साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कार प्रदान
· डॉ. सुरेश सावंत यांच्या ‘आभाळमाया’ला मराठीसाठी पुरस्कार
· देशातील २४ भाषांतील बाल साहित्यिकांचा सन्मान
नवी दिल्ली, दि. १४: प्रतिष्ठित साहित्य अकादमीन व बाल साहित्य पुरस्कार २०२५ चे वितरण नवी दिल्ली येथे संपन्न झाले. यात मराठीसाठीचा पुरस्कार ज्येष्ठ बाल साहित्यकार व कवी डॉ. सुरेश सावंत यांना ‘आभाळमाया’ या कवितासंग्रहासाठी प्रदान करण्यात आला. डॉ. सावंत यांच्यासह देशातील २४ भाषांमधील साहित्यकारांना हा सन्मान मिळाला. पुरस्कार वितरण सोहळा तानसेन मार्गावरील त्रिवेणी कला संगम येथे झाला.
साहित्य अकादेमीचे अध्यक्ष माधव कौशिक यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. मुख्य अतिथी म्हणून प्रख्यात गुजराती लेखिका वर्षा दास , उपाध्यक्षा कुमुद शर्मा, सचिव पल्लवी प्रशांत होळकर उपस्थित होत्या.प्रत्येक विजेत्याला मानपत्र आणि ५०,००० रुपये रोख रक्कम देण्यात आली. पुरस्कारांची घोषणा १८ जून २०२५ रोजी करण्यात आली होती.
No comments:
Post a Comment