देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कुंभमेळ्यासाठी
साडेपाच हजार कोटी रुपये खर्चाच्या विकासकामांचे भूमीपूजन
दर्जेदार विकासकामांनी नाशिकला सुंदर आणि आधुनिक शहर करणार
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
· साधूसंतांचे मार्गदर्शन आणि नागरिकांच्या
· सहकार्याने कुंभपर्व यशस्वी होण्याचा मुख्यमंत्र्यांना विश्वास
नाशिक, दि. 13 (जिमाका वृत्तसेवा) : येत्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणातर्फे आणि नाशिक महानगरपालिका तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने होणाऱ्या नाशिक शहरातील पाच हजार ६५७ कोटी ८९ लाख रुपये खर्चाच्या विकासकामांचे भूमीपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. सिंहस्थ कुंभमेळ्याची कामे दर्जेदार आणि पारदर्शक पद्धतीने करून नाशिकला सुंदर आणि आधुनिक शहर करणार, अशी ग्वाही श्री.फडणवीस यांनी यावेळी दिली.
ठक्कर मैदान येथे आयोजित या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कुंभमेळा मंत्री गिरीष महाजन, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, क्रीडा मंत्री माणिकाराव कोकाटे, खासदार राजाभाऊ वाजे, खासदार शोभा बच्छाव, मुख्य सचिव राजेशकुमार व नगर विकास विभागाचे अपर सचिव गोविंदराज (दूरदृष्यप्रणालीद्वारे), जिल्ह्याचे पालक सचिव एकनाथ डवले, नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ.प्रविण गेडाम, आयुक्त शेखर सिंह आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment