Wednesday, 5 November 2025

   राज्य शासनाने आठ ग्रीन हायड्रोजन उत्पादकांसोबत सामंजस्य करार केले असून, त्यातून १,०१० किलो टन प्रति वर्ष उत्पादनाची अपेक्षा आहे. या प्रकल्पांमुळे सुमारे २,९१,३०० कोटी रुपयांची गुंतवणूक, ५.६७ दशलक्ष टन कार्बन उत्सर्जनात घट आणि सुमारे ६८,००० रोजगार संधी निर्माण होतील.

यासोबतच लघु जलविद्युतकृषी व औद्योगिक कचरा तसेच नगरपालिका घनकचरा यापासून वीज निर्मिती केली जात असूनशेतापासून कारखान्यापर्यंत उपलब्ध संसाधनांचा उपयोग करून ऊर्जेची गरज भागवली जात आहे. डिसेंबर २०२५ पर्यंत पीएम सूर्यघर-मुक्त बिजली योजनेअंतर्गत राज्यातील ३३,५१५ शासकीय इमारतींवर सौर यंत्रणा बसविण्यात येणार आहेत. तसेचपीएम-कुसुम बी योजना अंतर्गत देशभरातील ९,०३,४४४ सौर पंपांपैकी महाराष्ट्रात ५,१०,००० सौर पंप बसवले गेले आहेतजो एक विक्रम असून राज्याच्या ऊर्जाक्षेत्रातील नेतृत्व अधोरेखित करतो असल्याचे मंत्री सावे यांनी सांगितले.

             राज्य सरकारच्या नवीकरणीय ऊर्जा धोरण २०२० अंतर्गत १७,३६० मेगावॅट वीज निर्मितीचे लक्ष्य ठेवण्यात आले असूनत्या दिशेने महाराष्ट्र ठामपणे वाटचाल करत आहे.हरित ऊर्जेच्या माध्यमातून पर्यावरणपूरकस्वच्छ आणि टिकाऊ ऊर्जा प्रणाली निर्माण करून महाराष्ट्र देशाची हरित ऊर्जा राजधानी बनवण्याच्या दिशेने पुढे सरकत आहेअसा विश्वास मंत्री अतुल सावे यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्र राज्य स्वच्छ आणि हरित ऊर्जा क्षेत्रात झपाट्याने प्रगती करत आहे. ३० सप्टेंबर २०२५

  मंत्री अतुल सावे म्हणाले, महाराष्ट्र राज्य स्वच्छ आणि हरित ऊर्जा क्षेत्रात झपाट्याने प्रगती करत आहे. ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत राज्यात २७,६७४ मेगावॅट हरित ऊर्जा निर्मिती झाली असून, महाराष्ट्र देशातील अग्रगण्य हरित ऊर्जानिर्मिती राज्य ठरले आहे.

सौर ऊर्जेच्या माध्यमातून राज्याने मोठी झेप घेतली असून सध्या एकूण ११,७०३ मेगावॅट वीज निर्मिती केली जात आहे. यात ग्रिड-कनेक्टेड सौर प्रकल्पछतावरील सौर प्रणाली आणि मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० यांचा समावेश आहे. या योजनांमुळे शेतकऱ्यांना स्वस्तस्वच्छ आणि टिकाऊ ऊर्जेचा लाभ मिळत आहे.

महाराष्ट्राला देशाची हरित ऊर्जा राजधानी बनविण्याचे उद्दिष्ट

 महाराष्ट्राला देशाची हरित ऊर्जा राजधानी बनविण्याचे उद्दिष्ट

-         अपारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे

 

             मुंबई४ : राज्यातील ऊर्जा क्षेत्रात क्रांती घडवून आणण्यासाठी हरित ऊर्जाडिजिटलायझेशन आणि ग्राहक सशक्तीकरणावर भर दिला जात आहे. भविष्यात महाराष्ट्राला देशाची हरित ऊर्जा राजधानी बनवण्याचे ध्येय ठेवण्यात आले असूनप्रत्येक घरव्यवसाय आणि शेतकऱ्यापर्यंत हरित ऊर्जेचा लाभ पोहोचवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे अपारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे यांनी सांगितले.

 मुंबई येथे झालेल्या "डिस्ट्रीब्यूशन युटिलिटी मीट २०२५" या नवव्या वार्षिक विद्युत वितरण उपयुक्तता परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी ऊर्जा विभागाच्या राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकरतसेच इंडिया स्मार्ट ग्रिड फोरमएआयडीएएमएसइडीसी आणि टाटा पॉवर या संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

बदलापूर शहरातील पाणीपुरवठा प्रकल्प महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडे;

 बदलापूर शहरातील पाणीपुरवठा प्रकल्प महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडे;

-         पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील

·         नगरविकास विभागाचा शासन निर्णय जारी

 

मुंबईदि. ४ : बदलापूर शहरातील पाणीपुरवठा प्रकल्पाच्या कार्यान्वयनाची जबाबदारी आता कुळगाव बदलापूर नगरपरिषदेकडून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे हस्तांतरित करण्यात आली आहे. यासंदर्भातील शासन निर्णय नगर विकास विभागाने जारी केला असल्याची माहिती पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.

 

नगरविकास विभागाने यापूर्वी २३ मे २०२५ रोजी या प्रकल्पास प्रशासकीय मान्यता प्रदान केली होती. त्यानुसार प्रकल्पाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कार्यान्वयन यंत्रणा म्हणून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची नियुक्ती करण्यात आली आहे.

 

या निर्णयानुसारकुळगाव बदलापूर नगरपरिषद यांच्याऐवजी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण ही कार्यान्वयन संस्था म्हणून काम पाहणार आहे. तसेच प्रकल्पातील नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेचा हिस्सा देखील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे हस्तांतरित करण्यात आला आहे.

 

 शासन निर्णयानुसारया बदलामुळे प्रकल्पाच्या अंमलबजावणीला गती मिळेल आणि बदलापूर शहरातील पाणीपुरवठा व्यवस्था अधिक सुदृढ होईलअसे मत मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केले.

0000

जुन्नर, आंबेगाव, राजगुरूनगर व शिरुर परिसरात बिबट्यांची संख्या वाढली

 वनमंत्री  नाईक म्हणाले कीजुन्नरआंबेगावराजगुरूनगर व शिरुर परिसरात बिबट्यांची संख्या वाढली आहे. त्यांना प्रतिबंध घालण्यासाठी व हल्ल्याच्या घटना घडू नयेतयासाठी दीर्घ व अल्पकालीन उपाययोजना तातडीने राबविण्यात येतील. युद्धपातळीवर या परिसरात वन विभागांच्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्यात येईल. केंद्र शासनाच्या परवानगीने या परिसरातील बिबट्यांना पकडून त्यांचे स्थलांतर वनताराइतर राज्यात किंवा ज्यांना अधिकार आहे अशा ठिकाणी ज्या ठिकाणी सोय उपलब्ध आहेतेथे पाठविण्यात येतील. वनाशेजारील शेतीला व गोठ्यांना विद्युत तारांचे कुंपण लावणेएआयच्या माध्यमातून बिबट्यांच्या हालचालीची माहिती नागरिकांना कळविणेशेतीला दिवसा पूर्ण ताकदीने वीज पुरवठा करणे आदी उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच या परिसरातील बिबट्यांना पकडण्यासाठी जिल्हा नियोजन निधीतून तातडीने 200 पिंजरे खरेदी करण्यात येतील. त्याशिवाय वन विभागाच्या निधीतून आणखी 1 हजार पिंजरे तातडीने खरेदीसाठी 10 कोटींचा निधी देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

वन विभागाला लागणारी वाहनेपिंजरे व इतर साहित्य तातडीने पुरविण्याचे व त्यासाठी लागणारा निधी देण्याचे निर्देश  नाईक यांनी यावेळी दिले. नागरिकांच्या जिविताचा प्रश्न असल्याने यासाठी कुठल्याही प्रकारे निधीची कमतरता पडू न देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. 

या परिसरातील बिबट्यांची वाढती संख्या रोखण्यासाठी नसबंदीचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविण्यात आला आहे.

या प्रस्तावास लवकरात लवकर मान्यता मिळण्यासाठी सर्वपक्षीय नेते व वन अधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ केंद्रीय वन मंत्री यांच्या भेटीसाठी घेऊन जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

गेल्या काही दिवसात या परिसरात बिबट्यांच्या हल्ल्यात चार जणांचा मृत्यू झाला आहे. ही दुर्देवी घटना आहे. कालच्या घटनेनंतर वन विभागाने तातडीने बिबट्याला जेरबंद केले आहे. या बिबट्याचे तातडीने स्थलांतर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. लवकरच या घटनास्थळी भेट देऊन लोकप्रतिनीधींबरोबर चर्चा करण्यात येईलअशी माहितीही  नाईक यांनी यावेळी दिली.

जुन्नर व शिरूर परिसरातील बिबट्यांचे तातडीने स्थलांतर करणार

 जुन्नर व शिरूर परिसरातील बिबट्यांचे तातडीने स्थलांतर करणार

- वनमंत्री गणेश नाईक

वन्य प्राण्यांचे हल्ले रोखण्यासाठी महत्वाचे निर्णय

 

·         त्वरित 200 पिंजरे बसविणारआणखी 1 हजार पिंजरे युद्धपातळीवर खरेदी करणार

·         नागरिकांच्या जीवित रक्षणासाठी निधी कमी पडू देणार नाही

·         बिबट्यांच्या हालचालीची माहिती देण्यासाठी एआयचा वापर करणार

·         नसबंदीसाठी केंद्रीय वन मंत्र्यांना सर्वपक्षीय शिष्टमंडळ भेटणार

·         शेती व गोठ्यांना सौर कुंपण करणार

 

मुंबईदि.4 : पुणे जिल्ह्यातील जुन्नरआंबेगावराजगुरूनगर व शिरुर परिसरातील बिबट्यांमुळे मनुष्यहानी होणे ही दुर्देवी घटना आहे. यावर दीर्घ व तातडीच्या उपाययोजना करण्यात येतील. या परिसरातील बिबट्यांना पकडण्यासाठी 200 पिंजरे तातडीने लावण्यात येतील. आणखी एक हजार पिंजरे युद्धपातळीवर खरेदी करण्यात येणार आहेत. या परिसरातील बिबट्यांना पकडून त्यांचे तातडीने स्थलांतर करण्यात येईल. तसेच बिबट्यांची माहिती नागरिकांना व्हावीयासाठी सॅटेलाईट आधारित कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून 'अर्लटदेण्यात येईलअशी माहिती  वन मंत्री गणेश नाईक यांनी दिली.

पुणे जिल्ह्यातील जुन्नरआंबेगावराजगुरूनगर व शिरुर परिसरातील बिबट्यांच्या मानवावरील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वनमंत्री गणेश नाईक यांनी मंत्रालयात बैठक घेऊन तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. यावेळी माजी मंत्री दिलीप वळसे-पाटीलमाजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील,  प्रवक्ते वसंतराव जाधवजिल्हा परिषद सदस्या आशा बुचकेजनता दलाचे प्रदेश अध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी तसेच वनविभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकरप्रधान मुख्य वनसंरक्षक (वन बल) एम. श्रीनिवास रावमुख्य वनसंरक्षक जितेंद्र रामगावकरपुण्याचे वनसंरक्षक आशिष ठाकरे आदी उपस्थित होते. पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी व जिल्हा पोलीस प्रमुख संदीप सिंग गिल हे दूरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.

पैठण येथे दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर न्यायालय

 पैठण येथे दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर न्यायालय

            छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण येथे दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर यांचे न्यायालय स्थापन करण्यास आणि त्यानुषंगाने न्यायिक अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पदे मंजूर करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. 

            पैठण तालुक्यातील न्यायालयीन प्रकरणे सध्या छत्रपती संभाजीनगर येथील दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर या न्यायालयात चालवली जातात. या न्यायालयात पैठण तालुक्यातील 799 इतकी दिवाणी प्रकरणे प्रलंबित असून त्यासाठी नागरिकांना 53 कि.मी. इतका प्रवास करावा लागतो. नागरिकांच्या सोयीसाठी पैठण येथे दिवाणी न्यायाधीश वरीष्ठ स्तर न्यायालय सुरू स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. या न्यायालयासाठी 16 नियमित व 4 बाह्ययंत्रणेद्वारे अशी एकूण 20 पदे मंजूर करण्यात आली आहेत.

Featured post

Lakshvedhi