Friday, 10 October 2025

डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीदिनी 'वाचन प्रेरणा दिन' साजरा करण्याचे शासनाचे निर्देश

 डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीदिनी

'वाचन प्रेरणा दिनसाजरा करण्याचे शासनाचे निर्देश

 

मुंबईदि. १० :- वाचन संस्कृती वाढीस लागावी तसेच मराठी भाषेचा प्रचारप्रसारविकासजतन आणि संवर्धन व्हावेया उद्देशाने माजी राष्ट्रपती स्व. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीदिनी म्हणजे १५ ऑक्टोबर रोजी वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. घे या एकच वसामराठीला बनवूया ज्ञानभाषा ही यावर्षीच्या उपक्रमाची मध्यवर्ती संकल्पना आहे.

 

राज्य शासनाचे सर्व मंत्रालयीन विभाग तसेच त्यांच्या अधिपत्याखालील सर्व शासकीय/निमशासकीय कार्यालयेशासकीय संस्था/मंडळसार्वजनिक उपक्रमसर्व आयुक्त आणि सर्व जिल्हाधिकारी कार्यालये हे वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करणार आहेत. यामध्ये ऑनलाईन तसेच प्रत्यक्षरित्या कार्यक्रम आयोजित करण्यात येतील.

 

वाचन प्रेरणा दिनानिमित्त केवळ ललित साहित्यापुरते कार्यक्रम मर्यादित न ठेवताविज्ञानतंत्रज्ञानव्यवस्थापनपर्यावरणआरोग्यसंगणकअवकाश विज्ञान विषयांचा समावेश कार्यक्रमात करण्यात येणार असून जास्तीत जास्त तरुण पिढीला आकर्षित करण्यासाठी रोजगाराभिमुख उपक्रम राबविण्यात येतील. यात अनुवाद लेखनव्यावसायिक लेखनई-बुकस्व-प्रकाशनऑनलाईन पुस्तक विक्रीसंहिता लेखनशॉर्ट फिल्म/डॉक्युमेंटरी लेखन यासारख्या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहे. त्याचबरोबरव्याख्यानेचर्चासत्रेअभिवाचनसामूहिक वाचनग्रंथ प्रदर्शनआणि 'मराठी वाचन कट्टाची निर्मितीमराठी आभासी /प्रत्यक्ष साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात येणार आहे. मराठी भाषेचा वापर जास्तीत जास्त व्हावाया उद्देशाने न्यायव्यवहारशासन प्रशासनप्रसार माध्यमे इत्यादी ठिकाणी होणाऱ्या मराठी भाषेच्या वापराबाबत जागरूकता वाढविण्यासाठी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजनासाठी हक्काचे व्यासपीठ असावे

 मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणालेनागपुरात प्रस्तावित असलेले कन्व्हेन्शन सेंटर केवळ प्रदर्शनेकार्यक्रम आदींसाठी उपयोगात येणारे नसावेतर सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजनासाठी हक्काचे व्यासपीठ असावे. नागपूरचा इतिहास 'कन्व्हेन्शन सेंटरच्या माध्यमातून येथे आलेल्या प्रत्येकाला कळावा, अशा पद्धतीने कन्व्हेन्शन सेंटरची अंतर्गत रचना असावी. हे सेंटर अत्यंत आकर्षकआधुनिक तंत्रज्ञानानेयुक्त आणि पर्यावरण पूरक वास्तूचे मूर्तिमंत उदाहरण ठरावे. 

स्पेनचे राजदूत म्हणालेभारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि स्पेनचे प्रधानमंत्री पेड्रो सांचेझ यांच्यात चांगले संबंध आहेत. यामुळे दोन्ही देशातील द्विपक्षीय संबंध आणखी मजबूत होत आहे. भारत कृत्रिम बुद्धिमत्ताआधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने सामान्य नागरिकाच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणत असून याची दखल जगाने घेतली आहे. मुंबई हे भारताचेच नव्हेतर दक्षिण आशियाचे 'पावर हाऊसबनत आहे. त्यामुळे मुंबई राजधानी असलेल्या महाराष्ट्रसोबत नक्कीच स्पेनला काम करायला आवडेलअशा शब्दात त्यांनी महाराष्ट्राचा गौरव केला. 

फिरा बार्सिलोना इंटरनॅशनल कंपनीच्यावतीने मुख्य कार्यकारी अधिकारी रिकार्ड झेपाटेरो यांनी सादरीकरण केले. यावेळी जिल्हाधिकारी नागपूर आणि फिरा बार्सिलोना इंटरनॅशनल कंपनीसोबत सामंजस्य कराराचे आदान प्रदान करण्यात आले.

जागतिक दर्जाचे 'कन्व्हेन्शन सेंटर' नागपुरात उभारण्यात येणार

 जागतिक दर्जाचे 'कन्व्हेन्शन सेंटरनागपुरात उभारण्यात येणार

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

स्पेन येथील फिरा बार्सिलोना इंटरनॅशनल कंपनीसोबत सामंजस्य करार

 

मुंबईदि. १० : नागपुरात सर्व सोयी सुविधायुक्त जागतिक दर्जाचे कन्व्हेन्शन सेंटरउभारण्यात येणार आहे. याबाबत स्पेन येथील फिरा बार्सिलोना इंटरनॅशनल कंपनीसमवेत वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज सामंजस्य करार करण्यात आला. नागपूरला उभारण्यात येणारे 'कन्व्हेन्शन सेंटरसाठी निवडण्यात येणारी जागा सर्व परिवहन सेवांनी उत्तमरित्या जोडलेली असावी, अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. 

 यावेळी स्पेनचे भारतातील राजदूत जुआन अँटेनियोफिरा बार्सिलोना इंटरनॅशनल कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी रिकार्ड झेपाटेरोपरिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव संजय सेठीपायोनियर एक्झिबिशन अँड कॉन्व्हेन्शन प्रायव्हेट लिमिटेडचे अध्यक्ष मुकेश अरोरा आणि उपाध्यक्ष जीत अरोरानागपूर जिल्हाधिकारी विपिन इटनकर उपस्थित होते. 

पूरग्रस्तांच्या पाठिशी शासन खंबीरपणे उभे -

 पूरग्रस्तांच्या पाठिशी शासन खंबीरपणे उभे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ;

टंचाई निवारण काळाप्रमाणेच सर्व सवलती मिळणारजीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्याला प्राधान्य

आपत्तीग्रस्तांकडून वसुली नकोबँकाना मुख्यमंत्र्यांचे निर्देश

 

मुंबईदि. ३० : राज्य शासन पूरग्रस्ताच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे. शेतकरीआपत्तीग्रस्त नागरिकांना टंचाई निवारण काळाप्रमाणेच सर्व सवलती व उपाययोजना लागू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर दिली. आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांकडील कर्जाची वसुली थांबवावीअसे निर्देश बँकाना दिल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

 

मुख्यमंत्री फडणवीस म्हणालेशेतकरी वर्ग सध्या अडचणीत आहे. हे लक्षात घेऊन बँकांना वसुली थांबवण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. तसेच पूरग्रस्त कुटुंबांना गहू-तांदूळडाळी व आवश्यक वस्तूंचा संच वितरित करण्यात येत आहे. विहीर खचणेशेतजमीन खरडून जाणेयावर केंद्र सरकारच्या निकषाबाहेर जाऊनझालेल्या नुकसानीवरही राज्य शासन स्वतंत्र मदत करणार आहे. नुकसानीचे पंचनामे येत्या दोन-तीन दिवसांत पूर्ण होऊन पुढील आठवड्यात केंद्र शासनाला प्रस्ताव पाठविला जाणार आहे. मात्रकेंद्र शासनाच्या मदतीची वाट न पाहता राज्य शासनाच्या स्वतःच्या निधीतून मदत सुरू केली आहे. केंद्राकडून ती रक्कम रिइम्बर्समेंटच्या स्वरूपात मिळेलअसे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.

 

राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत असली तरी आपत्ती व्यवस्थापन नियमावलीत अशी व्याख्येचा समावेश नाही. असे असले तरी टंचाई निवारण काळातील निकषांप्रमाणेच सर्व सवलती व उपाययोजना लागू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

तंत्रज्ञानामुळे महापारेषणची प्रगती :

 तंत्रज्ञानामुळे महापारेषणची प्रगती : डॉ. संजीव कुमार

मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस व ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या नेतृत्वाखाली तसेच अपर मुख्य सचिव (ऊर्जा) आभा शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली महापारेषणमध्ये विविध प्रकल्प व संचलन चांगल्या पध्दतीने व वेगाने होत आहे. नव्या तंत्रज्ञानामुळे महापारेषणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची कार्यकुशलता वाढली आहे. भविष्यातहीअधिकारी व कर्मचारी नावीन्यपूर्ण काम करून महापारेषणचे नाव नक्कीच उंचावतीलअसे महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमार यांनी सांगितले.

दौंड, आष्टी, माळशिरस विधानसभा मतदार संघातील जल सिंचनाच्या कामाचा

 दौंडआष्टीमाळशिरस विधानसभा मतदार संघातील

जल सिंचनाच्या कामाचा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडून आढावा

 

मुंबईदि. ३०:-  दौंड (जि. पुणे) आष्टी (जि. बीड)माळशिरस (जि. सोलापूर) आणि आष्टी (जि. बीड) विधानसभा मतदार संघातील जलसंपदा विभागाकडील विविध जलसिंचनाच्या कामाचा आढावा जलसंपदा ( गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी घेतला. 

 

मंत्रालयात झालेल्या या आढावा बैठकीस आमदार राहुल कुलआमदार सुरेश धसमाजी आमदार राम सातपुतेजलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूरसचिव संजय बेलसरेकृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक हणमंत गुणालेमुख्य अभियंता श्री. धुमाळ यांच्यासह जलसंपदा विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. तर  बैठकीस गोदावरी खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक संतोष तिरमनवार दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

 

जलसंपदा मंत्री विखे-पाटील म्हणालेदौंड तालुक्यात खानोटा येथे बांधण्यात येणाऱ्या बंधाऱ्याचे सर्वेक्षण काम सुरू करावे. या बंधाऱ्याच्या कामासाठी आवश्यक असणाऱ्या मान्यता गतीने घेण्यात याव्यात आणि एक महिन्यात याचा सविस्तर अहवालात तयार करावाअशा सूचना जलसंपदा मंत्री विखे-पाटील यांनी दिल्या. यावेळी त्यांनी कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याचे बॅरेज बंधाऱ्यात रूपांतर करण्याबाबतचाही आढावा घेतला. जनाई शिरसाई योजनेतील जी कामे करायचे आहेत त्या कामांची निविदा काढण्याची कार्यवाही करावी. यासाठी आवश्यक प्रस्ताव दाखल करून मान्यता घ्यावी. दौंड मतदार संघातील जलसिंचनाची कामे कालमर्यादेत पूर्ण करावीत अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

 

माळशिरस तालुक्यातील नीरा उजवा कालव्यावरील माचणूर विभागातील गावांना बारमाही पाणी देण्याबाबत कार्यवाही करावी,अशा सूचना जलसंपदा मंत्री विखे पाटील यांनी या बैठकीत दिल्या.

 

आष्टी तालुक्यातील जलसिंचनाच्या कामांचा आढावा घेताना जलसंपदा मंत्री विखे-पाटील म्हणालेज्या प्रकल्पाची कामे सुरू आहेत ती कालमर्यादेत पूर्ण करावीत. प्रकल्पाची सर्वेक्षण अंदाजपत्रके तातडीने सादर करावीत अशा सूचना त्यांनी दिल्या.

०००००

अतिवृष्टीमुळे क्षतिग्रस्त झालेल्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांच्या दुरुस्तीचा प्रस्ताव तात्काळ सादर करा

 अतिवृष्टीमुळे क्षतिग्रस्त झालेल्या कोल्हापूर पद्धतीच्या

 बंधाऱ्यांच्या दुरुस्तीचा प्रस्ताव तात्काळ सादर करा

-         जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

 

मुंबईदि. ३०: यंदाच्या पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे बरेचश्या कोल्हापूर पद्धतीचे बंधारे क्षतिग्रस्त झाले आहेत. या बंधाऱ्यांची दुरुस्तीची कामे युद्ध पातळीवर होणे आवश्यक असल्याने यासाठीचा दुरुस्तीचा प्रस्ताव शासनास त्वरित सादर करावाअसे निर्देश जलसंपदा ( गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिले.

 

जलसंपदा मंत्री श्री विखे-पाटील यांनी मंत्रालयात राज्यात यंदाच्या पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या कार्यक्षेत्रातील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांचे आणि इतर प्रकल्पाचे झालेले नुकसानीबाबतचा आढावा घेतला.

 

 या बैठकीस जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूरसचिव संजय बेलसरेकृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक हणमंत गुणालेमुख्य अभियंता श्री. धुमाळ यांच्यासह जलसंपदा विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. तर बैठकीस गोदावरी खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक संतोष तिरमनवार दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

 

जलसंपदा मंत्री विखे-पाटील म्हणालेयंदाच्या पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे आलेल्या महापुरात अनेक कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याचे नुकसान झाले आहे.  काही बंधाऱ्यांच्या दोन्ही बाजूस तर काही बंधाऱ्यांच्या एका बाजूचे नुकसान झाले असून काही बंधाऱ्यांच्या गेटचेही नुकसान झाले आहे. या बंधाऱ्याच्या झालेल्या नुकसानाची तातडीने पाहणी करावी. हे बंधारे तातडीने दुरुस्त करून पाणी अडविणे आवश्यक असल्याने याबाबतचा सविस्तर अहवाल शासनास सादर करावाअशा सूचनाही जलसंपदा मंत्री श्री. विखे-पाटील यांनी दिल्या.

Featured post

Lakshvedhi