Friday, 14 November 2025

स्वच्छ, सुंदर आणि सुरक्षित कुंभमेळा होणार - गिरीष महाजन

 स्वच्छसुंदर आणि सुरक्षित कुंभमेळा होणार - गिरीष महाजन

कुंभमंत्री श्री.महाजन म्हणालेसिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने विविध विकासकामांचा शुभारंभ होत आहे. मागील कुंभमेळ्याची दखल घेवून अमेरिकेत शासनाचा सन्मान करण्यात आला होता. यावर्षीदेखील दीड वर्षांनी नाशिक-त्र्यंबकेश्वरमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याचा लौकीक जगभरात पोहोचणाार आहे. यावेळी गतवर्षीपेक्षा अधिक भाविक येण्याची शक्यता आहे. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे प्रयागराजच्या तुलनेत जागा कमी असल्याने येणारा कुंभमेळा सुरक्षित व्हावा यासाठी शासन आणि प्रशासन आतापासून वेगाने काम करीत आहे. स्वच्छसुंदर आणि सुरक्षित कुंभमेळा होण्याच्यादृष्टीने नियोजन करण्यात येत आहे. कायदा-सुव्यवस्थेचे वातावरण कायम ठेवण्यासाठी पोलीस दलातर्फे विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. नाशिक शहराचा विकासपर्यटनाला चालना आणि रोजगार निर्मितीसाठी कुंभमेळा महत्वाचा असून साधू-महंत आणि नाशिकरांनी सहभागी व्हावेघरचे कार्य समजून देशभरातून येणाऱ्या भाविकांच्या आदरातिथ्यासाठी सज्ज व्हावेअसे आवाहन त्यांनी केले.

देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कुंभमेळ्यासाठी साडेपाच हजार कोटी रुपये खर्चाच्या विकासकामांचे भूमीपूजन दर्जेदार विकासकामांनी नाशिकला सुंदर आणि आधुनिक शहर करणार

  देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कुंभमेळ्यासाठी

साडेपाच हजार कोटी रुपये खर्चाच्या विकासकामांचे भूमीपूजन

दर्जेदार विकासकामांनी नाशिकला सुंदर आणि आधुनिक शहर करणार

-         मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

·         साधूसंतांचे मार्गदर्शन आणि नागरिकांच्या

·         सहकार्याने कुंभपर्व यशस्वी होण्याचा मुख्यमंत्र्यांना विश्वास

नाशिकदि. 13 (जिमाका वृत्तसेवा) : येत्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणातर्फे आणि नाशिक महानगरपालिका तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने होणाऱ्या नाशिक शहरातील पाच हजार ६५७ कोटी ८९ लाख रुपये खर्चाच्या विकासकामांचे भूमीपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. सिंहस्थ कुंभमेळ्याची कामे दर्जेदार आणि पारदर्शक पद्धतीने करून नाशिकला सुंदर आणि आधुनिक शहर करणारअशी ग्वाही श्री.फडणवीस यांनी यावेळी दिली.

ठक्कर मैदान येथे आयोजित या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेकुंभमेळा मंत्री गिरीष महाजनशालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसेक्रीडा मंत्री माणिकाराव कोकाटेखासदार राजाभाऊ वाजेखासदार शोभा बच्छावमुख्य सचिव राजेशकुमार व नगर विकास विभागाचे अपर सचिव गोविंदराज (दूरदृष्यप्रणालीद्वारे)जिल्ह्याचे पालक सचिव एकनाथ डवलेनाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ.प्रविण गेडामआयुक्त शेखर सिंह आदी उपस्थित होते.

नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. 15)देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

 नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर

कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही

शनिवारी (ता. 15)देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

 

मुंबईदि. 13 (रानिआ): नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांकरिता संकेतस्थळावर फक्त नामनिर्देशनपत्र व शपथपत्रातीलच माहिती भरणे आवश्यक आहे. त्यासोबत कोणतेही कागदपत्रे सादर (अपलोड) करण्याची आवश्यकता नाही. संकेतस्थळावर संपूर्ण माहिती भरलेल्या नामनिर्देशनपत्राची आणि शपथपत्राची छापील प्रत (प्रिंटआऊट) घेवून व त्यावर सही करून आवश्यक कागदपत्रांसह तो संपूर्ण संच संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे विहित मुदतीत जमा करणे आवश्यक आहेअसे स्पष्टिकरण राज्य निवडणूक आयोगाने केले आहे.

राज्यातील 246 नगरपरिषदा व 42 नगरपंचायतींच्या सदस्यपदासाठी आणि थेट अध्यक्षपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता नामनिर्देशपत्र दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. त्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने https://mahasecelec.in हे संकेतस्थळ विकसित केले आहे. त्यावर नोंदणी करून नगरपरिषद व नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी उमेदवारांना नामनिर्देशनपत्र आणि शपथपत्रातील माहिती भरणे आवश्यक आहे. परिपूर्ण माहिती भरल्यानंतर संकेतस्थळावरून त्याची मुद्रित प्रत (Print Out) काढून त्यावर उमेदवाराची स्वत:ची व सूचकांची स्वाक्षरी करणे आवश्यक आहे. त्यानंतर त्या मूळ प्रतीसह अन्य आवश्यक कागदपत्रांचा (उदा. नगरपरिषद/ नगरपंचायतीचे नादेय प्रमाणपत्रशौचालय वापराबाबतचे प्रमाणपत्र किंवा स्वयंघोषणापत्रनिवडणुकीसाठी बॅंक खात्याचा तपशीलराखीव जागांवरील उमेदवार असल्यास जातप्रमाणपत्रपक्षाचा उमेदवार असल्यास जोडपत्र- 1’ किंवा जोडपत्र- 2’ इत्यादी) संपूर्ण संच विहित मुदतीत संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे दाखल करणे बंधनकारक आहे.

इच्छूक उमेदवारांना नोंदणीसाठी सुरुवातीपासून सुरू केलेले संकेतस्थळ 17 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत 24 तास सुरू असेल. तोपर्यंत त्यावर इच्छूक उमेदवारांना कोणत्याही वेळी नोंदणी करता येते व नोंदणी करताना तयार केलेला लॉगीन आयडी व पासवर्ड आपल्याकडे जपून ठेवावा लागतो. कारण नामनिर्देशनपत्र आणि शपथपत्रातील माहिती भरण्यासाठी ते आवश्यक असते. सही केलेल्या प्रिंटआऊटसह आवश्यक त्या संपूर्ण कागदपत्रांचा संच संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला विहित मुदतीत म्हणजे 17 नोव्हेंबर 2025 पर्यंत दुपारी 3 वाजेपर्यंत सादर करणे आवश्यक आहे. सर्व कागदपत्रांसह नामनिर्देशनपत्र शनिवारी15 नोव्हेंबर 2025 या सुटीच्या दिवशीसुद्धा स्वीकारण्यात यावेतअशा सूचना सर्व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र रविवारी (ता. 16) ते स्वीकारण्यात येणार नाहीत. इच्छूक उमेदवारांना आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून देण्याचेही निर्देश सर्व नगरपरिषदा व नगरपंचायतींना देण्यात आले आहेतअसे राज्य निवडणूक आयोगाने प्रसिद्धिपत्रकाद्वारे कळविले आहे.

 

ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना 'महाराष्ट्र भूषण २०२४' पुरस्कार १४ नोव्हेंबर रोजी प्रदान होणार

 ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना

'महाराष्ट्र भूषण २०२४पुरस्कार १४ नोव्हेंबर रोजी प्रदान होणार

मुंबईदि. १३ :- महाराष्ट्राचा सर्वोच्च नागरी पुरस्कार असलेल्या 'महाराष्ट्र भूषण २०२४या पुरस्कारासाठी ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांची निवड झाली आहे.     

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीससांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांच्या उपस्थितीत उद्या १४ नोव्हेंबर २०२५ रोजी ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. पुरस्कार वितरण समारंभ नोएडाउत्तर प्रदेश येथील त्यांच्या निवासस्थानी होणार आहे. 

000

कुंभमेळ्याने नाशिक जगाच्या नकाशावर झळकेल-

 कुंभमेळ्याने नाशिक जगाच्या नकाशावर झळकेल-उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

उपमुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणालेसिंहस्थ कुंभमेळ्यामुळे नाशिकचा चेहरामोहरा बदलेल आणि शहराचा नियोजनबद्ध विकास होईल. त्यादृष्टीने प्रशासनाने चांगली तयारी केली आहे. कुंभमेळा यशस्वी करण्यासाठी राज्य शासनाने फार पूर्वीपासून तयारी सुरू केली आहे. नाशिकची जगाच्या नकाशावर ओळख निर्माण करणारा हा सोहळा असेल. कुंभपर्व ही नाशिकला सुंदर आणि आधुनिक शहर करण्याची ही संधी आहे.

सिंहस्थ कुंभमेळ्यात ७५ वर्षानंतर त्रिखंड योग जुळून आल्याने हे कुंभपर्व विशेष असून ते २८ महिने चालणार आहे

 सिंहस्थ कुंभमेळ्यात ७५ वर्षानंतर त्रिखंड योग जुळून आल्याने हे कुंभपर्व विशेष असून ते २८ महिने चालणार आहे. ४० ते ४२ पर्वस्नान आणि महत्वाचे अमृतस्नान या कुंभात होणार आहे.  प्रयागराज कुंभमेळ्यात देशातील सांस्कृतिक पुर्नजागरणाच्या मोहिमेची प्रचिती आली. याच कुंभच्या परंपरेत नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कुंभमेळा महत्वाचा मानला जातो. प्रयागराज येथे १५ हजार हेक्टर जागा असून नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे ५०० एकर जागा आहे. अत्यंत कमी जागा असूनही २०१५ मध्ये कुंभमेळ्याचे चांगले आयोजन करण्यात आले. यावेळीदेखील असे आयोजन व्हावे यादृष्टीने शासन आणि प्रशासनाने त्यासाठी आवश्यक तयारी सुरू केली आहेअसेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

कुंभमेळ्यात भाविकांचे व्यवस्थापन व्हावे यासाठी बाह्य वर्तुळाकार मार्ग तयार होत असून भविष्यातल्या नाशिकसाठी

 कुंभमेळ्यात भाविकांचे व्यवस्थापन व्हावे यासाठी बाह्य वर्तुळाकार मार्ग तयार होत असून भविष्यातल्या नाशिकसाठी याचा फायदा होणार आहे. नाशिक विमानतळावर नवीन टर्मिनल इमारतरेल्वे सुविधाबस स्थानकाची सुविधास्मार्ट सीसीटीव्ही यंत्रणेच्या माध्यमातून आधुनिक नाशिक शहर विकसीत करण्यावर भर देण्यात येत आहे. एकूण बाराशे एकर जागा अधिग्रहीत करून त्यावर कुंभाचे आयोजन करण्यात येत आहे. भविष्यातही कुंभच्या आयोजनात कुठलीही अडचण राहणार नाही असा प्रयत्न आहे.  कुंभमेळ्याची ही सर्व कामे पारदर्शी पद्धतीने होतील अशी ग्वाही श्री.फडणवीस यांनी दिली.  विकासकामे करतांना नागरिकांचे नुकसान होऊ देणार नाहीतथापि सामाजिक कार्य समजून नागरिकांनीही विकासकामांना सहकार्य करावे. साधूसंतांनी शासनाला कुंभमेळा आयोजनासाठी मार्गदर्शन करावेत्यांचे मार्गदर्शन महत्वाचे आहेअसे आवाहन मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी केले.

Featured post

Lakshvedhi