Wednesday, 12 November 2025

संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराज स्मारक उभारणीसंदर्भात बैठक · सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांना संकल्पचित्राचे सादरीकरण

 संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराज स्मारक उभारणीसंदर्भात बैठक

·        सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांना संकल्पचित्राचे सादरीकरण

 

मुंबईदि. 12 :  रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराज स्मारक उभारण्याच्या अनुषंगाने या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील संकल्पचित्राचे सादरीकरण सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांच्याकडे करण्यात आले.

 

माजी आमदार प्रमोद जठार यांनी हे स्मारक वेगवेगळ्या टप्प्यात करून ते अधिक भव्यदिव्य व्हावे अशी मागणी केली होती. स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या धर्तीवर स्मारक उभारावेअशी सूचना केली होती. याबाबत संकल्पना समजून घेण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले.

 

सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.शेलार यांनी पहिल्या टप्प्यात संकल्पचित्रानुसार मुख्य स्मारकाचे काम करण्याचे निर्देश दिले. तसेच माजी आमदार प्रमोद जठार यांनी मांडलेल्या सूचनेनुसार आजूबाजूच्या परिसरात पर्यटकांसाठी सेवासुविधा व विकासाच्या कल्पनांचा अभ्यास करून सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देशी दिले. प्रस्तावित स्मारक 5 एकर क्षेत्रात उभारले जाणार असूनपार्किंग आणि अन्य सुविधांसाठी अतिरिक्त 2 एकर जागा शासनाने घेतली आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

 

बैठकीला माजी आमदार प्रमोद जठार यांच्यासह सांस्कृतिक कार्य विभागपुरातत्व विभागरत्नागिरी जिल्हाधिकारीतहसीलदारसार्वजनिक बांधकाम विभाग व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

000

लंडन मधील ऐतिहासिक ‘इंडिया हाऊस’ महाराष्ट्र शासन ताब्यात घेणार

 लंडन मधील ऐतिहासिक ‘इंडिया हाऊस’ महाराष्ट्र शासन ताब्यात घेणार

- सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार

 

मुंबईदि. 12 : भारतीय स्वातंत्र्यसैनिकांचे वास्तव्य असलेले लंडनमधील "इंडिया हाऊस"  महाराष्ट्र शासन ताब्यात घेऊन त्यास स्मारक म्हणून जतन करेल. या इंडिया हाऊसमध्ये स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे वास्तव्य होतेअशी माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी दिली.

 

सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.शेलार हे नागपूरकरचे रघूजीराजे भोसले यांची ऐतिहासिक तलवार आणण्यासाठी लंडन दौऱ्यावर होतेतेव्हा त्यांनी इंडिया हाऊसला भेट दिली होती. त्यावेळी लंडनस्थित भारतीयांनी ही बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली होती. तसेच नाशिकच्या आमदार देवयानी फरांदे यांनीही ही मागणी केली होती. याबाबत आमदार देवयानी फरांदेसामान्य प्रशासनसांस्कृतिक कार्यपुरातत्व विभागासह संबंधित विभागाचे अधिकारी यांच्या उपस्थितीत संयुक्त बैठक घेऊन आढावा घेण्यात आला.

 

"मित्रा"च्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करून त्यात सामान्य प्रशासन विभागसांस्कृतिक कार्य विभागपुरातत्व विभाग आणि वित्त विभागाचा सहभाग असेल. ही समिती इंडिया हाऊस’ ताब्यात घेण्याबाबतचा सर्वंकष अहवाल तयार करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर केल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

चॅटजीपीटी या साधनाचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिकही दाखविले. त्यांनी सांगितले की, फोटो

 किशोर जस्मानी यांनी चॅटजीपीटी या साधनाचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिकही दाखविले. त्यांनी सांगितले कीफोटो आणि योग्य प्रॉम्प्ट दिल्यानंतर चॅटजीपीटी त्या आधारे वृत्तपत्रीय बातमी तयार करून देते. मात्र यासाठी योग्य प्रॉम्प्ट देणे अत्यावश्यक आहे.

त्याचप्रमाणे चॅटजीपीटीवर आवाज रेकॉर्ड करून हवे त्या भाषेत लेखन करून घेता येतेतसेच व्हॉईस डिक्टेटद्वारेही हे टूल्स पत्रकारांना सहाय्य करते. या प्रक्रियेतून त्यांनी प्रॉम्प्टडिक्टेट आणि डिस्कशन अशा तीन प्रकारची प्रात्यक्षिके करून दाखविली.

‘एआय’ टूल्स हस्तलिखित प्रतीवरून स्वयंचलितपणे टंकलेखन करू शकतात. पीडीएफ स्वरूपातील मजकूर चॅटजीपीटीच्या मदतीने कसा उपयोगात आणता येऊ शकतोयाचे सविस्तर मार्गदर्शनही त्यांनी केले.

या प्रशिक्षण सत्रात उपस्थित पत्रकारांनी ‘एआय’ साधनांचा वापर करून प्रत्यक्ष उदाहरणांद्वारे सराव केला आणि संवादात्मक पद्धतीने मार्गदर्शन घेतले.

000

ओपन एआय, जेमिनी आणि को-पायलट ही तीन प्रमुख एआय टूल्स

 ‘एआय’ तज्ज्ञ किशोर जस्मानी म्हणाले कीओपन एआयजेमिनी आणि को-पायलट ही तीन प्रमुख एआय टूल्स पत्रकारांसाठी अत्यंत उपयुक्त आहेत. तसेच क्लॉडडीपसिक आणि परप्लेक्सिटी ही आणखी तीन प्रभावी टूल्स आहेत. प्रत्येक टूल्सचा वापर आवश्यकतेनुसार आणि उद्दिष्टानुसार करावा. जेमिनी संशोधनासाठी विशेषतः उपयुक्त आहेतर डीपसिक उत्तरे देण्यात अधिक प्रभावी ठरते. मात्रमेटा एआय हे पत्रकारितेसाठी तेवढे परिणामकारक नाहीअसे त्यांनी नमूद केले.

संशोधन आणि विश्लेषण अधिक प्रभावी

 एआय’ साधनांच्या स्मार्ट वापरामुळे बातमी लेखन,

संशोधन आणि विश्लेषण अधिक प्रभावी

- एआय तज्ज्ञ किशोर जस्मानी

मुंबईदि. 12 : पत्रकारितेत कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) साधनांचा योग्य वापर केल्यास बातमी लेखनसंशोधन आणि विश्लेषण अधिक प्रभावी करता येतेअसे मत ‘एआय’ तज्ज्ञ किशोर जस्मानी यांनी केले.

रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ आणि मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने मंत्रालय येथे प्रिंट आणि डिजिटल मीडिया पत्रकारांसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरासंदर्भात प्रशिक्षण सत्र आयोजित करण्यात आलेत्यावेळी जस्मानी यांनी मत व्यक्त केले.

‘एआय’ तज्ज्ञ किशोर जस्मानी म्हणाले कीओपन एआयजेमिनी आणि को-पायलट ही तीन प्रमुख एआय टूल्स पत्रकारांसाठी अत्यंत उपयुक्त आहेत. तसेच क्लॉडडीपसिक आणि परप्लेक्सिटी ही आणखी तीन प्रभावी टूल्स आहेत. प्रत्येक टूल्सचा वापर आवश्यकतेनुसार आणि उद्दिष्टानुसार करावा. जेमिनी संशोधनासाठी विशेषतः उपयुक्त आहेतर डीपसिक उत्तरे देण्यात अधिक प्रभावी ठरते. मात्रमेटा एआय हे पत्रकारितेसाठी तेवढे परिणामकारक नाहीअसे त्यांनी नमूद केले.

संपूर्ण प्रशासकीय धोरणे, प्रक्रिया यांचे ' व्हिजिट' करून ' रिइंजिनिअरिंग' करण्यासाठी शासनाने

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेसंपूर्ण प्रशासकीय धोरणेप्रक्रिया यांचे व्हिजिटकरून रिइंजिनिअरिंगकरण्यासाठी शासनाने १५० दिवसांचा कार्यक्रम आखला आहे. या माध्यमातून बऱ्याच सुधारणा करण्यात येत आहेत. राज्यात सार्वत्रिक औद्योगिक विकास होण्यासाठी गुंतवणूक वाढविण्यावर भर देण्यात येत आहे. मुंबईपुणे प्रमाणेच छत्रपती संभाजी नगरनागपूरनाशिक यासह राज्यात अन्य भागात नवीन औद्योगिक पट्टे निर्माण करण्यात येत आहे. विदर्भामध्ये नागपूर - अमरावती औद्योगिक विकासाचा पट्टा तयार होत आहे. अमरावतीमध्ये पीएम मित्रा पार्क तसेच वस्त्रोद्योग पार्कमुळे औद्योगिक विकासाची परिसंस्था निर्माण करण्यात येत आहे. त्याचा परिणाम म्हणून अमरावती जिल्ह्यातील नांदगाव पेठ औद्योगिक वसाहतीत आज एकही भूखंड शिल्लक राहिलेला नाही. अमरावती विमानतळ नागरी वाहतुकीसाठी खुले करण्यात आले आहे. या ठिकाणी एअर इंडियाच्यावतीने आशिया खंडातील सर्वात मोठे 'पायलट ट्रेनिंग इन्स्टिट्यूटउभारण्यात येत आहे.

संतुलित व सर्वांगीण औद्योगिक विकासासाठी शासन

 संतुलित व सर्वांगीण औद्योगिक विकासासाठी शासन १०० सुधारणा करीत आहे. या सुधारणांसाठी वॉर रूमतयार करण्यात आली आहे. महसूल सुधारणांसाठी सल्लागार नेमण्यापेक्षा प्रशासनातील दांडगा अनुभव असलेल्या अधिकाऱ्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यांच्या अनुभवाचा खूप चांगला परिणाम दिसून येत आहे, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

Featured post

Lakshvedhi