Saturday, 8 November 2025

सांस्कृतिक मूल्यांमुळेच देशात सशक्त लोकशाही

 सांस्कृतिक मूल्यांमुळेच देशात सशक्त लोकशाही

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

संस्कार भारतीची अ.भा. वार्षिक सर्वसाधारण सभा

 

नागपूरदि.8 : आपल्या शेजारी देशांमध्ये लोकशाही टिकू शकली नाही. मात्रभारतात ती अधिक चांगल्या प्रकारे रूजलीकारण आमची मूळ संस्कृतीच लोकशाही आणि सहिष्णूतेच्या मूल्यांवर आधारित आहे. तीच मूल्ये आमच्या संविधानात समाविष्ट असल्याने आम्हाला मजबूत असे संविधान मिळाले आहे. यामुळेच आमचा देश प्रगती करतोय आणि लोकशाही देखील सशक्त होत आहेअसे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.

संस्कार भारतीच्या  अ.भा. वार्षिक सर्वसाधारण सभेच्या उद्घाटन सत्राचे प्रमुख अतिथी म्हणून मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. रेशीमबागेतील महर्षी व्यास सभागृहात दोन दिवस चालणाऱ्या या सभेच्या उद्घाटन सत्रात गुरुदेव सेवा मंडळाचे सरचिटणीस जनार्दन बोथेझाडीपट्टी रंगभूमीचे अध्वर्यू पद्मश्री परशुराम खुणे या विशेष अतिथींसह संस्कार भारतीचे अखिल भारतीय अध्यक्ष डॉ. मैसुरू मंजूनाथविदर्भ प्रदेश अध्यक्षा कांचनताई गडकरी यांची व्यासपीठावर प्रामुख्याने उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi