सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Tuesday, 4 November 2025
राज्यात विशेषतः सह्याद्री पर्वतरांगांमध्ये उदंचन जलविद्युत प्रकल्प राबवण्यासाठी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्यात विशेषतः सह्याद्री पर्वतरांगांमध्ये उदंचन जलविद्युत प्रकल्प राबवण्यासाठी अनुकूल भौगोलिक परिस्थिती असल्याने महाराष्ट्राला मोठा फायदा मिळणार आहे. त्यामुळे राज्य सरकारने ऊर्जा ग्रीड स्थिर ठेवण्यासाठी उदंचन जलविद्युत प्रकल्प (पंप्ड स्टोरेज प्रोजेक्ट्स) धोरणालाही वेग देण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रीड स्थिरतेसाठी सुमारे १ लाख मेगावॅट क्षमतेची उदंचन जलविद्युत प्रकल्पांची उभारणी करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. या माध्यमातून महाराष्ट्रच नव्हे तर राष्ट्रीय वीज ग्रीडही स्थिर ठेवण्याची क्षमता निर्माण होईल.
उदंचन जलविद्युत प्रकल्पांचे परवाने जलदगतीने मिळण्यासाठी फास्ट ट्रॅक यंत्रणा
उदंचन जलविद्युत प्रकल्पांचे परवाने जलदगतीने मिळण्यासाठी
फास्ट ट्रॅक यंत्रणा
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
· पंचमौली-देवळीपाडा उदंचन जलविद्युत प्रकल्पासाठी आठ हजार कोटींचा सामंजस्य करार
मुंबई, दि. 3 : पंचमौली-देवळीपाडा उदंचन जलविद्युत (धुळे/नंदुरबार) प्रकल्पासाठी हरियाणा येथील जीएससी पीएसपी महा प्रायव्हेट लिमिटेड कंपनीबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आठ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा सामंजस्य करार करण्यात आला. राज्य शासनाने उदचंन जलविद्युत प्रकल्पातील गुंतवणूकदारांना जलवापर आणि पर्यावरणीय मंजुरीसह इतर सर्व परवाने जलदगतीने मिळावेत, यासाठी ‘फास्ट-ट्रॅक’ यंत्रणा उभारण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या कार्यक्रमात अपर मुख्य सचिव दीपक कपूर, सचिव संजय बेलसरे, जीएससी पीएसपी महा प्रायव्हेट लिमिटेडचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक सुमित नंदा, संचालक शुभ नंदा, मुख्य विपणन अधिकारी अनुप भटनागर, उपाध्यक्ष विमल सक्सेना, विधि सल्लागार विकास कुमार पाठक आदी उपस्थित होते. यावेळी दीपक कपूर आणि कंपनीचे अध्यक्ष सुमित नंदा यांनी करारावर स्वाक्षरी केल्या
Monday, 3 November 2025
अधिकारी ते आशा – सर्वांसाठी संयुक्त प्रशिक्षण
अधिकारी ते आशा – सर्वांसाठी संयुक्त प्रशिक्षण
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नुकताच एक अभिनव करार करण्यात आला असून, सार्वजनिक आरोग्य विभागातील अधिकारी आणि कर्मचारी सर्च संस्थेत प्रत्यक्ष दोन दिवस प्रशिक्षण घेणार आहेत. उच्चपदस्थ अधिकारी, वैद्यकीय अधिकारी आणि आशा सेविका या सर्वांना एकत्र बसवून प्रशिक्षण देण्याची ही महाराष्ट्रातील पहिलीच क्रांतिकारी पद्धत ठरली आहे. याद्वारे खेड्यांमध्ये आरोग्याच्या त्रिस्तरीय सेवा राबविण्याचे हे पथदर्शी उदाहरण आहे.
भविष्यात या भागात आदिवासी संस्कृतीनुरूप आरोग्यसेवा विकसित करण्यावरही भर देण्यात येणार आहे.गडचिरोलीत सुरू झालेली ही आरोग्य चळवळ म्हणजे खऱ्या अर्थाने आरोग्य क्रांतीची नवी पहाट आहे.
आशा’ सेविकांना नवसंजीवनी
‘आशा’ सेविकांना नवसंजीवनी
‘सर्च’ संस्थेच्या आशा सेविकांना आता नव्या जोमाने काम करण्याची प्रेरणा मिळत आहे. धानोरा तालुक्यातील 181 आशा सेविकांना वर्षातून तीन वेळा सर्चच्या तज्ज्ञांकडून प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले जाते.
मोबाईल हॉस्पिटल थेट जंगलात
मोबाईल हॉस्पिटल थेट जंगलात
ज्या दुर्गम भागांत पारंपरिक आरोग्यसेवा पोहोचू शकली नव्हती, तिथे आता शासनाचे ‘मोबाईल मेडिकल युनिट’ धाव घेत आहे. एके काळचा धानोरा तालुका हा देशातील अतीमागास, नक्षलग्रस्त आणि आरोग्यसेवेपासून वंचित असा भाग मानला जातो. याच धानोरा तालुक्यातील 70 गावांतील आदिवासी नागरिकांना त्यांच्या दारातच डॉक्टरांकडून तपासणी, औषधे आणि उपचार मिळत आहेत. मोफत आरोग्यसेवेच्या या उपक्रमामुळे गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर दिलासा आणि विश्वासाचे हास्य उमटले आहे. यातून आरोग्य विभाग आणि आशा सेविकांच्या सहकार्याने आदिवासी भागासाठी एक नवे आरोग्य मॉडेल तयार झाले असल्याचे दिसून येते.
आदिवासी भागात आरोग्याचे नवे मॉडेल
आदिवासी भागात आरोग्याचे नवे मॉडेल
मुख्यमंत्र्यांच्या पथदर्शी प्रकल्पामुळे आदिवासीनुरूप आरोग्य सेवा थेट जंगलात
मुंबई, दि. 29 : गडचिरोलीच्या दुर्गम आदिवासी भागात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने आरोग्यसेवेचा एक नवा अध्याय सुरू झाला आहे. सार्वजनिक आरोग्य आणि स्वयंसेवी संस्था ‘सर्च’ (सोसायटी फॉर एज्युकेशन, ॲक्शन अँड रिसर्च) यांच्या सहकार्याने गडचिरोली जिल्ह्यात आरोग्य व्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी व्यापक मोहीम राबवून आदिवासी भागात आरोग्याचे एक नवे मॉडेल तयार केले आहे. येथील दुर्गम भागात आता थेट मोबाईल मेडिकल युनिट पाठवले जाऊ लागले आहे.
सार्वजनिक आरोग्य व्यवस्था ही राज्याच्या सर्वांगीण विकासाचा पाया आहे. नागरिकांना गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने अनेक नाविन्यपूर्ण योजना राबवल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पुढाकारातून गडचिरोलीत आरोग्यसेवा थेट जनतेच्या दारात पोहोचत आहे.
भुयारी मार्गाची कामे जलदगतीने पूर्ण करण्यास
भुयारी मार्गाची कामे जलदगतीने पूर्ण करण्यास कंत्राटदारांना सांगण्यात आले आहेत. तसेच ज्या ठिकाणी वाहतूक कोंडी होते तेथे ट्रॅफिक वॉर्डन पुरविण्यात येतील. तसेच वळण रस्त्यांच्या ठिकाणचा रस्ता सुव्यवस्थित करण्यात येईल. कराडमधील रस्त्याचे काम दीड महिन्यात पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असल्याचे राष्ट्रीय महामार्गाचे अभियंता श्रीवास्तव यांनी सांगितले.
Featured post
-
नर्सिंग विद्यार्थ्यांसाठी जर्मनीत प्रशिक्षण व करिअरची सुवर्णसंधी -वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ · महाराष्ट्र-बाडेन...
-
कोण होता 'चेन्दरू मडावी'...? (विदेशी फिल्म ला ऑस्कर मिळवून देणारा जगातला एकमेव भारतीय आदिवासी मोगली चेन्दरू मडावी...) एक ...
-
टी.एन. शेषन हे भारताचे निवडणूक आयुक्त (Chief Election Commissioner) म्हणून 1990–1996 या काळात अत्यंत कठोर, निर्भीड आणि सुधारक म्हणून ओळखले ...
