Sunday, 9 November 2025

मोबाईल IMEI माहिती सुरक्षित ठेवा

 मोबाईल IMEI माहिती सुरक्षित ठेवा

नागरिकांना सूचित करण्यात येते की त्यांनी त्यांच्या खरेदी केलेल्या मोबाईल उपकरणांचे मूळ चलन (Invoice) सुरक्षित ठेवावेकारण त्या चलनावर संबंधित उपकरणाचा IMEI क्रमांक नमूद केलेला असतो.

जर मोबाईल उपकरणात दोन सिमकार्ड स्लॉट असतीलतर त्या उपकरणास दोन वेगवेगळे IMEI क्रमांक असतात. वापरकर्त्यांनी *#06# हा कोड डायल करून आपले IMEI क्रमांक तपासावेत आणि त्याचा स्क्रीनशॉट आपल्या ईमेलजीमेल किंवा इतर सुरक्षित ठिकाणी जतन करून ठेवावा. यामुळे उपकरण हरवल्यास संबंधित माहिती सहज उपलब्ध होऊन आवश्यक कार्यवाही करता येईल.

संचार साथीच्या माध्यमातून मोबाईल हरवल्यास त्याचा गैरवापर टाळता येतोतसेच फसवणूक किंवा संशयास्पद कॉलची तक्रार नोंदवून नागरिक स्वतः सायबर सुरक्षिततेच्या साखळीत सक्रिय योगदान देऊ शकतात.

पोर्टल आणि अ‍ॅपवरील प्रमुख सुविधा

 पोर्टल आणि अ‍ॅपवरील प्रमुख सुविधा

संचार साथी पोर्टलवर Know Your Mobile ConnectionsBlock Your Lost/Stolen Mobile आणि Verify IMEI या महत्त्वपूर्ण सेवा उपलब्ध आहेत. या सेवांद्वारे नागरिकांना त्यांच्या मोबाईल क्रमांकांची माहिती तपासणे - म्हणजेच त्यांच्या नावावर एकाच ओळखीसह किती कनेक्शन आहेत हे पाहणेहरवलेले किंवा चोरीस गेलेले मोबाइल डिव्हाइस IMEI ब्लॉक करणेतसेच IMEI क्रमांक आणि डिव्हाइसची प्रामाणिकता पडताळणी करणे शक्य होते.

या सुविधांमुळे मोबाईल ओळख व्यवस्थापन आणि सुरक्षिततेस मोठा हातभार लागला आहे. याशिवाय चक्षु या विशेष सेवेच्या माध्यमातून संशयास्पद कॉलएसएमएस किंवा व्हॉट्सअॅप संदेश यांची नोंद नागरिक करू शकतात. त्यामुळे फसवणूकसायबर गुन्हेबनावट ओळख निर्माण करणे तसेच अवांछित व्यावसायिक संदेशांवर नियंत्रण ठेवणे सोपे झाले आहे.

दूरसंचार क्षेत्रातील पारदर्शकता, सुरक्षितता व जनसहभागाकडे : ‘संचार साथी’ पोर्टल आणि अ‍ॅप

दूरसंचार क्षेत्रातील पारदर्शकतासुरक्षितता व जनसहभागाकडे  : संचार साथी’ पोर्टल आणि अ‍ॅप

मुंबईदि. 8: भारतातील 120 कोटींहून अधिक दूरध्वनी ग्राहकांच्याविशेषतः मोबाइल वापरकर्त्यांच्या डिजिटल सुरक्षिततेसाठी दूरसंचार विभागाने (Department of Telecommunications – DoT) संचार साथी हा नागरिक-केंद्रित उपक्रम सुरू केला आहे. मे 2023 मध्ये सुरू झालेल्या या डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे आता मोबाईल वापरकर्त्यांना त्यांच्या कनेक्शनवरील नियंत्रणफसवणुकीपासून संरक्षण आणि सुरक्षा धोक्यांची नोंद करण्याची सुलभ व प्रभावी सुविधा उपलब्ध झाली आहे.

मुंबई एलएसएच्या दूरसंचार विभागाचे संचालक विनय जांभळी आणि उपमहासंचालक (डीडीजी) सुमनेश जोशी यांनी  महाराष्ट्रातील नागरिकांना सायबर सुरक्षिततेबाबत सजग राहण्याचे आवाहन केले.

नागरिकांनी आपल्या मोबाईल डिव्हाइसवरील अनावश्यक अ‍ॅप्स तत्काळ काढून टाकावेत आणि फोन नेहमीच नवीनतम सुरक्षा ॲपसह अपडेट ठेवणे गरजेचे आहे. नागरिकांनी दूरसंचार विभागाचे नागरिक-केंद्रित संचार साथी’ हे अ‍ॅप डाउनलोड करून त्यातील सर्व उपयुक्त वैशिष्ट्यांचा वापर करावा.


Saturday, 8 November 2025

मुख्य सचिव राजेशकुमार यांनी केली रामकाल पथसह विविध कामांची पाहणी

 मुख्य सचिव राजेशकुमार यांनी केली

रामकाल पथसह विविध कामांची पाहणी

 

नाशिक, दि. 8 : राज्याचे मुख्य सचिव राजेशकुमार यांनी आज सायंकाळी रामकुंडसह विविध स्थळांना भेट देत पाहणी केली. तसेच याठिकाणी सुरू असलेल्या विविध विकास कामांना गती देण्याचे निर्देश दिले.

 

नाशिक त्र्यंबकेश्वर येथे 2027 मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या सुरू असलेल्या तयारीचा आढावा घेण्यासाठी मुख्य सचिव राजेशकुमार आज नाशिक येथे आले होते. दुपारी विभागीय आयुक्त कार्यालयात आढावा बैठक घेतल्यानंतर त्यांनी द्वारका परिसर, अमृत स्नान पर्वणी मार्ग, रामकुंड, काळाराम मंदिर, सीता गुंफा, स्मार्ट सिटी नियंत्रण कक्ष आदी ठिकाणी भेटी देऊन पाहणी केली.

 

सांस्कृतिक मूल्यांमुळेच देशात सशक्त लोकशाही

 सांस्कृतिक मूल्यांमुळेच देशात सशक्त लोकशाही

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

संस्कार भारतीची अ.भा. वार्षिक सर्वसाधारण सभा

 

नागपूरदि.8 : आपल्या शेजारी देशांमध्ये लोकशाही टिकू शकली नाही. मात्रभारतात ती अधिक चांगल्या प्रकारे रूजलीकारण आमची मूळ संस्कृतीच लोकशाही आणि सहिष्णूतेच्या मूल्यांवर आधारित आहे. तीच मूल्ये आमच्या संविधानात समाविष्ट असल्याने आम्हाला मजबूत असे संविधान मिळाले आहे. यामुळेच आमचा देश प्रगती करतोय आणि लोकशाही देखील सशक्त होत आहेअसे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.

संस्कार भारतीच्या  अ.भा. वार्षिक सर्वसाधारण सभेच्या उद्घाटन सत्राचे प्रमुख अतिथी म्हणून मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. रेशीमबागेतील महर्षी व्यास सभागृहात दोन दिवस चालणाऱ्या या सभेच्या उद्घाटन सत्रात गुरुदेव सेवा मंडळाचे सरचिटणीस जनार्दन बोथेझाडीपट्टी रंगभूमीचे अध्वर्यू पद्मश्री परशुराम खुणे या विशेष अतिथींसह संस्कार भारतीचे अखिल भारतीय अध्यक्ष डॉ. मैसुरू मंजूनाथविदर्भ प्रदेश अध्यक्षा कांचनताई गडकरी यांची व्यासपीठावर प्रामुख्याने उपस्थिती होती.

या चॅटबॉटच्या माध्यमातून राज्य आणि केंद्र शासनाच्या योजनांची माहिती

 सचिव मुंढे म्हणालेया चॅटबॉटच्या माध्यमातून राज्य आणि केंद्र शासनाच्या योजनांची माहिती आता दिव्यांग व्यक्तींना जलद गतीने मिळू शकते. यामुळे तक्रार नोंदवून तिची सद्यस्थिती जाणून घेणे आता सोयीचे झाले आहे. सेल्फ-ट्रॅकिंग’ सुविधेमुळे तक्रारीची सद्यस्थिती थेट व्हाट्सॲपवर तपासता येईल. भाषिणी’ तंत्रज्ञानाच्या साहाय्यानेटाईप करणे शक्य नसलेल्या व्यक्ती आपली तक्रार मराठी किंवा इंग्रजी भाषेत फक्त आवाज रेकॉर्ड करून पाठवू शकतात.

शासनाच्या १५० दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत हा चॅटबॉट तयार करण्यात आला असून हा चॅटबॉट इतर चॅटबॉटपेक्षा वेगळा आहे. यात प्रगत एआय मॉडेलचा वापर केला आहेजे वापरकर्त्याची भाषासंदर्भ आणि तक्रारीच्या विषयाची गंभीरता ओळखून तक्रारीचे आपोआप वर्गीकरण करते व संबंधित अधिकाऱ्याकडे पाठवते. संबंधित अधिकाऱ्यांना २४ तासात तक्रारीची दखल घेणे बंधनकारक आहे.

पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढवण्यासाठी अधिकाऱ्यांना तक्रार निवारणासाठी विशेष डॅशबोर्ड देण्यात आला आहे. तसेच विभाग साप्ताहिक स्तरावर सर्व तक्रारींचा आढावा घेणार असल्याचे सचिव मुंढे यांनी सांगितले.

००००

शैलजा पाटील/विसंअ

भाषिणी’ तंत्रज्ञानावर आधारित व्हॉईस नोटद्वारे तक्रार नोंदवण्याची सोय

 भाषिणी’ तंत्रज्ञानावर आधारित व्हॉईस नोटद्वारे तक्रार नोंदवण्याची सोय

-          सचिव तुकाराम मुंढे

·         दिव्यांग कल्याण विभागाचा एआय आधारित’ व्हाट्सॲप चॅटबॉट

 

 मुंबईदि. ७ : दिव्यांग कल्याण विभागात दिव्यांग व्यक्तींसाठी एआय-आधारित व्हाट्सॲप चॅटबॉट 7821922775 क्रमांक कार्यान्वित आहे. दिव्यांग व्यक्तींसाठी असणाऱ्या योजनांसह तक्रार निवारण व्यवस्था एका क्लिकवर’ उपलब्ध करून देणेहा या सेवेचा मुख्य उद्देश आहे. दिव्यांग व्यक्तींना योजनांची माहिती मिळवताना किंवा तक्रारी दाखल करताना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी ही सेवा सुरू करण्यात आली आहे. या चॅटबॉटमध्ये भाषिणी तंत्रज्ञानावर आधारित व्हॉईस नोटद्वारे तक्रार नोंदवण्याची व्यवस्था आहेअसे दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांनी सांगितले

Featured post

Lakshvedhi