदाच्या अभियानात ८.६६ कोटी लोकसंख्या आणि १ कोटी ७३ लाख २५ हजार घरे सर्वेक्षणासाठी निवडली असून६५,८३२ पथके आणि १३,१६६ पर्यवेक्षक या मोहिमेसाठी नियुक्त करण्यात आले आहेत. ग्रामीण भागात प्रत्येक पथक दररोज २० घरेतर शहरी भागात २५ ते ३० घरांना भेट देऊन प्रत्यक्ष शारीरिक तपासणी करणार आहे. प्रत्येक पथकात एक आशा स्वयंसेविका आणि एक पुरुष स्वयंसेवक सहभागी असूनते सलग १४ दिवस सर्वेक्षण करतील.


Crime

 9 नोव्हेंबर 2025 रोजी टँकर क्रमांक MH 43 CE 6278 चे सील काढून अवैधरित्या टँकरमधील पेट्रोल काढून स्वत:च्‍या आर्थिक फायद्यासाठी काळ्याबाजारात परस्पर विक्री करत असल्याचे प्रथम दर्शनी स्पष्ट होत असल्याने अधिकारी व पंचासमक्ष केलेल्या कारवाईमध्ये टँकरचालक लालबहादुर रामनयन हरजनटँकर क्लिनर पिंटू गौतम व सुखविंदर सिंग अजितसिंग सैनी व टँकर क्रमांक MH 43 CE 6278 चे मालक यांचेविरुध्द जीवनावश्यक वस्तू कायदा 1955 अतंर्गत (गुन्हा नोंद क्र 0594/2025) नूसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर कारवाईमध्ये पेट्रोल व डिझेलचा अंदाजित साठा 14,795 लिटर्स व टेम्पो असा एकुण रुपये 33,51,719/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

डिझेल, पेट्रोल व पेट्रोलियम सदृश्य द्रव पदार्थाची अनधिकृत साठवणूक व विक्री करणाऱ्यांविरुध्द कडक कारवाई

 डिझेलपेट्रोल व  पेट्रोलियम सदृश्य द्रव पदार्थाची

 अनधिकृत साठवणूक व विक्री करणाऱ्यांविरुध्द कडक कारवाई

 

 मुंबई, दि. 14 : मुंबई ठाणे शिधावाटप यंत्रणेच्या भरारी पथकामार्फत टागोर नगरगुरुव्दाराजवळविक्रोळी (पुर्व)मुंबई  या ठिकाणी डिझेलपेट्रोल व पेट्रोलयम सदृश्य द्रव पदार्थाची अनधिकृत साठवणूक व विक्री करणाऱ्यांविरुध्द कारवाई करण्यात आली. सदर कारवाईमध्ये पेट्रोल व डिझेलचा अंदाजित साठा 14,795 लिटर्स व टेम्पो असा एकुण रुपये 33,51,719/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला  असल्याची माहिती  नियंत्रक, शिधावाटप व संचालक नागरी पुरवठामुंबई कार्यालयाने प्रसिद्धीपत्राद्वारे दिली आहे. 

 

या प्रकरणी जीवनावश्यक वस्तू कायदा १९५५ अतंर्गत कारवाई करुन संबंधित दोषींविरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला आहे.  मुंबई-ठाणे शिधावाटप क्षेत्रात पेट्रोलडिझेलपेट्रोलियम द्रव पदार्थ यांचे वितरण सुरळीत होणे तसेच त्यामध्ये कोणताही गैरप्रकार होणार नाही याकरीता नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा यांचे मार्गदर्शनाखाली दक्षता पथक गठित करण्यात आलेले आहे. या दक्षता पथकामार्फत जीवनावश्यक वस्तू कायदा 1955 अतंर्गत पुढीलप्रमाणे कारवाई करण्यात आलेली आहे.

Friday, 14 November 2025

प्रत्येक जिल्ह्यात पत्रकारांसाठी 'एआय' प्रशिक्षण कार्यशाळा घेणार

 प्रत्येक जिल्ह्यात पत्रकारांसाठी 'एआयप्रशिक्षण कार्यशाळा घेणार

-         कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा

 

मुंबईदि.१४ : प्रत्येक क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर आणि त्याचे महत्व लक्षात घेऊन  कौशल्यरोजगारउद्योजकता व नाविन्यता विभागातर्फे पत्रकारांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता विषयक कार्यशाळा हा नवा उपक्रम राबवला राबविण्यात येत असून कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात पत्रकारांसाठी विशेष एआय प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात येणार असल्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सांगितले.

रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ आणि मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने मंत्रालय येथील पत्रकार कक्षात एआय संदर्भात चार दिवसीय प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले. समारोप कार्यक्रमात रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ.अपूर्वा पालकरएआय तज्ज्ञ किशोर जशनानी, उपकुलसचिव राजेंद्र तलवारेमंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष दिलीप सपाटेसरचिटणीस दिपक भातुसे, रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचे  प्रशिक्षक लोमेश नारखेडेसल्लागार गजानन हेगडेवरिष्ठ सल्लागार आशिष श्रीवास्तवप्रशासकीय सहाय्यक ऋषी देठेशॉर्ट टर्म कोर्सेसचे शुभम शेंडेश्रावणी कोचरेभूषण पवार तसेच प्रिंट,इलेक्ट्रॉनिकडिजिटल माध्यमांचे पत्रकार उपस्थित होते.

११ ते १४ नोव्हेंबर २०२५ दरम्यान मंत्रालयात आयोजित या कार्यशाळेत  एआय साधनांचा पत्रकारितेसाठी वापरवृत्ताची पडताळणीमाहिती शोधण्याची गतीतसेच डिजिटल कामकाजातील अचूकता आणि सुलभता याविषयी पत्रकारांना मार्गदर्शन मिळाले. या प्रशिक्षणाला पत्रकारांकडून मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता हा उपक्रम राज्यभर नेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार जिल्हा व तालुका स्तरावर काम करणाऱ्या पत्रकारांना आधुनिक एआय साधनांची ओळख आणि त्यांचा वापर प्रत्यक्ष शिकण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

या निर्णयाबद्दल कौशल्य मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणालेआज प्रत्येक पत्रकारावर बातमीच्या वेगासोबतच तिची अचूकता टिकवण्याची जबाबदारी वाढली आहे. अशावेळी एआय ही केवळ तांत्रिक सुविधा नाहीतर कामाला नवी धार देणारे साधन आहे. राज्यातील प्रत्येक पत्रकार अधिक सक्षम व्हावाहा या उपक्रमामागचा उद्देश आहे. या माध्यमातून पत्रकारांद्वारे जनतेचे प्रश्न अधिक प्रभावीपणे मांडले जातील आणि हेच या उपक्रमाचे खरे यश ठरेल", राज्यात अशा प्रकारचा हा पहिलाच उपक्रम असून याचबरोबर रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठात ‘एआय फॉर न्यूज’ या विषयाचा चार महिन्यांचा डिप्लोमा अभ्यासक्रम सुरू करण्याची सूचना आली असून याबाबत सकारात्मक विचार करण्यात येईल, असेही श्री.लोढा यांनी सांगितले.

चार दिवसीय कार्यशाळेत कृत्रिम बुद्धिमत्ता तज्ञ किशोर जशनानी यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता वापरताना द्यायचे प्रॉम्प्टचॅट जीपीटीला असलेले पर्यायत्याचप्रमाणे पत्रकारितेसाठी इतर सहायक टूल्स बनविणे. फोटोवरून बातमी करणेफोटोवरून व्हिडिओ लेखन बनविणे, न्यूज रिपोर्ट बनविणे,  प्रिंट, इलेक्ट्रॉनिक व  डिजिटल मीडियासाठी बातमी लेखन त्याचप्रमाणे चॅट पीडीएफ चा वापर याबाबत माहिती दिली.

रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ. अपूर्वा पालकर म्हणाल्या की‘एआय’ फॉर न्यूज या विषयाचा डिप्लोमा सुरू करण्याची सूचना आली असून याबाबत सकारात्मक विचार करण्यात येईल. कृत्रिम बुद्धिमत्ता ही कार्यशाळा सर्व पत्रकारांना त्यांच्या दैनदिन कामात अत्यंत उपयुक्त ठरेल. पत्रकारांचा या कार्यशाळेला खूप चांगला प्रतिसाद मिळाला.

एआय पत्रकारिता कार्यशाळेमध्ये सहभागी झालेल्या पत्रकारांना मान्यवरांच्या हस्ते सहभागी प्रमाणपत्र वितरित करण्यात आले

पत्रकार दीपक कैतकेसंजय जोगक्लारा लुईस यांनी चार दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेविषयी मनोगत व्यक्त केले.

मंत्रालय विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष दिलीप सपाटे यांनी आभार मानले. सरचिटणीस दीपक भातुसे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यकारिणी सदस्य खंडूराज गायकवाड यांनी कार्यक्रमाचे समन्वयन केले.

0000

प्रतिकृतीच्या माध्यमातून रामकाल पथाची माहिती जाणून घेतली. रामकाल पथ प्रकल्पाच्या माध्यमातून

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संकल्पचित्र आणि प्रतिकृतीच्या माध्यमातून रामकाल पथाची माहिती जाणून घेतली.  रामकाल पथ प्रकल्पाच्या माध्यमातून रामकुंड मार्गरामकाल पथवरील संपूर्ण संरचनांचे संवर्धनदर्शनी भागांचा जीर्णोद्धार तसेच पर्यटकांसाठी पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यात येणार आहे. रामकुंडसीता गुंफाकाळाराम मंदिरराम लक्ष्मण गुंफा आणि इतर ऐतिहासिक मंदिर परिसराचे आध्यात्मिकसांस्कृतिक आणि ऐतिहासिक महत्त्व प्रकल्पामुळे भाविकांपर्यंत पोहोचेल, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नाशिकला रामकाल पथाचे भूमिपूजन

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते

नाशिकला रामकाल पथाचे भूमिपूजन

 

नाशिक दि. 13 : केंद्र शासनाच्या पर्यटन मंत्रालयाच्या माध्यमातून स्पेशल असिस्टंट टू स्टेटस् फॉर कॅपिटल इन्व्हेस्टमेंट’ योजनेंतर्गत 99 कोटी 14 लाख रुपये खर्चातून रामकुंडसह परिसरात साकारण्यात येणाऱ्या रामकाल पथचे भूमीपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज करण्यात आले.

 

            नाशिक येथील रामकुंड परिसरात झालेल्या या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेआपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीष महाजनशालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसेक्रीडा मंत्री ॲड. माणिकराव कोकाटेआमदार ॲड. राहुल ढिकलेआमदार दिलीप बनकरआमदार देवयानी फरांदेआमदार सीमा हिरेविभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडामनाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंहपोलीस आयुक्त संदीप कर्णिकमहानगरपालिका आयुक्त मनीषा खत्रीजिल्हाधिकारी आयुष प्रसादकुंभमेळा अतिरिक्त आयुक्त कल्पना नायरसहायक जिल्हाधिकारी अर्पिता ठुबे आदी उपस्थित होते.

Featured post

Lakshvedhi