Wednesday, 12 November 2025

राष्ट्रीय जल पुरस्कारात महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक

 राष्ट्रीय जल पुरस्कारात महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक

मुंबईदि ११:-  केंद्रीय जलशक्ती मंत्रालय,  जल संसाधननदी विकास व गंगा संरक्षण विभागयांच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या राष्ट्रीय जल पुरस्कार २०२४ मध्ये महाराष्ट्रराज्याने देशातील सर्वोत्कृष्ट राज्याचा पहिला क्रमांक पटकावला आहे. पाणी संवर्धन आणि व्यवस्थापन क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल हा सन्मान महाराष्ट्रराज्याला जाहीर झाला आहे.

या पुरस्कारात महाराष्ट्रासोबतच नवी मुंबई महानगरपालिकने सर्वोत्कृष्ट शहरी स्थानिक संस्था या गटात प्रथम क्रमांक मिळवला आहेतर कनिफनाथ जल/पाणी वापर सहकारी संस्थानाशिक यांनी सर्वोत्कृष्ट जल/पाणी वापर संस्था  या श्रेणीत द्वितीय क्रमांक पटकावला आहे.

याबाबत केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाचे सचिव व्ही.एल. कांन्ता राव यांनी  राज्याचे मुख्य सचिव  राजेशकुमार यांना  पत्राद्वारे कळविले आहे. हा पुरस्कार वितरण समारंभ १८ नोव्हेंबर २०२५ रोजी नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात पार पडणार असूनराज्याला ट्रॉफीप्रशस्तिपत्र आणि रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे.

राज्याच्या जलसंधारणजलव्यवस्थापन आणि नदी पुनरुज्जीवन क्षेत्रात करण्यात आलेल्या प्रयत्नांना राष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळाल्याबद्दल  मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जलसंपदा (तापी विदर्भ व कोकण खोरे विकास महामंडळ) मंत्री गिरीश महाजनआणि जलसंपदा (गोदावरी व मराठवाडा खोरे विकास महामंडळ) मंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच जलसंपदा विभागाचे अभिनंदन केले आहे.

करमाळा तालुक्यात सिंचनासाठी पाणी उपलब्धता कमी असून जल नियोजनानुसा

 ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे म्हणाले, करमाळा तालुक्यात सिंचनासाठी पाणी उपलब्धता कमी असून जल नियोजनानुसार 5.28 टीएमसी पाणी उपलब्ध करण्यासाठी उपाययोजना आवश्यक आहेत. सद्यस्थितीमध्ये जास्तीत जास्त पाणी यादृष्टीने विभागाने काम करावे. उजनी धरणातील पाणी वाटप नियोजन यापूर्वीच निश्चित झालेले असून त्याऐवजी डिंभे धरणातून माणिकडोह मध्ये पाणी उपलब्ध करून देता येईल, यासह इतर पर्याय तपासून तातडीने कार्यवाही करावी. या दृष्टीने सर्वेक्षण करून अभ्यासपूर्ण अहवाल सादर करण्यात यावा, 45 दिवसात कार्यवाही केली जावी.

      बैठकीमध्ये आमदार आबा पाटील आणि सरपंच अंकुश शिंदे मदन पाटीलरश्मी बागल यांनी यासंदर्भातील माहिती दिली. या भागास सिंचनासाठी पाणी मिळावे या दृष्टीने विभागाच्या वतीने तयार केलेल्या नियोजनावर तसेच वॉपकॉस संस्थेचा अहवाल याबाबतही बैठकीत चर्चा झाली. करमाळा तालुक्यातील 23 हजार 704 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्यासाठी या उपाययोजना 

कुकडी कालव्याचे अस्तरीकरण आणि दुरुस्ती करून पाणी उपलब्धता

 जलसंपदा मंत्री विखे पाटील म्हणालेकुकडी कालव्याचे अस्तरीकरण आणि दुरुस्ती करून पाणी उपलब्धता वाढवता येईल. यामुळे पाणी गळती देखील कमी होईल. माणिकडोह धरणामध्ये अधिक पाणी आणण्यासाठी जलबोगदा करण्याबाबत योजना, पाणी कुकडी कालव्याद्वारे करमाळ्यास आणून येथील बंधारे व धरणामध्ये साठवणे या दृष्टीने उपाययोजनांबाबत आढावा यावेळी घेण्यात आला.    

करमाळा तालुक्यात सिंचनासाठी पाणी उपलब्धतेसंदर्भात आढावा बैठक

 करमाळा तालुक्यात सिंचनासाठी पाणी उपलब्धतेसंदर्भात आढावा बैठक

मुंबईदि. 11:- करमाळा तालुक्यात सिंचनासाठी जलनियोजनानुसार पाणी उपलब्ध होण्यासाठी कुकडी कालवा दुरुस्ती करणे व जलबोगदयाद्वारे माणिकडोह धरणामध्ये अधिक पाणी सोडणे गरजेचे असल्याने या दृष्टीने उपाययोजना करण्यात येतीलअसे जलसंपदा मंत्रीगोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळराधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.

           मंत्रालयात रिठेवाडी उपसा सिंचन योजनेबाबत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. बैठकीस ग्रामविकास मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांची प्रमुख उपस्थित होत.

        यावेळी आमदार नारायण आबा पाटीलजलसंपदा विभागाचे सचिव डॉ संजय बेलसरेसहसचिव अलका आहेररावमुख्य अभियंता चोपडेतसेच लाभ क्षेत्रातील संबंधित ग्रामपंचायतीचे सरपंच उपस्थित होते.

संवेदनशील किंवा दस्तऐवजीकरण ऑनलाईन टूल्समध्ये

 संवेदनशील किंवा दस्तऐवजीकरण ऑनलाईन टूल्समध्ये अपलोड करण्यापूर्वी सतर्कतेची गरज असल्याचे मत व्यक्त करत प्रधान सचिव ब्रिजेश सिंह म्हणाले कीऑनलाईन प्रश्नअपलोड केलेली सामग्री आणि शोधमागील ट्रेस कायम राहतात आणि संबंधित कायदेशीर चौकशीत प्राप्त करण्यायोग्य असू शकतात. त्यामुळे गोपनीय माहिती शेअर करताना व्यवस्थात्मक व कायदेशीर बाबी समजून घेणे गरजेचे ठरत असल्याचे त्यांनी सांगितले.

Tuesday, 11 November 2025

पत्रकारांनी एआय जनरेटेड कंटेंट वापरताना पडताळणी करणे आवश्यक

 पत्रकारांनी एआय जनरेटेड कंटेंट वापरताना पडताळणी करणे आवश्यक

प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह

मुंबईदि. ११ : एआय-जनरेटेड कंटेंटची पडताळणी आता आवश्यक असून डीपफेक तपासासाठी आता १५२० पॅरामीटर्सवर आधारित विशेष टूल्स तयार झाली आहेत. त्याचबरोबरफॅक्ट-चेकिंग संस्थांही सर्व फॅक्ट्स पडताळत नाहीत. त्यामुळे पूर्वग्रह असू शकतो. ‘एआय’मधील बायस हा आज जागतिक पातळीवरील मोठा प्रश्न आहेअसे मत माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी व्यक्त केले.

रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ तसेच मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने मंत्रालयात आयोजित वृत्तपत्र तसेच डिजिटल माध्यम पत्रकारांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता प्रशिक्षण कार्यशाळेत ते बोलत होते.

प्रधान सचिव ब्रिजेश सिंह म्हणाले की‘एआय’ हे सत्याचा स्रोत नाही. ते माहितीचे स्वरूप बदलू शकतातसारांश देऊ शकतातपण ते सत्य ठरवू शकत नाही. नव्या पिढीचे टूल्स (उदा. रिअल-टाइम सर्च करणारी AI) अनेक स्रोतांमधून माहिती गोळा करून त्वरित सारांश देऊ शकतात. हे पत्रकारांना त्वरित संदर्भ देऊन रिपोर्टिंग सोपे करतातपरंतु या माहितीचे स्रोत तपासणे आवश्यक असल्याचेही त्यांनी आर्वजून सांगितले. कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे मिळालेल्या संदर्भांवर मानवी पडताळणी नसतानाही निष्कर्ष देणे धोकादायक ठरू शकते. म्हणूनच मानवी नियमन आणि पडताळणी अनिवार्य असावीअसे त्यांनी ठळकपणे नमूद केले.

महाराष्ट्र राज्यातील गुंतवणुक संधीबाबत निवासी गुंतवणूक आयुक्त यांनी घेतली पीएचडी चेंबर ऑफ कॉमर्स एंड इंडस्ट्री आणि फिक्कीच्या पदाधिकाऱ्यांची भेट

 महाराष्ट्र राज्यातील गुंतवणुक संधीबाबत निवासी गुंतवणूक आयुक्त यांनी घेतली

पीएचडी चेंबर ऑफ कॉमर्स एंड इंडस्ट्री आणि फिक्कीच्या पदाधिकाऱ्यांची भेट

 

नवी दिल्ली, दि. 11 : महाराष्ट्र राज्यातील गुंतवणुकीला चालना देण्यासाठी तसेच उपलब्ध असलेल्या संधीबाबत महाराष्ट्र राज्याचे दिल्ली येथील  निवासी गुंतवणूक आयुक्त सुशील गायकवाड यांनी पीएचडी चेंबर ऑफ कॉमर्स एंड इंडस्ट्री आणि फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री(फिक्की) च्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.

पीएचडी चेंबर ऑफ कॉमर्स एंड इंडस्ट्रीच्या मुख्यालयात मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सरचिटणीस डॉ. रणजित मेहता यांच्यासोबत झालेल्या बैठकीत वेगाने बदलणाऱ्या महाराष्ट्रातील गुंतवणूक संधी तसेच त्याला अधिक चालना देण्यासाठी करावयाच्या योजना आणि अन्य अनुषंगाने सविस्तर चर्चा झाली. गायकवाड यांनी महाराष्ट्र शासनाचे उद्योग धोरणदेण्यात येणाऱ्या सेवासुविधा याबाबत सविस्तर माहिती दिली.

कोपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील निवासी गुंतवणूक आयुक्त यांच्या दालनात फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे (फिक्की)राज्य गुंतवणूक विभाग संचालक तरुण जैन आणि शिवम मोहले यांच्यासोबत महाराष्ट्रातील गुंतवणूक संधी याविषयी सविस्तर चर्चा झाली. यावेळी गायकवाड यांनी महाराष्ट्रातील वेगाने बदलणाऱ्या पायाभूत सुविधागुंतवणूक संधी आणि राज्याच्या जागतिक स्तरावरील प्रगतीविषयी सविस्तर माहिती दिली.

पीएचडी चेंबर ऑफ कॉमर्स एंड इंडस्ट्री आणि फिक्कीच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी चर्चे दरम्यान महाराष्ट्र राज्याच्या गुंतवणुकीला चालना देण्यासाठी सकारात्मकता दर्शविली.

0000000

Featured post

Lakshvedhi