Thursday, 13 November 2025

नाशिक जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीतून सर्वसामान्यांसाठी चांगला कारभार होईल

 नाशिक जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीतून

 सर्वसामान्यांसाठी चांगला कारभार होईल

-         मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नाशिकदि. 13 : नाशिक जिल्हा परिषदेची इमारत राज्यातील सर्वात मोठी आणि सुंदर इमारत आहे. या इमारतीतून सर्वसामान्यांसाठी अतिशय चांगला आणि गतिमान कारभार होईलअसा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

नाशिक - त्र्यंबकेश्वर रोडवरील एबीबी सर्कलजवळ उभारण्यात आलेल्या जिल्हा परिषद नूतन प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजलसंपदामंत्री गिरीश महाजनशालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसेक्रीडा व युवक कल्याण मंत्री ॲड. माणिकराव कोकाटेअन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ आदी उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले,  राज्यातील जिल्हा परिषदांच्या इमारतीपैकी सर्वात सुंदर अशी ही इमारत झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मंत्रीलोकप्रतिनिधीजिल्हा परिषदेचे अधिकारीपदाधिकारी यांचे अभिनंदन केले पाहिजे. सुसज्ज सुविधांसह असलेली ही इमारत जनसामान्य व्यक्तींना सुविधा देणारी ठरेलअसा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी मुख्यमंत्री श्री.फडणवीसउपमुख्यमंत्री श्री.शिंदे यांच्यासह मान्यवरांनी इमारतीची पाहणी केली.

नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे 2027 मध्ये होणाऱ्या सिंहस्थ

 नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे 2027 मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने नाशिकचे सांस्कृतिक महत्व जगभरात पोहोचविण्यासाठी शासनातर्फे मोठ्या प्रमाणात विकासकामे हाती घेण्यात आली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून केंद्र सरकारच्या साह्याने हा प्रकल्प उभारला जात आहे. देशभरातून गोदातटी येणाऱ्या भाविकांसाठी आनंददायी अनुभव देण्याच्या दृष्टीने आणि या पवित्र स्थळाचे स्थान महात्म्य त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी हा प्रकल्प महत्वाचा ठरणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नाशिकला रामकाल पथाचे भूमिपूजन

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते

नाशिकला रामकाल पथाचे भूमिपूजन

नाशिक दि. 13 : केंद्र शासनाच्या पर्यटन मंत्रालयाच्या माध्यमातून स्पेशल असिस्टंट टू स्टेटस् फॉर कॅपिटल इन्व्हेस्टमेंट’ योजनेंतर्गत 99 कोटी 14 लाख रुपये खर्चातून रामकुंडसह परिसरात साकारण्यात येणाऱ्या रामकाल पथचे भूमीपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज करण्यात आले.

            नाशिक येथील रामकुंड परिसरात झालेल्या या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेआपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीष महाजनशालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसेक्रीडा मंत्री ॲड. माणिकराव कोकाटेआमदार ॲड. राहुल ढिकलेआमदार दिलीप बनकरआमदार देवयानी फरांदेआमदार सीमा हिरेविभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडामनाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंहपोलीस आयुक्त संदीप कर्णिकमहानगरपालिका आयुक्त मनीषा खत्रीजिल्हाधिकारी आयुष प्रसादकुंभमेळा अतिरिक्त आयुक्त कल्पना नायरसहायक जिल्हाधिकारी अर्पिता ठुबे आदी उपस्थित होते.

धानोरा तालुक्यातील 10 शाळांसाठी सोलर प्रकल्पास मंजुरी

 धानोरा तालुक्यातील 10 शाळांसाठी सोलर प्रकल्पास मंजुरी

मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर गडचिरोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी 31 ऑक्टोबर 2025 रोजी 'सोलर शाळा प्रकल्पा'अंतर्गत रोझी ब्लू फाऊंडेशनला काम करण्यास मंजुरी दिली.

पहिल्या टप्प्यात फाऊंडेशनने धानोरा तालुक्यातील दहा जिल्हा परिषद शाळांमध्ये सौर ऊर्जेवर आधारित युनिट्स उपलब्ध करून देण्याचा उपक्रम हाती घेतला. यात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धानोरामुसक्यासालेभट्टीरांगीनिमगावदुडमलामुरूमगावबन्धोनातसेच जिल्हा परिषद हायस्कूल धानोरा आणि मोहली या शाळांचा समावेश आहे.

या प्रकल्पामुळे शाळांमधील अध्यापन व डिजिटल शैक्षणिक उपक्रमांना वीज पुरवठ्यावरील अवलंबन कमी होऊन अखंड सुविधा मिळेल व या शाळांमधील सुमारे 1,470 विद्यार्थ्यांना याचा थेट लाभ होईल.

मुख्यमंत्र्यांकडून विशेष कौतुक

 मुख्यमंत्र्यांकडून विशेष कौतुक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रोझी ब्लू फाऊंडेशन आणि त्यांच्या स्वयंसेवा प्लॅटफॉर्म 'कनेक्ट फॉर'च्या सामाजिक कार्याची दखल घेत त्यांचे विशेष कौतुक केले.

'कनेक्ट फॉर'च्या संस्थापक श्लोका अंबानी आणि सह-संस्थापक मानिती शाह यांनी गडचिरोली जिल्ह्यावर विशेष लक्ष केंद्रित करावेअशी सूचना स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिली होती.

अंबानी उद्योग समूहातील सदस्य श्लोका अंबानी यांनी नीती आयोगाने आकांक्षित जिल्हा’ म्हणून घोषित केलेल्या गडचिरोलीमध्ये शैक्षणिक पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी घेतलेला पुढाकार अत्यंत प्रशंसनीय असल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून प्रकल्पाला सर्वतोपरी सहकार्य केले जाईलअशी ग्वाहीही त्यांनी दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योजक श्लोका अंबानी यांच्या पुढाकाराने गडचिरोलीत 'सोलर शाळा' उपक्रम

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योजक श्लोका अंबानी

यांच्या पुढाकाराने गडचिरोलीत 'सोलर शाळाउपक्रम

गडचिरोलीदि.13 :  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने आणि अंबानी उद्योग समूहातील सदस्य व 'रोझी ब्लू फाउंडेशन'च्या संचालिका श्लोका अंबानी यांच्या सामाजिक सहकार्यातून नक्षलग्रस्त व दुर्गम गडचिरोली जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांच्या सौर ऊर्जीकरणाचा महत्त्वपूर्ण उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

Featured post

Lakshvedhi