Thursday, 13 November 2025

एआय’ कधीकधी खोटे संदर्भ तयार करू शकते, त्यामुळे वैज्ञानिक किंवा कायदेशीर बाबींमध्ये ‘एआय’ वर अवलंबून

 ‘एआय’ कधीकधी खोटे संदर्भ तयार करू शकतेत्यामुळे वैज्ञानिक किंवा कायदेशीर बाबींमध्ये ‘एआय’ वर अवलंबून राहणे धोकादायक ठरत असल्याचे त्यांनी सांगितले. डीपफेक तयार करणे सोपे झाले आहेपरंतु ते शोधणे कठीण होत चालले आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर ‘एआय’ जनरेटेड कंटेंटवर वॉटरमार्किंगसारखे नियमन असल्याचेही त्यांनी सांगितले

संवेदनशील किंवा दस्तऐवजीकरण ऑनलाईन टूल्समध्ये अपलोड करण्यापूर्वी सतर्कतेची गरज

 संवेदनशील किंवा दस्तऐवजीकरण ऑनलाईन टूल्समध्ये अपलोड करण्यापूर्वी सतर्कतेची गरज असल्याचे मत व्यक्त करत प्रधान सचिव ब्रिजेश सिंह म्हणाले कीऑनलाईन प्रश्नअपलोड केलेली सामग्री आणि शोधमागील ट्रेस कायम राहतात आणि संबंधित कायदेशीर चौकशीत प्राप्त करण्यायोग्य असू शकतात. त्यामुळे गोपनीय माहिती शेअर करताना व्यवस्थात्मक व कायदेशीर बाबी समजून घेणे गरजेचे ठरत असल्याचे त्यांनी सांगितले.

मजूर सहकारी संस्थांना नियमानुसार काम मिळावे

 मजूर सहकारी संस्थांना नियमानुसार काम मिळावे

मजूर सहकारी संस्थांच्या प्रलंबित मागण्यांबाबतही बैठकीत चर्चा करण्यात आली.  मजूर सहकारी संस्थांना शासन नियमानुसार कामे  मिळावीत यासाठी संबंधित विभागांना सहकार विभागाने अवगत करावेअशा सूचना सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिल्या.

या बैठकीस मजूर  सहकारी संस्थांचे राज्यस्तरीय प्रतिनिधी उपस्थित होते.

००००००

नियोजित स्वप्नपूर्ती सहकारी गृहनिर्माण संस्था नोंदणीसाठी प्रस्ताव सादर करावा

 नियोजित स्वप्नपूर्ती सहकारी गृहनिर्माण संस्था नोंदणीसाठी प्रस्ताव सादर करावा

-सहकार मंत्री बाबासाहेब पाटील

 

मुंबईदि. ११:- नवी मुंबईच्या खारघर येथील नियोजित स्वप्नपूर्ती सहकारी गृहनिर्माण संस्था क्रमांक ९ या संस्थेच्या  नोंदणीसाठी आवश्यक माहितीसह प्रस्ताव  सादर करावाअसे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी सांगितले.

सहकार मंत्री पाटील यांच्या दालनात झालेल्या बैठकीच्या वेळी आमदार प्रवीण दरेकरआमदार प्रशांत ठाकूरसहकार विभागाचे प्रधान सचिव प्रविण दराडेसहकार आयुक्त दीपक तावरेसह सचिव संतोष पाटील आदी उपस्थित होते.

नियोजित स्वप्नपूर्ती सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या स्थापनेसाठी नियमानुसार आवश्यक असलेली सभासद संख्या काही कारणास्तव पूर्ण होत नाही. त्यामुळे या संस्थेच्या नोंदणीसाठी  विशेष बाब म्हणून निर्णय घेण्यासाठी प्रस्ताव सादर करावा. असे निर्देश देण्यात आले.

कर्नाळा नागरी सहकारी बँकेकडील ठेवीदारांच्या ठेवींबाबत सहकार विभागाने पुढाकार घ्यावा

 कर्नाळा नागरी सहकारी बँकेकडील ठेवीदारांच्या ठेवींबाबत

सहकार विभागाने पुढाकार घ्यावा

-सहकार मंत्री बाबासाहेब पाटील

 

मुंबईदि. ११:- कर्नाळा नागरी सहकारी बँक लिमिटेडच्या ठेवीदारांना त्यांच्या ठेवी परत देण्यासाठी सहकार विभागाने पुढाकार घ्यावा. या बँकेच्या जप्त मालमत्ताकायदेशीर प्रकरणे या संदर्भात मुख्यमंत्री यांच्याकडे बैठकीचे आयोजन केले जाईल असे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी सांगितले.

सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या दालनात झालेल्या  बैठकीच्या वेळी आमदार प्रवीण दरेकरआमदार प्रशांत ठाकूरसहकार विभागाचे प्रधान सचिव प्रविण दराडेसहकार आयुक्त दीपक तावरेसह सचिव संतोष पाटील आदी उपस्थित होते.

सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी सांगितले, बँकेच्या ठेवीदारांना ठेवी परत देण्यासाठी  बँकेच्या ज्या मालमत्तासंदर्भात न्यायालयीन प्रकरणे सुरू आहेत यासंदर्भात देखील सहकार विभागाने आवश्यक तो पाठपुरावा करावा. एमपीआयडी यांच्याकडील विषयासंदर्भात कायदेशीर सल्ला घेण्यात यावा.

०००००

महाराष्ट्र राज्य बिगर कृषी सहकारी पतसंस्था नियामक मंडळाच्या एमआयएस प्रणालीचाhttps://patsansthaniyamakmandal.in/

 महाराष्ट्र राज्य बिगर कृषी सहकारी पतसंस्था नियामक मंडळाच्या एमआयएस प्रणालीचा सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते शुभारंभ

मुंबईदि.११:- महाराष्ट्र राज्य बिगर कृषी सहकारी पतसंस्था नियामक मंडळपुणे यांच्या 'मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टम (https://patsansthaniyamakmandal.in/या संकेतस्थळावरील ऑनलाईन प्रणालीचा सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.

सहकार मंत्री यांच्या मंत्रालयातील दालनात झालेल्या या कार्यक्रमास  सहकार राज्यमंत्री डॉ. पंकज भोयरआमदार प्रशांत ठाकूरसहकार विभागाचे प्रधान सचिव प्रविण दराडेसहकार आयुक्त दीपक तावरेसह सचिव संतोष पाटील यांच्यासह सहकार विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

सहकार मंत्री बाबासाहेब पाटील म्हणालेया व्यवस्थापन माहिती प्रणालीमुळे सहकारी पतसंस्थांची माहिती, सहकारी संस्थामार्फत होणारा व्यवहारकर्जठेवी यांची माहिती एकाच ठिकाणी पाहण्यासाठी उपलब्ध होणार आहे. तसेच या सर्व बाबीवर सहकार विभागास देखरेख करणे सोयीचे होणार आहे. विभागाने माहिती प्रणाली अधिकाधिक अद्ययावत करावी. या प्रणालीवर सर्व सहकारी पतसंस्थांची माहिती विहित कालावधीत भरावी यासाठीही प्रयत्न केले जावेत. भरलेली माहिती डॅशबोर्डवर पाहता यावीअशा सूचनाही सहकार मंत्री पाटील यांनी दिल्या.

जलसंपदा विभागाच्या कामांवर राष्ट्रीय सन्मानाची मोहोर

 जलसंपदा विभागाच्या कामांवर राष्ट्रीय सन्मानाची मोहोर

-मंत्री गिरीश महाजन

हा सन्मान राज्यातील पाणी संवर्धन उपक्रमांना नवी ऊर्जा देणारा ठरेल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री अजित  पवार यांच्या नेतृत्वाखाली जलसंपदा विभागाच्या विकासकामांवर राष्ट्रीय सन्मानाची मोहोर लागली आहे असे जलसंपदा (विदर्भतापीकोकण खोरे विकास महामंडळ) व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन म्हणाले.

Featured post

Lakshvedhi