Friday, 7 November 2025

रासायनिक व भगीरथ खत विभाग

 रासायनिक व भगीरथ खत विभाग - पणन महासंघाने राज्यामध्ये सर्व जिल्ह्यात शेतकऱ्यांना विविध कंपन्यांचे खत पुरवठा करण्याचे काम यशस्वीरित्या पार पाडले आहे. 2024-25 मध्ये पणन महासंघाने 65,274 मे. टन रासायनिक खतांची विक्री केलेली असून 83.29 कोटींची उलाढाल केलेली आहे. तसेच भगीरथ मिश्रखताची 1,316 मे. टन विक्री करण्यात आलेली असून 1.82 लाख रुपयांची उलाढाल झालेली आहे.

 

*महासंघाविषयी :* पणन महासंघ ही महाराष्ट्रातील खरेदी-विक्री व पणन संस्थांची शिखर संस्था असून

 *महासंघाविषयी :*

 

पणन महासंघ ही महाराष्ट्रातील खरेदी-विक्री व पणन संस्थांची शिखर संस्था असून राज्यातील 827 ‘’ वर्ग संस्था पणन महासंघाच्या सभासद आहेत. संस्थेने आजवरच्या काळात शेती व शेतकरी आणि ग्राहक यांच्या विकासासाठी आणि हितसंरक्षणासाठी अभिमानास्पद कामगिरी केलेली आहे. पणन महासंघाने शासनाच्या विविध योजना यशस्वीपणे राबविल्या असून शासनाने पणन महासंघावर टाकलेला विश्वास सार्थ ठरविला आहे. अहवाल सालामध्ये धान व भरडधान्यकडधान्य व तेलबिया खरेदीखत व पशुखाद्य विक्रीचे उल्लेखनीय काम केलेले आहे. शेतीमालाला लाभदायक व वाजवी भाव मिळावा यासाठी विविध भरडधान्य व तेलबिया / कडधान्ये यांची केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत दराने राज्यात खरेदी केलेली आहे. नाफेडएनसीसीएफ व महाराष्ट्र शासनाकरिता पणन महासंघामार्फत कडधान्य (तूरउडीदमुगचना) व तेलबिया (सोयाबीनची) खरेदी झालेली आहे. आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत धान व भरडधान्य (मकाज्वारी व रागी) खरेदी मोठ्या प्रमाणात झाली आहे.

 

रासायनिक व भगीरथ खत विभाग - पणन महासंघाने राज्यामध्ये सर्व जिल्ह्यात शेतकऱ्यांना विविध कंपन्यांचे खत पुरवठा करण्याचे काम यशस्वीरित्या पार पाडले आहे. 2024-25 मध्ये पणन महासंघाने 65,274 मे. टन रासायनिक खतांची विक्री केलेली असून 83.29 कोटींची उलाढाल केलेली आहे. तसेच भगीरथ मिश्रखताची 1,316 मे. टन विक्री करण्यात आलेली असून 1.82 लाख रुपयांची उलाढाल झालेली आहे.

देशात 2202 कोटींची सर्वाधिक सोयाबीन खरेदी महाराष्ट्रात

 व्यवस्थापकीय संचालक डुबे पाटील यांनी महासंघाच्या वर्षभरातील कामाचा आढावा सादर केला. देशात 2202 कोटींची सर्वाधिक सोयाबीन खरेदी महाराष्ट्रात झाली असून याचा लाभ दोन लाख 56 हजार शेतकऱ्यांना झाला असल्याची माहिती त्यांनी दिली. महासंघाची राज्यात 128 ठिकाणी मालमत्ता असून त्यांची क्षमता दोन लाख 80 हजार मे.टन असल्याचे ते म्हणाले. महासंघाने मागील वर्षात 101 कोटींचा निव्वळ नफा मिळविल्याचे त्यांनी सांगितले. महासंघाच्या वतीने पूरग्रस्तांच्या मदतीसाठी 51 लाख रुपयांचा निधी देण्यात आला असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

 

मागील वर्षात राज्य शासन विभागांतर्गत सर्वोत्कृष्ट व्यवहार करणाऱ्या संस्थानाफेड खरेदी विभागांतर्गत सर्वोत्कृष्ट व्यवहार करणाऱ्या संस्थारासायनिक / भगीरथ खत सर्वोत्कृष्ट व्यवहार करणाऱ्या संस्था त्याचप्रमाणे 2024-25 मध्ये उत्कृष्ट कामकाज करणारे पणन महासंघाचे अधिकारी / कर्मचारी यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाची 67 वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

 महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाची 67 वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी सर्व संस्थांनी एकत्रित प्रयत्न करण्याचे

अध्क दत्तात्रय पानसरे यांचे आवाह

मुंबई, दि. ३१ : महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या व्यवसायवृद्धीसाठी प्रयत्न केले जात असून शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी सर्व संलग्न संस्थांनी एकत्रित प्रयत्न करण्याचे आवाहन महासंघाचे अध्यक्ष दत्तात्रय पानसरे यांनी केले

महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाची 67 वी वार्षिक सर्वसाधारण सभा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात झाली. महासंघाचे अध्यक्ष दत्तात्रय पानसरे, उपाध्यक्ष रोहित निकम, व्यवस्थापकीय संचालक श्रीधर डुबे पाटील, महासंघाचे संचालक, अधिकारी तसेच संलग्नित संस्थांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते

दत्तात्रय पानसरे म्हणाले, पीक खरेदीबाबत महासंघामार्फत नियमावली तयार केली जाणार आहे. शेतकऱ्यांना अधिकाधिक लाभ मिळवून देण्यासाठी महासंघाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना नियमित प्रशिक्षण देण्यात यावे, अशी सूचना करुन महासंघाची नवीन गोदामे बांधणे, मालमत्ता सुरक्षित राखणे आणि त्यात वाढ करणे, संकेतस्थळ वापरामध्ये सुलभता आणणे यासाठी महासंघाने प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले. त्याचबरोबर हे वर्ष सहकार वर्ष म्हणून घोषित केलेले असल्याने जास्तीत जास्त सहकारी संस्थांना खरेदीचे कामकाज देण्याबाबत पणन महासंघामार्फत राज्य शासनाला विनंती करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

शालेय विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी जीवन कौशल्ये महत्वाची

 शालेय विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी जीवन कौशल्ये महत्वाची

- शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

 

मुंबईदि. ४ : शालेय विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासासाठी जीवन कौशल्य महत्वाची असून त्यासाठी कार्यक्रम तयार करावा अशा सूचना शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी दिल्या. मंत्रालयात आज शासकीय शाळांमध्ये योग आणि जीवनकौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्याबाबत बैठक झाली त्यावेळी मंत्री भुसे बोलत होते.

 

यावेळी शालेय शिक्षण विभागाचे सचिव रणजीत सिंह देओल यांच्यासह संबंधित अधिकारी आणि आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रतिनिधी उपस्थित होते.

 

मुलांमध्ये चांगले विचार तयार होणे आणि चारित्र्य संपन्न विद्यार्थी घडवणे हा शिक्षणाचा मुख्य उद्देश असल्याचे सांगून मंत्री भुसे म्हणाले कीयोगा हा जीवन कौशल्यचा एक भाग आहे. तसेच स्व संरक्षण आणि कलागुणांनाही वाव मिळाला पाहिजे. मुलांमध्ये या सर्व गोष्टींचा विकास करण्यासाठी कर्यक्रम तयार करावा. प्रायोगिक तत्वावर नाशिक जिल्ह्यातील काही शाळांमध्ये हा उपक्रम रबावण्यात यावा. तसेच येत्या आठ दिवसात या उपक्रमांचा आराखडा तयार करावाअशा सूचनाही मंत्री भुसे यांनी दिल्या.


नाशिक कुंभमेळ्याच्या कामांना गती द्या

 नाशिक कुंभमेळ्याच्या कामांना गती द्या

- सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) शिवेंद्रसिंह राजे भोसले

मुंबईदि. 4 - नाशिक कुंभमेळ्याशी संबंधित विविध कामांचा सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी आढावा घेतला. कुंभमेळ्याशी संबंधित कामांना गती देण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

नाशिक येथील कुंभमेळ्याच्या अनुषंगाने सार्वजनिक बांधकाम विभागाशी संबधित विविध कामांचा मंत्री भोसले यांनी आढावा घेतला. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव (रस्ते) संजय दशपुतेसचिव बांधकामे आबासाहेब नागरगोजेनाशिकचे मुख्य अभियंता प्रशांत औटी यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते. तसेच नाशिक कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

यावेळी मंत्री भोसले यांनी नाशिक कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर करावयाच्या नाशिक विमानतळ विस्तारीकरणनाशिक येथील विश्रामगृहाचे दुरुस्ती व विस्तारीकरणत्र्यंबकेश्वर येथे नवीन विश्रामगृहाचे बांधकामसटाणा येथील विश्रामगृहाचे दुरुस्ती आदी कामांचा आढावा घेतला. नाशिक कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभागाची विविध कामे सुरू झाले आहेत. या कामांना गती देऊन वेळेत कामे पूर्ण करावेअसे मंत्री भोसले यांनी यावेळी सांगितले.

सातारा जिल्ह्यातील मुनावळे प्रकल्पासाठी आवश्यक मंजुरीची प्रक्रिया जलदगतीने राबवावी

 सातारा जिल्ह्यातील मुनावळे प्रकल्पासाठी

आवश्यक मंजुरीची प्रक्रिया जलदगतीने राबवावी

- मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले

मुंबईदि. 4 : सातारा जिल्ह्यातील मुनावळे जल पर्यटन प्रकल्पास आवश्यक वन्यजीव व इतर विभागांची मंजुरी घेण्याची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी. तसेच या प्रकल्पासाठी लागणाऱ्या बोटीहाऊसबोट आदी साहित्य खरेदी लवकर करावीअशा सूचना सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी केल्या.

सातारा जिल्ह्यातील कोयना धरण परिसरातील मुनावळे जल पर्यटन प्रकल्पाच्या कामाचा आज मंत्री भोसले यांनी मंत्रालयात आयोजित बैठकीत आढावा घेतला. यावेळी पर्यटन विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारेमहाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय अधिकारी निलेश गटणे यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते. साताराचे जिल्हाधिकारी संतोष पाटीलएमटीडीसीचे विभागीय वरिष्ठ व्यवस्थापक हनुमंत हेडे यांच्यासह इतर अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

सातारा जिल्ह्यातील पर्यटनाच्या दृष्टीने मुनावळे प्रकल्प हा अतिशय महत्त्वाचा आहे. त्यामुळे या प्रकल्पासाठी आवश्यक असलेले वन्यजीव व इतर विभाग परवाने लवकरात लवकर घ्यावेत. तोपर्यंत प्रकल्पासाठी आवश्यक असणारे साहित्य खरेदी करावे. हाऊस बोटीबोटी दर्जेदार असावेयाची दक्षता घ्यावीअशा सूचनाही मंत्री भोसले यांनी यावेळी केल्या.

००००

Featured post

Lakshvedhi