Sunday, 9 November 2025

Find Wire line Internet Service Providers (ISPs)” या सेवेच्या माध्यमातून नागरिकांना

 इतर उपयुक्त सेवा

Find Wire line Internet Service Providers (ISPs) या सेवेच्या माध्यमातून नागरिकांना त्यांच्या परिसरातील परवाना धारक इंटरनेट सेवा प्रदात्यांची माहिती सहज उपलब्ध होते. तसेच Trusted Contact Details या वैशिष्ट्याचा वापर करून नागरिक संबंधित वेबसाइटईमेल किंवा संपर्क क्रमांकाची प्रामाणिकता पडताळू शकतातज्यामुळे ऑनलाइन फसवणुकीपासून बचाव करता येतो.

या उपक्रमांतर्गत 2.35 कोटी सिम-संबंधित प्रकरणांचे यशस्वी निराकरण करण्यात आले असून40 लाख मोबाइल हँडसेट ब्लॉकत्यापैकी 25 लाख ट्रेस झाले आहेत. तसेच 39 लाखांहून अधिक संशयास्पद दूरसंचार संसाधनांवर कारवाई करण्यात आली आहे.

संचार साथीचा वापर वाढविण्यासाठी दूरसंचार विभागामार्फत व्यापक जनजागृती आणि प्रसिद्धी मोहिमा राबविण्यात येत आहेत. आता या सेवा मोबाईल अ‍ॅपच्या स्वरूपातही उपलब्ध असल्यामुळे त्या अधिक सुलभ आणि सर्वसामान्य जनतेसाठी उपयुक्त ठरणार आहेत.

राष्ट्रीय सुरक्षेला बळकटी

 राष्ट्रीय सुरक्षेला बळकटी

संचार साथी पोर्टलद्वारे परदेशी क्रमांक भारतीय (+91) क्रमांक म्हणून दाखवून होणाऱ्या फसवणुकीच्या घटनांवर प्रभावी कारवाई करण्यात येत आहे. अशा तक्रारींवर दूरसंचार विभाग आणि पोलिस यांच्यातील समन्वयातून तातडीने तपास व कारवाई करण्यात येते आणि संबंधित फसवणूक नेटवर्क निष्क्रिय केले जातात. यामुळे राष्ट्रीय सुरक्षेला बळकटी मिळते.

नागरिकांना विनंती आहे की त्यांच्या मोबाईलवर आंतरराष्ट्रीय कॉल भारतीय क्रमांकावरून येत असल्यास त्वरित टोल-फ्री क्रमांक 1963 वर माहिती द्यावी.

मोबाईल IMEI माहिती सुरक्षित ठेवा

 मोबाईल IMEI माहिती सुरक्षित ठेवा

नागरिकांना सूचित करण्यात येते की त्यांनी त्यांच्या खरेदी केलेल्या मोबाईल उपकरणांचे मूळ चलन (Invoice) सुरक्षित ठेवावेकारण त्या चलनावर संबंधित उपकरणाचा IMEI क्रमांक नमूद केलेला असतो.

जर मोबाईल उपकरणात दोन सिमकार्ड स्लॉट असतीलतर त्या उपकरणास दोन वेगवेगळे IMEI क्रमांक असतात. वापरकर्त्यांनी *#06# हा कोड डायल करून आपले IMEI क्रमांक तपासावेत आणि त्याचा स्क्रीनशॉट आपल्या ईमेलजीमेल किंवा इतर सुरक्षित ठिकाणी जतन करून ठेवावा. यामुळे उपकरण हरवल्यास संबंधित माहिती सहज उपलब्ध होऊन आवश्यक कार्यवाही करता येईल.

संचार साथीच्या माध्यमातून मोबाईल हरवल्यास त्याचा गैरवापर टाळता येतोतसेच फसवणूक किंवा संशयास्पद कॉलची तक्रार नोंदवून नागरिक स्वतः सायबर सुरक्षिततेच्या साखळीत सक्रिय योगदान देऊ शकतात.


पोर्टल आणि अ‍ॅपवरील प्रमुख सुविधा

 पोर्टल आणि अ‍ॅपवरील प्रमुख सुविधा

संचार साथी पोर्टलवर Know Your Mobile ConnectionsBlock Your Lost/Stolen Mobile आणि Verify IMEI या महत्त्वपूर्ण सेवा उपलब्ध आहेत. या सेवांद्वारे नागरिकांना त्यांच्या मोबाईल क्रमांकांची माहिती तपासणे - म्हणजेच त्यांच्या नावावर एकाच ओळखीसह किती कनेक्शन आहेत हे पाहणेहरवलेले किंवा चोरीस गेलेले मोबाइल डिव्हाइस IMEI ब्लॉक करणेतसेच IMEI क्रमांक आणि डिव्हाइसची प्रामाणिकता पडताळणी करणे शक्य होते.

या सुविधांमुळे मोबाईल ओळख व्यवस्थापन आणि सुरक्षिततेस मोठा हातभार लागला आहे. याशिवाय चक्षु या विशेष सेवेच्या माध्यमातून संशयास्पद कॉलएसएमएस किंवा व्हॉट्सअॅप संदेश यांची नोंद नागरिक करू शकतात. त्यामुळे फसवणूकसायबर गुन्हेबनावट ओळख निर्माण करणे तसेच अवांछित व्यावसायिक संदेशांवर नियंत्रण ठेवणे सोपे झाले आहे.

दूरसंचार क्षेत्रातील पारदर्शकता, सुरक्षितता व जनसहभागाकडे

 दूरसंचार क्षेत्रातील पारदर्शकतासुरक्षितता व जनसहभागाकडे  : संचार साथी’ पोर्टल आणि अ‍ॅप

मुंबईदि. 8: भारतातील 120 कोटींहून अधिक दूरध्वनी ग्राहकांच्याविशेषतः मोबाइल वापरकर्त्यांच्या डिजिटल सुरक्षिततेसाठी दूरसंचार विभागाने (Department of Telecommunications – DoT) संचार साथी हा नागरिक-केंद्रित उपक्रम सुरू केला आहे. मे 2023 मध्ये सुरू झालेल्या या डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे आता मोबाईल वापरकर्त्यांना त्यांच्या कनेक्शनवरील नियंत्रणफसवणुकीपासून संरक्षण आणि सुरक्षा धोक्यांची नोंद करण्याची सुलभ व प्रभावी सुविधा उपलब्ध झाली आहे.

मुंबई एलएसएच्या दूरसंचार विभागाचे संचालक विनय जांभळी आणि उपमहासंचालक (डीडीजी) सुमनेश जोशी यांनी  महाराष्ट्रातील नागरिकांना सायबर सुरक्षिततेबाबत सजग राहण्याचे आवाहन केले.

नागरिकांनी आपल्या मोबाईल डिव्हाइसवरील अनावश्यक अ‍ॅप्स तत्काळ काढून टाकावेत आणि फोन नेहमीच नवीनतम सुरक्षा ॲपसह अपडेट ठेवणे गरजेचे आहे. नागरिकांनी दूरसंचार विभागाचे नागरिक-केंद्रित संचार साथी’ हे अ‍ॅप डाउनलोड करून त्यातील सर्व उपयुक्त वैशिष्ट्यांचा वापर करावा.


एआयसारख्या नवकल्पनामुळे माणसाला यंत्रांशी स्पर्धा करावी

 एआयसारख्या नवकल्पनामुळे माणसाला यंत्रांशी स्पर्धा करावी लागत असतानातंत्रज्ञानाने घडवून आणलेली उलथापालथ समजून घेऊन ते योग्य दिशेने वळविण्याचे आणि समाजाला सकारात्मक दिशा देण्याचे कार्य संस्कार भारतीसह सर्वांना करावे लागेलअसे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.

संस्कार भारतीचे अखिल भारतीय महामंत्री आशीष दळवीअभिनेते नितीश भारद्वाज यांच्यासह अनेक मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती. या सर्वसाधारण सभेत देशभरातून सुमारे चारशे प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. सुरुवातीला संस्कार भारतीचे अखिल भारतीय अध्यक्ष डॉ. मंजुनाथ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत केले.


सांस्कृतिक मूल्यांमुळेच देशात सशक्त लोकशाही

 सांस्कृतिक मूल्यांमुळेच देशात सशक्त लोकशाही

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

संस्कार भारतीची अ.भा. वार्षिक सर्वसाधारण सभा

 

नागपूरदि.8 : आपल्या शेजारी देशांमध्ये लोकशाही टिकू शकली नाही. मात्रभारतात ती अधिक चांगल्या प्रकारे रूजलीकारण आमची मूळ संस्कृतीच लोकशाही आणि सहिष्णूतेच्या मूल्यांवर आधारित आहे. तीच मूल्ये आमच्या संविधानात समाविष्ट असल्याने आम्हाला मजबूत असे संविधान मिळाले आहे. यामुळेच आमचा देश प्रगती करतोय आणि लोकशाही देखील सशक्त होत आहेअसे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.

संस्कार भारतीच्या  अ.भा. वार्षिक सर्वसाधारण सभेच्या उद्घाटन सत्राचे प्रमुख अतिथी म्हणून मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. रेशीमबागेतील महर्षी व्यास सभागृहात दोन दिवस चालणाऱ्या या सभेच्या उद्घाटन सत्रात गुरुदेव सेवा मंडळाचे सरचिटणीस जनार्दन बोथेझाडीपट्टी रंगभूमीचे अध्वर्यू पद्मश्री परशुराम खुणे या विशेष अतिथींसह संस्कार भारतीचे अखिल भारतीय अध्यक्ष डॉ. मैसुरू मंजूनाथविदर्भ प्रदेश अध्यक्षा कांचनताई गडकरी यांची व्यासपीठावर प्रामुख्याने उपस्थिती होती.

एआयसारख्या नवकल्पनामुळे माणसाला यंत्रांशी स्पर्धा करावी लागत असतानातंत्रज्ञानाने घडवून आणलेली उलथापालथ समजून घेऊन ते योग्य दिशेने वळविण्याचे आणि समाजाला सकारात्मक दिशा देण्याचे कार्य संस्कार भारतीसह सर्वांना करावे लागेलअसे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.

संस्कार भारतीचे अखिल भारतीय महामंत्री आशीष दळवीअभिनेते नितीश भारद्वाज यांच्यासह अनेक मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती. या सर्वसाधारण सभेत देशभरातून सुमारे चारशे प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. सुरुवातीला संस्कार भारतीचे अखिल भारतीय अध्यक्ष डॉ. मंजुनाथ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत केले.

00000

Featured post

Lakshvedhi