नियोजित स्वप्नपूर्ती सहकारी गृहनिर्माण संस्था नोंदणीसाठी प्रस्ताव सादर करावा
-सहकार मंत्री बाबासाहेब पाटील
मुंबई, दि. ११:- नवी मुंबईच्या खारघर येथील नियोजित स्वप्नपूर्ती सहकारी गृहनिर्माण संस्था क्रमांक ९ या संस्थेच्या नोंदणीसाठी आवश्यक माहितीसह प्रस्ताव सादर करावा, असे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी सांगितले.
सहकार मंत्री पाटील यांच्या दालनात झालेल्या बैठकीच्या वेळी आमदार प्रवीण दरेकर, आमदार प्रशांत ठाकूर, सहकार विभागाचे प्रधान सचिव प्रविण दराडे, सहकार आयुक्त दीपक तावरे, सह सचिव संतोष पाटील आदी उपस्थित होते.
नियोजित स्वप्नपूर्ती सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या स्थापनेसाठी नियमानुसार आवश्यक असलेली सभासद संख्या काही कारणास्तव पूर्ण होत नाही. त्यामुळे या संस्थेच्या नोंदणीसाठी विशेष बाब म्हणून निर्णय घेण्यासाठी प्रस्ताव सादर करावा. असे निर्देश देण्यात आले.
No comments:
Post a Comment