Saturday, 15 November 2025

नाशिक, नागपूर, धाराशिव जिल्हा बँकांना ८२७ कोटींचे भागभांडवल ग्रामीण वित्त पुरवठ्याच्या दृष्टीने बँकांच्या सक्षमीकरणाला प्राधान्य

 नाशिकनागपूरधाराशिव जिल्हा बँकांना ८२७ कोटींचे भागभांडवल

ग्रामीण वित्त पुरवठ्याच्या दृष्टीने बँकांच्या सक्षमीकरणाला प्राधान्य

नाशिकनागपूर आणि धाराशिव जिल्हा मध्यवर्ती बँकांना भागभांडवल म्हणून ८२७ कोटी रुपये देण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. यात नाशिक जिल्हा बँकेला ६७२ कोटीनागपूर जिल्हा बँकेला ८१ आणि धाराशिव जिल्हा बँकेला ७४ कोटी रुपये देण्यात येणार आहेत.

            भारतीय रिझर्व्ह बँकेने नाशिकनागपूर आणि धाराशिव जिल्हा मध्यवर्ती बँकांचे पुनर्भांडवलीकरण व पुनरूज्जीवन करण्याबाबत शासनास कळवले आहे. त्यानुसार आज या तीनही बँकांना भागभांडवल म्हणून अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले.

            शेतकऱ्यांना पीककर्ज उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेची भूमिका महत्त्वाची असते. जिल्हा बँकेच्या आर्थिक स्थितीवरच सेवाविकास संस्थांचेही अस्तित्व असते. त्यामुळे नाशिकनागपूर आणि धाराशिव जिल्हा बँक यांना एकूण ८२७ कोटी रुपये भागभांडवल स्वरूपात शासकीय अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले. नाशिक जिल्हा बँकेस यंदाच्या आर्थिक वर्षात ३३६ कोटी आणि पुढील आर्थिक वर्षात ३३६ कोटी वितरित करण्यासही मान्यता देण्यात आली.

            नाशिक आणि नागपूर जिल्हा बँकांवर सध्या प्रशासक कार्यरत आहेत. धाराशिव जिल्हा बँकेवर संचालक मंडळ आहे. मात्र धाराशिव जिल्हा बँकेची स्थिती सातत्याने खालावत असल्याने या बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नियुक्त करण्यासाठी सहकार आयुक्तांना निर्देश देण्यासही मान्यता देण्यात आली.

000

महापरिनिर्वाण दिनानिमित आवश्यक सुविधांबाबत सूक्ष्म नियोजन करा

 महापरिनिर्वाण दिनानिमित आवश्यक सुविधांबाबत सूक्ष्म नियोजन करा

-         मुख्य सचिव राजेश कुमार

 

मुंबईदि. १२ :- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दरवर्षी लाखो अनुयायी मुंबईतील दादर येथील चैत्यभूमीवर येतात. या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सोयीसुविधांसाठी सर्व विभागांनी समन्वयाने सूक्ष्म नियोजन करून त्याची अंमलबजावणी करावीअसे निर्देश मुख्य सचिव राजेश कुमार यांनी दिले.

महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने चैत्यभूमी व शिवाजी पार्क येथे पुरविण्यात येणाऱ्या सुविधांबाबत मुख्य सचिव राजेश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली.

या बैठकीस अपर मुख्य सचिव राजेश अग्रवालमुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशीमाहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंहमुंबई शहर जिल्हाधिकारी आंचल गोयलमुंबई पोलीस आयुक्त देवेन भारतीअपर विभागीय आयुक्त कोकण सिद्धराम सालीमठसामाजिक न्याय विभागाचे सहसचिव सो. ना. बागुलनगरविकास विभागाच्या सहसचिव विद्या हम्पय्यामहापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मुख्य सचिव राजेश कुमार म्हणालेचैत्यभूमी परिसरात मंडप व्यवस्थापिण्याच्या पाण्याची सोयतसेच इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. दादर व आसपासच्या परिसरात वाहतूक पोलीस यंत्रणांनी रहदारीचे योग्य नियोजन आणि नियंत्रण करावे. अनुयायांना मार्गदर्शन मिळावे यासाठी जागोजागी सूचना फलक लावावेत. प्रत्येक विभागाने त्यांची जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडावी, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

भोजन व्यवस्थाआरोग्य सुविधासुरक्षाव्यवस्थापिण्याचे पाणीशौचालय सुविधापरिसर स्वच्छतासीसीटीव्हीची व्यवस्थाविद्युतव्यवस्थापुस्तकांचे स्टॉलतसेच शासकीय जाहिरात व प्रसिध्दी या विषयांवर बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.

बैठकीत महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीच्या वतीने श्री. कांबळे यांनी विविध मागण्या मांडल्या. यावेळी महानगरपालिकेमार्फत पुरविण्यात येणाऱ्या सुविधांची माहिती सादरीकरणाद्वारे देण्यात आली.

Key Services on the Portal and App

 Key Services on the Portal and App

The Sanchar Saathi portal offers the following important services:

  • Know Your Mobile Connections – to check the number of mobile connections registered under a person’s name.
  • Block Your Lost/Stolen Mobile – to block the IMEI of a lost or stolen mobile handset.
  • Verify IMEI – to verify the authenticity of a device and its IMEI number.

These services strengthen mobile identity management and enhance user safety.

In addition, through a special feature named “Chakshu”, citizens can report suspicious calls, SMS, or WhatsApp messages, thereby helping prevent fraud, cybercrime, fake identities, and unsolicited commercial communications.


Sanchar Saathi’ Portal and App: Towards Transparency, Security, and Citizen Participation in the Telecom Sector

 Sanchar Saathi’ Portal and App: Towards Transparency, Security, and Citizen Participation in the Telecom Sector

Mumbai, November 8: To ensure the digital safety of over 1.2 billion telecom subscribers in India, particularly mobile users, the Department of Telecommunications (DoT) has launched a citizen-centric initiative called “Sanchar Saathi.” Introduced in May 2023, this digital platform provides mobile users with greater control over their connections, protection against fraud, and a convenient mechanism to report security threats.

Vinay Jambhali, Director, Mumbai LSA Telecom Department, and Sumnesh Joshi, Deputy Director General (DDG), appealed to citizens across Maharashtra to remain alert and responsible regarding cyber safety.

Citizens are advised to remove unnecessary apps from their mobile devices, keep their phones updated with the latest security software, and download the ‘Sanchar Saathi’ app to benefit from its user-friendly and protective features

Mumbai, November 8: To ensure the digital safety of over 1.2 billion telecom subscribers in India, particularly mobile users, the Department of Telecommunications (DoT) has launched a citizen-centric initiative called “Sanchar Saathi.” Introduced in May 2023, this digital platform provides mobile users with greater control over their connections, protection against fraud, and a convenient mechanism to report security threats.

Vinay Jambhali, Director, Mumbai LSA Telecom Department, and Sumnesh Joshi, Deputy Director General (DDG), appealed to citizens across Maharashtra to remain alert and responsible regarding cyber safety.

Citizens are advised to remove unnecessary apps from their mobile devices, keep their phones updated with the latest security software, and download the ‘Sanchar Saathi’ app to benefit from its user-friendly and protective features

प्रमुख प्रचारकांची संख्या आता 20 ऐवजी 40

 प्रमुख प्रचारकांची संख्या आता 20 ऐवजी 40

 

मुंबईदि. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राजकीय पक्षांकडून जाहीर करण्यात येणाऱ्या प्रमुख प्रचारकांच्या (Star Campaigner) संख्येची मर्यादा आता राज्य निवडणूक आयोगाने 20 वरून 40 केली आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी असलेली प्रमुख प्रचारकांची मर्यादा वाढवून 40 करण्यात यावीअशी मागणी विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी आयोगाच्या कार्यालयात 14 ऑक्टोबर 2025 रोजी झालेल्या बैठकीत केली होती. महाराष्ट्र राज्य राजकीय पक्ष नोंदणीविनियमन आणि निवडणूक चिन्ह (आरक्षण व वाटप) आदेश, 2025’ मधील परिच्छेद 26 मध्ये प्रमुख प्रचारकांसंदर्भातील तपशील नमूद केला आहे. त्यातील तरतुदींच्या आधारे आणि राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी केलेली मागणी लक्षात घेऊन ही संख्या वाढविण्यात आली आहे. राजकीय पक्षांना प्रमुख प्रचारकांची यादी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी संबंधित जिल्हाधिकारी किंवा महानगरपालिका आयुक्त यांच्याकडे सादर करावी लागेल.


डिजिटल युगातील नागरिकांचा साथीदार

 डिजिटल युगातील नागरिकांचा साथीदार

शासनाच्या या उपक्रमामुळे देशातील नागरिक डिजिटल युगात अधिक सुरक्षितसजग आणि सशक्त बनत असूनसंचार साथी हा उपक्रम नागरिकांच्या हिताचा खरा साथीदार ठरत आहे.

अधिक माहितीसाठी  www.sancharsaathi.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या.

Find Wire line Internet Service Providers

 इतर उपयुक्त सेवा

Find Wire line Internet Service Providers (ISPs) या सेवेच्या माध्यमातून नागरिकांना त्यांच्या परिसरातील परवाना धारक इंटरनेट सेवा प्रदात्यांची माहिती सहज उपलब्ध होते. तसेच Trusted Contact Details या वैशिष्ट्याचा वापर करून नागरिक संबंधित वेबसाइटईमेल किंवा संपर्क क्रमांकाची प्रामाणिकता पडताळू शकतातज्यामुळे ऑनलाइन फसवणुकीपासून बचाव करता येतो.

या उपक्रमांतर्गत 2.35 कोटी सिम-संबंधित प्रकरणांचे यशस्वी निराकरण करण्यात आले असून40 लाख मोबाइल हँडसेट ब्लॉकत्यापैकी 25 लाख ट्रेस झाले आहेत. तसेच 39 लाखांहून अधिक संशयास्पद दूरसंचार संसाधनांवर कारवाई करण्यात आली आहे.

संचार साथीचा वापर वाढविण्यासाठी दूरसंचार विभागामार्फत व्यापक जनजागृती आणि प्रसिद्धी मोहिमा राबविण्यात येत आहेत. आता या सेवा मोबाईल अ‍ॅपच्या स्वरूपातही उपलब्ध असल्यामुळे त्या अधिक सुलभ आणि सर्वसामान्य जनतेसाठी उपयुक्त ठरणार आहेत.


Featured post

Lakshvedhi