Friday, 7 November 2025

चैत्यभूमी येथे अनुयायांची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी

 राज्यमंत्री आठवले म्हणालेचैत्यभूमी येथे अनुयायांची कोणतीही गैरसोय होऊ नयेयासाठी मुंबई महापालिकागृह विभाग व सामाजिक न्याय विभाग तसेच सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. प्रत्येक विभागाने आपल्याला दिलेली जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडावी. गर्दी टाळण्यासाठी तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने खबरदारी घ्यावी. गर्दी नियंत्रणवाहतूक व्यवस्थापनसुरक्षा व्यवस्थापिण्याचे पाणीशौचालयआरोग्य सुविधाप्रकाश व्यवस्था आणि परिसर स्वच्छता या सर्व बाबींकडे विशेष लक्ष द्यावे. तसेच पोलीस प्रशासनाने अनुचित प्रकार टाळण्यासाठी सतर्क राहावेअसे राज्यमंत्री आठवले यांनी सांगितले.

महापरिनिर्वाण दिनानिमित्त अनुयायांसाठी उत्तम दर्जाच्या सुविधा पुरवाव्यात

 महापरिनिर्वाण दिनानिमित्त अनुयायांसाठी उत्तम दर्जाच्या सुविधा पुरवाव्यात

- केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

मुंबईदि. ६ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी येथे देशभरातून लाखो अनुयायी अभिवादन करण्यासाठी येतात. या अनुयायांना कोणतीही गैरसोय होऊ नये आणि त्यांना आवश्यक त्या सर्व सुविधा पुरवाव्यातअसे निर्देश केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वतयारीबाबत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस माजी राज्यमंत्री अविनाश महातेकरमुंबई शहर जिल्हाधिकारी आंचल  गोयलपोलीस महानिरीक्षक मनोज शर्मामुंबई महानगरपालिकेचे उपायुक्त प्रशांत सपकाळेबार्टीचे महासंचालक सुनिल वारेसामाजिक न्याय विभागाचे सहसचिव सो. ना. बागुलतसेच भन्ते डॉ.राहुल बोधीमहापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे आणि विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

एम्स मधील नॅट केंद्राचा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ

 एम्स मधील नॅट केंद्राचा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ

नागपूर, दि. ६ : अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) नागपूर येथील न्युक्लिक ॲसिड टेस्टिंग (एनएटी) सेंटरचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला. अशा प्रकारची सुविधा असणारी एम्स ही मध्य भारतातील पहिलीच सरकारी आरोग्य संस्था आहे. याचवेळी गॅमा ब्लड इरॅडिएटर या उपकरणाचेही उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. एम्सच्या रक्त संक्रमण विभागातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

               एनएटी ही रक्तलाळ किंवा इतर नमुन्यातून रोगजंतू त्वरेने शोधणारी चाचणी आहे. या चाचणी द्वारे एचआयव्हीहेपेटायटिस बीहेपेटायटिस सी या सारख्या गंभीर आजारांचे निदान प्राथमिक अवस्थेतच होऊन संबंधित रुग्णावर तातडीने उपचार सुरू होऊ शकतात. अचूक निदान हे या चाचणीचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. हे उपकरण रक्तपेढ्यांमध्ये लावल्यास गरजू रुग्णांना दूषित रक्त देण्याचा धोका जवळपास संपतो. गॅमा ब्लड इरॅडिएटरद्वारे अतिशय शुद्ध रक्त गरजू रुग्णांना मिळू शकते. रक्त संक्रमणातून होणारे आजार या उपकरणामुळे रोखले जातात.

              मुख्यमंत्री फडणवीस यांनी या दोन्ही उपकरणांची प्रशंसा करतानाच समाजातील गरजूंना त्याचा अधिकाधिक लाभ मिळावाअशी अपेक्षा यावेळी व्यक्त केली. प्रारंभी एम्सचे कार्यकारी संचालक डॉ. प्रशांत जोशी यांनी मुख्यमंत्र्यांचे यावेळी स्वागत केले. अधिष्ठाता डॉ. मृणाल पाठकमहाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे प्रशासक डॉ. विंकी रुघवाणीएम्स मधील रक्त संक्रमण विभाग प्रमुख डॉ. सौम्या दासडॉ. पराग फुलझेलेडॉ. रौनक दुबे यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऐकली जनतेची गाऱ्हाणी

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऐकली जनतेची गाऱ्हाणी

नागपूरदि. 6 : रामगिरी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांना भेटून त्यांचे निवेदन स्वीकारून त्यांची गाऱ्हाणी ऐकली तसेच त्यांच्या अडचणी सोडविण्यासंदर्भात आश्वस्त केले.

रामगिरी येथे मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते. यामध्ये महिलादिव्यांगजेष्ठ नागरिक यांचा समावेश होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येक नागरिकांला भेटून त्यांची निवेदन स्वीकारली. यावेळी नागरिकांनी त्यांच्या वैयक्तिक अडचणी तसेच आरोग्यासंदर्भात येणाऱ्या अडचणीविविध शासकीय व निमशासकीय कार्यालयांकडे असलेले प्रलंबित प्रश्नमुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षअनुकंपा नोकरी आदी प्रश्नाबाबत निवेदन सादर केली. प्रत्येक नागरिकाला त्यांच्या तक्रारीसंदर्भात मुख्यमंत्री फडणवीस यांनी समाधान केले. 

राज्यात निर्माण झालेल्या अतिवृष्टी व पूरामुळे बाधित शेतकऱ्यांना सहाय्य व्हावे यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी मुख्यमंत्र्यांना नागरिकांनी यावेळी धनादेश दिला. निवेदन सादर करणाऱ्यांमध्ये विविध संस्था व लोकप्रतिनिधींचा समावेश होता. 

जेईई व नीटसाठी निवड झालेल्या उमेदवारांनी प्रशिक्षण केंद्र निवडावेhttps://cpetp.barti.in/

 जेईई व नीटसाठी निवड झालेल्या उमेदवारांनी प्रशिक्षण केंद्र निवडावे

-         व्यवस्थापकीय संचालक सुनील वारे

मुंबईदि. ६ : मांतग व तत्सम जातींच्या विद्यार्थ्यांना वैद्यकीय व अभियांत्रिकी क्षेत्रात करिअर करण्यासाठी अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण (आर्टी) संस्था मार्फत राज्यातील पुणेमुंबईनाशिक छत्रपती संभाजीनगरलातूरअमरावती व नागपूर या ठिकाणी जेईई (JEE) व नीट (NEET) परीक्षेचे पूर्व प्रशिक्षण देण्यात येत आहे. त्यासाठी निवड झालेल्या उमेदवारांनी प्रशिक्षण केंद्राची निवड करावीअसे आवाहन आर्टीचे व्यवस्थापकीय संचालक सुनील वारे यांनी केले आहे.

जेईई व नीट प्रशिक्षण देणाऱ्या विद्यार्थ्यांची तात्पुरती निवड यादी व प्रतीक्षा यादी आर्टीने प्रसिद्ध केली होती. त्यानुसार विद्यार्थ्यांची कागदपत्र पडताळणी करण्यात आली. कागदपत्र पडताळणी पुर्ण केलेल्या उमेदवारांची प्रशिक्षणासाठी अंतिम निवड करण्यात आली असून अशा विद्यार्थ्यांची यादी आर्टीच्या संकेतस्थळावर लावण्यात आली आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी https://cpetp.barti.in/ या संकेतस्थळावर जाऊन १० नोव्हेंबर २०२५ पर्यंत प्रशिक्षण केंद्राची निवड करावी. जेईई व नीटसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना नि:शुल्क प्रशिक्षणदरमहा ६ हजार रुपये विद्यावेतनत्याचबरोबर पुस्तकांसाठी वर्षातून एकवेळ पाच हजार रुपये आणि प्रशिक्षण केंद्रांना त्यांचे शुल्क आर्टीच्या वतीने देण्यात येणार असल्याचे व्यवस्थापकीय संचालक सुनिल वारे यांनी सांगितले.

आचारसंहितेसंदर्भातील प्रस्तावांसाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती

 आचारसंहितेसंदर्भातील प्रस्तावांसाठी

मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती

मुंबई, दि. 0: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या कालावधीत आचारसंहितेतून सूट देण्यासाठी प्राप्त प्रस्तावांची छाननी करण्याकरिता लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या वेळी स्थापन करण्यात येणाऱ्या समितीच्या धर्तीवर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात यावी, असे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत.

राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली 16 ऑक्टोबर 2025 रोजी आयोगाच्या कार्यालयात मुख्य सचिव आणि शासनातील विविध विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली होती. त्यावेळी अशा स्वरुपाची समिती स्थापन करण्याची गरज व्यक्त करण्यात आली होती. त्यानुसार हे निर्देश देण्यात आले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या आचारसंहितेतून सूट मिळण्यासाठी येणाऱ्या प्रस्तावांची ही समिती छाननी करेल व आचारसंहितेत सूट देण्यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगास शिफारस करेल. त्यामुळे शासनातील सर्व विभागांनी अशा प्रकारचे प्रस्ताव या समितीमार्फतच राज्य निवडणूक आयोगाकडे पाठविणे आवश्यक आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 31  जानेवारी 2026 पर्यंत सर्व प्रलंबित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. त्यानुसार सुरुवातीला नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यासाठी सध्या आचारसंहिता लागू झाली असली तरी ही समिती सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी कार्यरत असेल. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऐकली जनतेची गाऱ्हाणी

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऐकली जनतेची गाऱ्हाणी

नागपूरदि. 6 : रामगिरी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांना भेटून त्यांचे निवेदन स्वीकारून त्यांची गाऱ्हाणी ऐकली तसेच त्यांच्या अडचणी सोडविण्यासंदर्भात आश्वस्त केले.

रामगिरी येथे मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते. यामध्ये महिलादिव्यांगजेष्ठ नागरिक यांचा समावेश होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येक नागरिकांला भेटून त्यांची निवेदन स्वीकारली. यावेळी नागरिकांनी त्यांच्या वैयक्तिक अडचणी तसेच आरोग्यासंदर्भात येणाऱ्या अडचणीविविध शासकीय व निमशासकीय कार्यालयांकडे असलेले प्रलंबित प्रश्नमुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षअनुकंपा नोकरी आदी प्रश्नाबाबत निवेदन सादर केली. प्रत्येक नागरिकाला त्यांच्या तक्रारीसंदर्भात मुख्यमंत्री फडणवीस यांनी समाधान केले. 

राज्यात निर्माण झालेल्या अतिवृष्टी व पूरामुळे बाधित शेतकऱ्यांना सहाय्य व्हावे यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी मुख्यमंत्र्यांना नागरिकांनी यावेळी धनादेश दिला. निवेदन सादर करणाऱ्यांमध्ये विविध संस्था व लोकप्रतिनिधींचा समावेश होता. 

0000

Featured post

Lakshvedhi