Friday, 7 November 2025

नवीन फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणीत महाराष्ट्राला देशात सर्वात पुढे ठेवा

 नवीन फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणीत महाराष्ट्राला देशात सर्वात पुढे ठेवा

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

·         नवीन फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणीचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

·         नागपूर, वर्धा येथे नवीन कारागृहाचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश

 

मुंबईदि. ७: नवीन फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणीचा गुन्हे सिद्धतेमध्ये चांगला उपयोग होत आहे. या कायद्यांच्या प्रत्येक घटकातील अंमलबजावणीमध्ये महाराष्ट्राला देशात सर्वात पुढे ठेवावेअसे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा निवासस्थानी नवीन फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणीबाबत आयोजित बैठकीत दिले. ज्या घटकातील अंमलबजावणीमध्ये राज्य मागे आहेअशा घटकाच्या अंमलबजावणीमध्ये पुढील काळात महाराष्ट्र देशात अन्य राज्यांच्या तुलनेत अव्वल असण्याची अपेक्षाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली.

बैठकीस गृह (ग्रामीण) राज्यमंत्री डॉ पंकज भोयरगृह (शहरे) राज्यमंत्री योगेश कदममुख्य सचिव राजेश कुमार उपस्थित होते.

विश्वविजेत्या महिला क्रिकेट संघाचा विजय देशातील मुलींसाठी प्रेरणादायी

 विश्वविजेत्या महिला क्रिकेट संघाचा विजय देशातील मुलींसाठी प्रेरणादायी

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

मुंबईदि.7 : भारताला विश्वचषक जिंकून देणाऱ्या महिला क्रिकेट संघाचा विजय क्रीडा क्षेत्रात येणाऱ्या अनेक मुलींसाठी प्रेरणादायी ठरणार आहेअसे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.

महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मानधनाजेमिमाह रॉड्रिग्जराधा यादव यांना प्रत्येकी २ कोटी २५ लाखतर प्रशिक्षक अमोल मुजुमदार यांना २२ लाख ५० हजार आणि सर्व सहकारी यांना प्रत्येकी ११ लाख रुपये व सन्मानचिन्ह प्रदान करून त्यांचा सत्कार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.

आयसीसी महिला विश्वचषक 2025 मध्ये प्रथमच भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकला असूनमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व खेळाडूप्रशिक्षक आणि सहकाऱ्यांचा वर्षा या शासकीय निवासस्थानी सत्कार केला. गोलंदाजी प्रशिक्षक आविष्कार साळवीपद्मश्री डायना एडल्जीॲनालिस्ट अनिरुद्ध देशपांडेलॉजिस्टिक सपोर्ट अपर्णा गंभीररावऑपरेशन मॅनेजर मारुफ फजानदारमिहिर उपाध्यायपूर्वा काटेममता शिरसुल्ला यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवारक्रीडा व युवक कल्याण मंत्री ॲड. माणिकराव कोकाटेसांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलारप्रधान सचिव संजय खंदारेआयुक्त शितल तेलीउपसचिव सुनील पांढरे उपस्थित आहेत.

सत्कारावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कीविश्वचषकात भारतीय महिला संघाने पहिल्यांदाच विजेतेपद पटकावून इतिहास रचला आहे. याचा संपूर्ण भारतीयांना अभिमान आहे. या विजयाने भारताचा गौरव वाढवला आहे. सुरुवातीच्या काही पराभवानंतर संघाने केलेली पुनरागमनाची कामगिरी उल्लेखनीय आहे. प्रत्येक खेळाडूने कुठल्या ना कुठल्या सामन्यात निर्णायक भूमिका बजावली. प्रशिक्षक आणि संपूर्ण संघाचे विशेष अभिनंदन करावे लागेल. या संघातील एकजूट आणि संघभावना महत्वाची असून यामुळे विजय मिळविणे शक्य झाले.

            स्मृती मानधना सध्या भारतातील आयकॉनिक खेळाडूंमध्ये गणली जाते. तिचा सुरुवातीपासून ते आजपर्यंतचा प्रवास उल्लेखनीय आहे. ती लवकरच दहा हजार धावांचा टप्पा गाठेल. जेमिमाह रॉड्रिग्ज ने ही सेमीफायनलमध्ये अप्रतिम खेळी सादर केली. राधा यादवने संघर्षमय प्रवास करत आपले अस्तित्व निर्माण केले असल्याचे सांगत मुख्यमंत्री फडणवीस यांनी ऑलिम्पिक मध्ये भारतीय महिला संघ विजय मिळवेल अशी अपेक्षा व्यक्त केली. प्रशिक्षक अमोल मुजुमदार यांनी संघासाठी घेतलेली मेहनत आणि क्रिकेटमधील त्यांची कामगिरी प्रेरणादायी आहे. क्रिकेटला लोकप्रिय करणाऱ्या जुन्या पिढीतील सर्व खेळाडूंमुळे आज क्रिकेट या उंचीवर पोहोचले आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांचेही अभिनंदन करताना ते महणाले कीमहिला क्रिकेटला त्यांनी स्वतंत्र ओळख आणि दर्जा मिळवून दिला आहे.

            उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले कीमहिला क्रिकेटच्या दृष्टीने हा एक ऐतिहासिक क्षण आहे.  पद्मश्री डायना एडल्जी यांनी लावलेले रोपटे आज मोठे झाले आहे. ग्रामीण भागातील मुलींना संधी मिळाली तर त्या जागतिक स्तरावर यश प्राप्त करू शकतात हे या क्रिकेट संघातील खेळाडूंनी सिद्ध केले आहे.

या विजयाने क्रीडा रसिकांच्या अपेक्षा वाढल्या असूनभविष्यातही आपण असेच यश प्राप्त कराल अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री पवार यांनी व्यक्त केली.

स्मृती मानधनाजेमिमाह रॉड्रिग्जराधा यादवप्रशिक्षक अमोल मुजुमदार यांनी आभार मानतसर्व संघाचे आणि क्रिकेट प्रेमींचे आभार मानले. बीसीसीआयच्या अखंड पाठिंब्यामुळे आणि खेळासाठी लागणाऱ्या सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे हे शक्य झाले असल्याचे त्यांनी

शहराचा विकास, रोजगार निर्मिती आणि औद्योगिक विकासासाठी हवाई सेवा

 सोलापूरकरिता अत्यंत महत्वाचा दिवस असल्याचे नमूद करून मुख्यमंत्री फडणवीस म्हणालेशहराचा विकासरोजगार निर्मिती आणि औद्योगिक विकासासाठी हवाई सेवा महत्वाची आहे. उद्योजक हवाई सेवेची उपलब्धता पाहून गुंतवणुकीचा निर्णय करतात. जगाच्या बाजाराशी जोडले जात असताना विमानसेवा असणे महत्वाचे आहे. सोलापूरमध्ये विमानतळ असूनही विमानसेवा सुरू होत नव्हती. सोलापूर परिसरात कोणतेही विमानतळ नसल्याने पर्यटनाच्या दृष्टीने या महत्वाच्या जिल्ह्यातील विमानसेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्यात आलेविमानतळाचे नूतनीकरण करण्यात आले.विमानसेवेचे महत्व लक्षात घेवून केंद्र सरकारने ‘आरसीएस’सारखी योजना सुरू केली. राज्य सरकारने सोलापूरसाठी या योजनेअंतर्गत विमानसेवेतील तूट भरून काढण्याचे मान्य केले. ‘आरसीएस’च्या माध्यमातून गॅप फंडिंग म्हणून १८ कोटींची रक्कम देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतल्यानंतर ही विमानसेवा सुरू होत आहे. सोलापूरचे विमानतळ कार्यान्वित झाल्याने लवकरच सोलापूरला आयटी पार्क उभारण्यात येईल. त्यामुळे स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतीलअसा विश्वासही मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.

सोलापूर-मुंबई विमानसेवेमुळे औद्योगिक विकासाला गती

  

सोलापूर-मुंबई विमानसेवेमुळे औद्योगिक विकासाला गती

     मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

·         मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोलापूर-मुंबई विमानसेवेचा शुभारंभ

·         येत्या काळात नाईट लँडिंग सुविधा निर्माण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे सूतोवाच

·         पूर परिस्थितीमध्ये उत्कृष्ट काम केल्याबद्दल पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले कौतुक

 

सोलापूर दि.१५ : नव्याने सुरू करण्यात आलेल्या सोलापूर-मुंबई विमानसेवेमुळे सोलापूर परिसरातील औद्योगिक विकासाला गती मिळेलपर्यटन क्षेत्राला चालना मिळून रोजगाराच्या नव्या संधी निर्माण हेातील. येत्या काळात सोलापूरला नाईट लँडिंग सुविधा आणि बोईंग विमानसेवा सुरू करण्याचे प्रयत्न करण्यात येतीलत्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावेअसे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. सोलापूर-मुंबई विमानसेवेच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.

कार्यक्रमाला केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरेपरिवहन मंत्री प्रताप सरनाईकमाजी मंत्री आमदार सुभाष देशमुखआमदार विजयराव देशमुखसचिन कल्याणशेट्टीदेवेंद्र कोठेमाजी खासदार जयसिद्धेश्वर स्वामीमाजी आमदार नरसिंग मेंगजीजिल्हाधिकारी कुमार आशीर्वादकोल्हापूर परिक्षेत्र आयजी सुनील फुलारीमुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगममनपा आयुक्त सचिन ओंबासेपोलीस शहर आयुक्त एम. राजकुमारपोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णीस्टार एअरचे संजय घोडावत,  एअरपोर्ट ऑथॉरिटीच्या सहायक व्यवस्थापक अंजनी कुमारी आदी उपस्थित होते.

वाटचाल माओवाद समाप्तीकडे

  वाटचाल माओवाद समाप्तीकडे

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

·         सर्वोच्च नेता भूपतीसह ६१ माओवाद्यांचे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सशस्र आत्मसमर्पण

·         मुख्यमंत्र्यांकडून गडचिरोली पोलिसांना १ कोटींचे बक्षीस जाहीर

 

गडचिरोली दि. १५ : केंद्र व राज्य शासनाच्या प्रयत्नातून माओवादी केंद्रीय समितीच्या अनेक जहाल म्होरक्यांसह एकूण ६१ सदस्यांनी सशस्र आत्मसमर्पण केले आहे. ही माओवादाच्या समाप्तीची सुरुवात असून माओवाद पूर्णपणे हद्दपार होणारअशा परिस्थितीत आज आपण पोहोचलो असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. या लढाईचे नेतृत्व गडचिरोली जिल्हा करत असून महाराष्ट्रासाठी हे अभिमानस्पद असल्याचाही उल्लेख त्यांनी केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत गडचिरोली येथे साडेपाच कोटींहून अधिकचे बक्षीस असलेल्या नक्षल चळवळीतील सर्वोच्च नेता भूपती उर्फ मल्लोजुल्ला वेणूगोपालराव याच्यासह माओवादी केंद्रीय समितीच्या दोन डिकेएसझेडसी सदस्य१० डिव्हीसीएम दर्जाच्या वरिष्ठ कॅडरसह  एकूण ६१ जहाल माओवादी सदस्यांनी सशस्र आत्मसमर्पण केले. त्यांनी ५४ अग्निशस्त्रांसह मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर आत्मसमर्पण केले. या सर्व आत्मसमर्पित माओवाद्यांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते संविधानाची प्रत देऊन लोकशाहीच्या मुख्य प्रवाहात स्वागत करण्यात आले.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणात २९० पदांची भरती; कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) १४४ पदांसह विविध जागा www.mjp.maharashtra.gov.in

 महाराष्ट्र जीवन प्राधिकरणात २९० पदांची भरती;

कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) १४४ पदांसह विविध जागा

 

मुंबईदि. ४ : महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मध्ये मोठ्या प्रमाणावर भरती प्रक्रिया सुरू करण्यात येत असून एकूण २९० पदांची भरती आयबीपीएस मार्फत केली जाणार आहे. यासंदर्भातील सविस्तर जाहिरात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकृत संकेतस्थळावर (www.mjp.maharashtra.gov.inप्रसिद्ध करण्यात आली आहेअशी माहिती पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.

 

या भरतीत कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) या पदासाठी सर्वाधिक १४४ पदे उपलब्ध असून त्याशिवाय कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी)लिपिकतसेच इतर तांत्रिक व प्रशासकीय पदे देखील भरण्यात येणार आहेत. या भरती प्रक्रियेमुळे राज्यातील तरुण अभियंत्यांना आणि इतर पात्र उमेदवारांना शासन सेवेत संधी उपलब्ध होणार आहे.

 

मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले कीमहाराष्ट्र जीवन प्राधिकरण राज्यातील ग्रामीण भागात पाणीपुरवठा व स्वच्छता योजना राबवते. या योजनांचे सक्षमीकरण करण्यासाठी तांत्रिक व प्रशासकीय कर्मचाऱ्यांची आवश्यकता होती. त्यामुळे पारदर्शक पद्धतीने आयबीपीएस मार्फत ही भरती करण्यात येणार आहे.

           

जाहिरातीमध्ये शैक्षणिक पात्रतावयोमर्यादाआरक्षण निकषतसेच अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे. उमेदवारांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर भेट देऊन आवश्यक माहिती व अर्ज प्रक्रिया पूर्ण करावीअसे आवाहन करण्यात आले आहे.

 

या भरतीमुळे राज्यातील पाणीपुरवठा प्रकल्पांच्या कामकाजाला गती मिळणार असून स्थानिक रोजगारनिर्मितीलाही चालना मिळेलअसा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त करण्यात आला आहे.

0000

सौर ऊर्जेच्या माध्यमातून राज्याने मोठी झेप घेतली असून सध्या एकूण ११,७०३ मेगावॅट वीज निर्मिती

 सौर ऊर्जेच्या माध्यमातून राज्याने मोठी झेप घेतली असून सध्या एकूण ११,७०३ मेगावॅट वीज निर्मिती केली जात आहे. यात ग्रिड-कनेक्टेड सौर प्रकल्प, छतावरील सौर प्रणाली आणि मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० यांचा समावेश आहे. या योजनांमुळे शेतकऱ्यांना स्वस्त, स्वच्छ आणि टिकाऊ ऊर्जेचा लाभ मिळत आहे.


              राज्य शासनाने आठ ग्रीन हायड्रोजन उत्पादकांसोबत सामंजस्य करार केले असून, त्यातून १,०१० किलो टन प्रति वर्ष उत्पादनाची अपेक्षा आहे. या प्रकल्पांमुळे सुमारे २,९१,३०० कोटी रुपयांची गुंतवणूक, ५.६७ दशलक्ष टन कार्बन उत्सर्जनात घट आणि सुमारे ६८,००० रोजगार संधी निर्माण होतील

Featured post

Lakshvedhi