Thursday, 13 November 2025

करमाळा तालुक्यात सिंचनासाठी पाणी उपलब्धतेसंदर्भात आढावा बैठक

 करमाळा तालुक्यात सिंचनासाठी पाणी उपलब्धतेसंदर्भात आढावा बैठक

मुंबईदि. 11:- करमाळा तालुक्यात सिंचनासाठी जलनियोजनानुसार पाणी उपलब्ध होण्यासाठी कुकडी कालवा दुरुस्ती करणे व जलबोगदयाद्वारे माणिकडोह धरणामध्ये अधिक पाणी सोडणे गरजेचे असल्याने या दृष्टीने उपाययोजना करण्यात येतीलअसे जलसंपदा मंत्रीगोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळराधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.

           मंत्रालयात रिठेवाडी उपसा सिंचन योजनेबाबत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. बैठकीस ग्रामविकास मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांची प्रमुख उपस्थित होत.

        यावेळी आमदार नारायण आबा पाटीलजलसंपदा विभागाचे सचिव डॉ संजय बेलसरेसहसचिव अलका आहेररावमुख्य अभियंता चोपडेतसेच लाभ क्षेत्रातील संबंधित ग्रामपंचायतीचे सरपंच उपस्थित होते.

राज्यातील सर्व नागरी / ग्रामीण बिगर कृषी / पगारदार कर्मचारी सहकारी पतसंस्थांच्या कामकाजाची

 राज्यातील सर्व नागरी / ग्रामीण बिगर कृषी / पगारदार कर्मचारी सहकारी पतसंस्थांच्या कामकाजाची माहिती एकत्रित करण्यासाठी 'ऑनलाईन प्रणाली विकसित केली असून या ऑनलाईन प्रणालीद्वारे संस्थेने प्रथम 'प्रोफाईलतयार करणे आवश्यक आहे. २०२४-२५ या आर्थिक वर्षाअखेरची संस्थेची संपूर्ण माहिती भरण्यासाठी विविध टॅब उपलब्ध करून दिले आहेत (१) सर्वसाधारण महिती (२) भांडवल (३) कर्ज व वसुली (४) गुंतवणूक -(५) आर्थिक (६) अंशदान (७) इतर.

या ऑनलाईन प्रणालीचे डॅशबोर्डद्वारे राज्यातील सर्व नागरी / ग्रामीण बिगर कृषी / पगारदार कर्मचारी सहकारी पतसंस्थांची जिल्हानिहाय व प्रकारनिहाय माहिती उपलब्ध होणार असूनसी.आर.आरएस. एल. आर, सी.आर.ए.आर, सी.डी. रेशोढोबळ एन.पी.एनिव्वळ एन.पी.एथकबाकी प्रमाणवर्गीकरणानुसार ठेव रक्कम इ. एकत्रित स्वरुपातील माहिती व आर्थिक निकष पुर्ततेबाबत माहिती सहकार विभागास उपलब्ध होणार आहे.

नियामक मंडळ व प्रणाली बाबत माहिती

 नियामक मंडळ व प्रणाली बाबत माहिती

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमानुसार बिगर कृषी सहकारी पतसंस्थांसाठी स्वतंत्र नियामक मंडळ गठित करण्यात आले आहे. राज्यातील सर्व पतसंस्थाना व्यावसायिक व आर्थिक स्थैर्य मिळणेपतसंस्थामधील ठेवी संरक्षित करणेपतसंस्थांचे आर्थिक व्यवहारांचे निकष/मापदंड निश्चित करुन त्यामध्ये आर्थिक शिस्त आणणेपतसंस्थांमधील ठेवीदारांचे हितरक्षण करण्याकरीता संस्थेच्या नियंत्रणाबाहेरिल कारणाने जर ठेवी परत जाऊ लागल्यास त्या तात्पुरत्या स्वरुपात थोपविणे (अधिस्थगन व निदेश) आणि रोखता व तरलता राखण्यासाठी अर्थसहाय्य पुरवणे हा नियामक मंडळाचा प्रमुख उद्देश आहे.

एका सदस्याची कमाल ठेव रक्कम ठरविणेठेवी आणि तारणी व विनातारणी कर्जावरील व्याजाचा कमाल व किमान दर ठरविणेएक सदस्याला द्यावयाच्या कर्जाची व समूह कर्जाची कमाल मर्यादा ठरविणेरोख निधीची कमाल मर्यादा ठरविणेस्थिरीकरण व तरलता सहाय्य निधीत योगदान करावयाच्या अंशदानाचा दर आणि त्याची नियतकालिकता ठरविणेस्थिरीकरण व तरलता सहाय्य निधीतून ठेवीच्या परताव्यासाठी सहाय्य मिळण्यासाठी पात्रतेचे निकष ठरविणेप्रशासकीय व आस्थापना खर्चाची कमाल मर्यादा ठरविणे हे नियामक मंडळाचा प्रमुख अधिकार आहेत

महाराष्ट्र राज्य बिगर कृषी सहकारी पतसंस्था नियामक मंडळाच्या एमआयएस प्रणालीचा

 महाराष्ट्र राज्य बिगर कृषी सहकारी पतसंस्था नियामक मंडळाच्या एमआयएस प्रणालीचा सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते शुभारंभ

मुंबईदि.११:- महाराष्ट्र राज्य बिगर कृषी सहकारी पतसंस्था नियामक मंडळपुणे यांच्या 'मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टम (https://patsansthaniyamakmandal.in/या संकेतस्थळावरील ऑनलाईन प्रणालीचा सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.

सहकार मंत्री यांच्या मंत्रालयातील दालनात झालेल्या या कार्यक्रमास  सहकार राज्यमंत्री डॉ. पंकज भोयरआमदार प्रशांत ठाकूरसहकार विभागाचे प्रधान सचिव प्रविण दराडेसहकार आयुक्त दीपक तावरेसह सचिव संतोष पाटील यांच्यासह सहकार विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

सहकार मंत्री बाबासाहेब पाटील म्हणालेया व्यवस्थापन माहिती प्रणालीमुळे सहकारी पतसंस्थांची माहिती, सहकारी संस्थामार्फत होणारा व्यवहारकर्जठेवी यांची माहिती एकाच ठिकाणी पाहण्यासाठी उपलब्ध होणार आहे. तसेच या सर्व बाबीवर सहकार विभागास देखरेख करणे सोयीचे होणार आहे. विभागाने माहिती प्रणाली अधिकाधिक अद्ययावत करावी. या प्रणालीवर सर्व सहकारी पतसंस्थांची माहिती विहित कालावधीत भरावी यासाठीही प्रयत्न केले जावेत. भरलेली माहिती डॅशबोर्डवर पाहता यावीअशा सूचनाही सहकार मंत्री पाटील यांनी दिल्या.

श्री गुरू तेग बहादूर यांच्या 350 व्या शहिदी समागम कार्यक्रमाचे आयोजन

 श्री गुरू तेग बहादूर यांच्या 350 व्या शहिदी समागम कार्यक्रमाचे आयोजन

मुंबई दि. १३ : 'हिंद दी चादर श्री गुरू तेग बहादूरयांच्या ३५० व्या शहिदी समागम वर्षानिमित्त देशभर विविध प्रबोधनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. यानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत मुख्य कार्यक्रमाचे आयोजन नांदेड येथे करण्यात आले असल्याची माहिती ‘हिंदी दी चादर श्री गुरू तेग बहादूर ३५० व्या शहिदी समागम’ राज्यस्तरीय समितीने दिली आहे.

श्री गुरू तेग बहादूर हे शीख समाजाचे नववे गुरू आहेत. मानवाधिकारांच्या सुरक्षेसाठी काम करीत असताना ते शहीद झाले. त्यांनी लोकांना सत्यसंयममानवताकरूणा आणि धैर्य या मूल्यांचा संदेश दिला. त्यांच्या ३५० व्या शहिदी समागम वर्षा निमित्त महाराष्ट्र शासन आणि हिंदी दी चादर श्री गुरू तेग बहादूर ३५० व्या शहिदी समागम राज्यस्तरीय समितीच्या संयुक्त विद्यमाने ७ डिसेंबर २०२५ रोजी नागपूर येथे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ२१ डिसेंबर रोजी नवी मुंबई येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तरजानेवारीमध्ये नांदेड येथे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत मुख्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.  

श्री गुरू तेग बहादूर यांच्या ३५० व्या शहिदी समागम कार्यक्रमाचा मुंबई येथील कार्यशाळेने शुभारंभ करण्यात आला होता. श्री गुरू तेग बहादूर यांच्या कार्याचा आणि हौतात्म्याचा इतिहास सर्वदूर विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून पोहोचविण्यात येणार आहे. तहसीलशहर जिल्हा व क्षेत्रीय समितीच्या माध्यमातून प्रत्येक गावात आणि घराघरात श्री गुरू तेग बहादूर यांच्या हौतात्म्याचा इतिहास पोहोचविला जाणार आहे.

या गौरवशाली इतिहासाच्या स्मृती सोहळ्यानिमित्त शिखसिकलीगरबंजारालबानामोहयालसिंधी समाजाचे गुरुबंधुत्व नाते अधिक दृढ होणार आहे. समन्वय समितीच्या माध्यमातून प्रचार व प्रसाराचे कार्य यशस्वीपणे पार पाडणार आहे. श्री गुरू तेग बहादूर यांची शहादत व योगदान हे धर्म आणि मानवतेच्या रक्षणाचे तेजस्वी प्रतीक आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांच्या शौर्याचा आणि श्रद्धेचा गौरव करण्यात येणार आहे. या कार्यक्रमामुळे या सहा समाजाच्या गौरवशालीपराक्रमी आणि धर्मनिष्ठ इतिहासाला नवे बळ मिळणार असून गुरुबंधुत्वाचा हा पवित्र वारसा पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.

कामशेत अपघातानंतर आरोग्य यंत्रणेची तत्परता कौतुकास्पद आरोग्य योजनांमुळे वारकऱ्यांना तत्काळ आणि विनामूल्य उपचार

 कामशेत अपघातानंतर आरोग्य यंत्रणेची तत्परता कौतुकास्पद

आरोग्य योजनांमुळे वारकऱ्यांना तत्काळ आणि विनामूल्य उपचार

 

मुंबईदि. 1जुन्या पुणेमुंबई महामार्गावर पहाटे वारकऱ्यांच्या दिंडीत झालेल्या दुर्दैवी अपघातानंतर प्रशासन आणि आरोग्य विभागाने दाखविलेली तत्परता आणि संवेदनशीलता कौतुकास्पद ठरली आहे. अपघातात जखमी झालेल्या सर्व वारकऱ्यांना महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून पूर्णपणे विनामूल्य आणि गुणवत्तापूर्ण उपचार उपलब्ध करून देण्यात आले.

अपघातानंतर काही मिनिटांतच महावीर हॉस्पिटलकामशेत येथे जखमींना दाखल करण्यात आले. शासनाच्या आपत्कालीन उपचार आदेश (ETI) प्रक्रियेच्या माध्यमातून तत्काळ शस्त्रक्रियाऔषधोपचार आणि आवश्यक वैद्यकीय सेवा सुरू करण्यात आल्या. यामुळे कोणत्याही रुग्णाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला नाही.

राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या आरोग्य योजनांचा लाभ मिळाल्याने रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांना मोठा दिलासा मिळाला आहे. उपचारऔषधे आणि रुग्णालयीन सेवा या सर्व सुविधा शासनाच्या सहाय्याने पूर्णपणे विनामूल्य पुरविण्यात येत आहेत.

या प्रसंगी आरोग्य विभागाने दाखवलेली संवेदनशीलता आरोग्य हक्क — सर्वांसाठी! या शासनाच्या ध्येयाला प्रत्यक्ष कृतीत उतरवणारी ठरली आहे. शासनाच्या आरोग्य योजनांमुळे ग्रामीण आणि वारकरी समाजालाही अत्याधुनिक उपचार सेवा सहज उपलब्ध होत असल्याचे या घटनेतून अधोरेखित झाले.

महावीर हॉस्पिटल प्रशासनस्थानिक पोलीस आणि आरोग्य विभागाने समन्वयातून काम करत सर्व जखमींना तातडीने सेवा उपलब्ध करून दिली. शासनाकडून आवश्यक सुविधाऔषधांचा पुरवठा आणि सर्वतोपरी मदत पुरविण्यात आली आहे.

या घटनेतून शासनाच्या आरोग्य यंत्रणेची कार्यक्षमता आणि सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्य सुरक्षिततेबद्दलची बांधिलकी पुन्हा एकदा दृढ झाली आहे.

समाज में सकारात्मक बदलाव लाने की ताकत प्रशासन में

 समाज में सकारात्मक बदलाव लाने की ताकत प्रशासन में

-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबईदिनांक: 12 नवंबर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने कहा कि समाज के अंतिम व्यक्ति के कल्याण को ध्यान में रखते हुए उनके जीवन में सकारात्मक बदलाव लाने की ताकत प्रशासन में है। इस उद्देश्य की पूर्ति के लिए भारतीय प्रशासनिक सेवा का इस्तेमाल किया जाना चाहिए। मुख्यमंत्री ने यह भी उम्मीद जताई कि नए अधिकारी राज्य के विकास की गाथा को आगे बढ़ाने की जिम्मेदारी को सार्थक रूप से निभाएंगे।

इस अवसर पर मुख्यमंत्री ने प्रशासन में आए नए अधिकारियों के समूह से आह्वान किया कि वे कृत्रिम बुद्धिमत्ता (एआई) आधारित तकनीक का इस्तेमाल कर नागरिक-केन्द्रित और जवाबदेह प्रशासन व्यवस्था बनाएं।

Featured post

Lakshvedhi