Tuesday, 7 October 2025

जिल्ह्यांत अकादमीने कार्यक्रम घेत ग्रामीण भागातील उर्दूप्रेमींपर्यंत साहित्य पोहोचवले

 अकादमीच्या कार्याबाबत ॲड.कोकाटे म्हणाले की४५० पेक्षा जास्त साहित्य कार्यक्रम२५० हून अधिक कवी संमेलने१५० पेक्षा जास्त कार्यशाळा आणि १०० हून अधिक पुस्तक प्रकाशनांनी उर्दू साहित्याची परंपरा समृद्ध केली आहे. २५ पेक्षा अधिक जिल्ह्यांत अकादमीने कार्यक्रम घेत ग्रामीण भागातील उर्दूप्रेमींपर्यंत साहित्य पोहोचवले. उर्दू ही भारतीय भाषा असून सुमारे सात कोटी लोक ती प्रथम भाषा म्हणून आणि १० कोटी लोक द्वितीय भाषा म्हणून वापरतात. महाराष्ट्रात सात टक्के लोक उर्दू बोलताततसेच जवळपास २५ पेक्षा अधिक उर्दू दैनिके कार्यरत आहेत.

उर्दू साहित्य कला अकादमीच्या सुवर्णमहोत्सवी तीन दिवसीय समारोहाचे उद्घाटन

 उर्दू साहित्य कला अकादमीच्या सुवर्णमहोत्सवी तीन दिवसीय समारोहाचे उद्घाटन

अद्ययावत उर्दू घर उभारणार

- अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

मुंबई, दि. ६ : मराठी व उर्दू साहित्यिक देवाणघेवाणीसाठी सांस्कृतिक केंद्रे म्हणजे  उर्दू घर योजना  आहे. हे उर्दू घर अद्ययावत बनविण्यासाठी शासन प्रयत्नशील राहील. तसेच उर्दू शाळावसतिगृहे वाढविण्यासाठी सकारात्मक असल्याचे अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी सांगितले. उर्दू साहित्य अकादमीची नवीन समिती लवकरच गठित करणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.

महाराष्ट्र उर्दू साहित्य अकदमीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त वरळी डोम येथे आयोजित तीन दिवसीय साहित्यिक व सांस्कृतिक सोहळ्याचे अल्पसंख्यांक विकास व औकाफ मंत्री ॲड माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. द वर्ल्ड ऑफ उर्दू या प्रदर्शनाचेही यावेळी उद्घाटन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

यावेळी  माजी अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्री नवाब मलिकमाजी मंत्री अनिस अहमदआमदार सना मलिकमाजी आमदार झिशान सिद्दिकीपंजाबी साहित्य अकादमीचे अध्यक्ष मार्क सिंहगीतकारऔकाफ बोर्ड चे अध्यक्ष समीर काझीपटकथा लेखक जावेद अख्तर, विभागाचे सचिव रुचेश जयवंशीआयुक्त प्रतिभा इंगळे यांच्यासह अधिकारी आणि साहित्यिक उपस्थित होते. यावेळी उर्दू सिखे आणि मराठी शिकूया या दोन पुस्तिकेचे अनावरण करण्यात आले.

कृषी विभाग व एम. एस. स्वामीनाथन रिसर्च फाऊंडेशन यांच्यामधील सामंजस्य करार

 कृषी विभाग व  एम. एस. स्वामीनाथन रिसर्च फाऊंडेशन यांच्यामधील सामंजस्य करार

•        वातावरणीय बदल व पोषण मूल्यांचा विचार करता पारंपरिक व स्थानिक अशा भरड धान्यांच्या उत्पादन व प्रक्रिया शेती उद्योगांना प्रोत्साहन देणे.

•        संयुक्त राष्ट्राने २०२६ हे महिला शेतकरी वर्ष घोषित केलेले आहे. त्या निमित्ताने महिला शेतकऱ्यांच्या सशक्तीकरणासाठी कायद्याची निर्मिती. तसेच सावित्रीबाई फुले महिला शेतकरी सशक्तीकरण अभियानाची निर्मिती.

•        पर्यावरणपूरकपोषकजैवविविधतेला प्रोत्साहन देणाऱ्या कृषी पद्धतींना प्रोत्साहन देण्यासाठी राज्यातील कृषी विद्यापीठांमध्ये बायोहॅपिनेस केंद्रांची निर्मिती.

महाराष्ट्राच्या कृषी दृष्टीकोनाला फक्त अन्नसुरक्षेपुरते मर्यादित न ठेवता पोषण

 कृषी मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, महाराष्ट्राच्या कृषी दृष्टीकोनाला फक्त अन्नसुरक्षेपुरते मर्यादित न ठेवता पोषण सुरक्षापर्यावरणीय टिकाव आणि शेतकरी समृद्धी हे व्यापक उद्दिष्ट साध्य करणे हा कराराचा उद्देश आहे. बायोहॅपिनेस आधारित शाश्वत शेती या सामंजस्य करारामधील मधील प्रमुख संकल्पना आहे. यातसंरक्षणलागवडखरेदी आणि विपणन या घटकांवर अधिक भर देण्यात आला आहे.

ग्रामविकास विभागासोबत टाटा मोटर्स यांच्यासमवेत झालेला सामंजस्य करार

 मुख्यमंत्री फडणवीस म्हणालेग्रामविकास विभागासोबत टाटा मोटर्स यांच्यासमवेत झालेला सामंजस्य करार ग्रामीण विकासाला गती देणारा आहे. या कराराच्या माध्यमातून ६३ ग्रामपंचायतींमध्ये प्रभावी काम होईल आणि त्यातून पुढील काळात स्केलअप करता येईल असा साचा तयार होईल. तसेच ग्रामविकास विभागाच्या समृद्ध ग्राम मिशनला या सामंजस्य  करारामुळे चालना मिळेल. गावांच्या शाश्वत विकासासाठी आणि गरिबी निर्मूलनासाठी या उपक्रमांमधून सक्षम पायाभूत रचना उभारली जाईल.

स्वामीनाथन आणि टाटा फाऊंडेशन सोबतच्या कराराने राज्यात शेती, ग्रामविकासाचे नवे पर्व

 स्वामीनाथन आणि टाटा फाऊंडेशन सोबतच्या कराराने

राज्यात शेती, ग्रामविकासाचे नवे पर्व

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

मुंबईदि. ६ :- कृषी विभाग, एम. एस. स्वामिनाथन रिसर्च फाउंडेशन,  ग्रामविकास विभाग आणि टाटा मोटर्स फाउंडेशन यांच्यासोबतच्या महत्त्वपूर्ण सामंजस्य करारांमुळे राज्यात शेतीमहिला  सक्षमीकरणपोषण सुरक्षा आणि ग्रामीण विकास क्षेत्रांमध्ये विकासाचे नवे पर्व सुरू होईलअसा विश्वास  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त  केला.

सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हे सामंजस्य करार झाले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कीशेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी राज्य शासनामार्फत शेतीत नवनवीन प्रयोग करण्यास प्राधान्य दिले जात आहे. महिला शेतकरी हा शेती व्यवस्थेतील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. त्यांच्या सहभागातून आपण केवळ उत्पादन नव्हे तर संपूर्ण ग्रामीण अर्थव्यवस्था अधिक सक्षम करू शकतो. पोषण सुरक्षा ही काळाची गरज असून शेतकऱ्यांना याचा लाभ मिळवून देत असताना भावी पिढ्यांच्या आरोग्यासाठीही हा उपक्रम उपयोगी ठरेल असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले

नगर पंचायतीचे आरक्षण

 नगर पंचायतीचे आरक्षण

राज्यातील 147 नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष पदांचे आरक्षण आज काढण्यात आले. यामध्ये अनुसूचित जातीसाठी एकूण 18 जागा आरक्षित असून यामध्ये महिलांसाठी 9 व सर्वसाधारण साठी 9 पदे आरक्षित आहेत. तर अनुसूचित जमातीसाठी 13 जागा असून त्यामध्ये 7 जागा महिलांसाठी व 6 जागा सर्वसाधारण गटासाठी आहेत. तर नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी एकूण 40 पदे आरक्षित असून त्यामध्ये 20 जागा महिलांसाठी व 20 जागा सर्वसाधारण गटासाठी आहेत. खुल्या प्रवर्गासाठी एकूण 76 जागा असून 38 जागा महिलांसाठी व 38 जागा या सर्वसाधारण गटासाठी आरक्षित आहेत.

अनुसूचित जाती या प्रवर्गासाठी राखीव :-

महिलांसाठी आरक्षित नगरपंचायती (9 पदे)

1 .निलडोह2. गोधनी(रेल्वे)3. कोरची4. बहादुरा 5. धानोरा6. गौंडपिंपरी7. ढाणकी 8. अहेरी 9. बेसा-पिपळा

 अनुसूचित जाती प्रवर्ग (सर्वसाधारण)

येरखेडाकांद्री (कन्हान)भिसीकुरखेडादेवरीमाळेगांव(ब्रु.)बिडगांव-तरोडी (खुर्द)-पांढुर्णाभातकुलीदहीवडी.

अनुसूचित जमाती या प्रवर्गासाठी राखीव:-

महिलांसाठी आरक्षित नगर पंचायती (7 पदे)

भिवापूरअर्जुनी-मोरगांवसिरोंचा हिंगणासमुद्रपूरपालीदेवळा.

अनुसूचित जमाती (सर्वसाधारण) (6 पदे)

कोरपणाकळंबमाणगांवगोरेगांवसेलू सिंदेवाही        

 

नागरिकांचा मागास प्रवर्ग या प्रवर्गासाठी राखीव (40 पदे):-

  • सर्वसाधारण गटासाठी आरक्षित (20 पदे)

पारनेरतळाखानापूरपालममंठाकोंढाळीमाळशिरस एटापल्लीझरी-जामणी,  पोंभूर्णा माहूरआटपाडीमालेगांव-जहांगिरतिर्थपूरीकणकवलीशिरुर-कासारविक्रमगडअकोले मोखाडासुरगणा.

  • नागरिकांचा मागास प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित (20 पदे)

घनसावंगीभामरागडमंचर,  पाटोदामाढाकळवणसावलीमानोरामारेगांवआष्टीजि.वर्धा,           तलासरीवडवणीपोलादपूरखालापूरशिरुर-अनंतपाळजाफ्राबादचाकूरआष्टीजि.बीडजिवतीकर्जतजि.अहिल्यानगर.       

 

खुल्या प्रवर्गासाठी नगर पंचायती (एकूण 76 पदे)

  • खुला (सर्वसाधारण) (38 पदे)

शेंदूर्णी साक्री,   सालेकसाकवठे-महांकाळदेवणीमोताळाअर्धापूरबोदवडहिमायतनगरकसई-दोडामार्गमुलचेराधडगांव-वडफळ्याकुडाळकोरेगांवदापोलीवाभवे-वैभववाडीनिफाडचंदगडचार्मोर्शीबदनापूरकारंजा, धारणी, फुलंब्री, हातकणंगले, लोहारा (ब्रु.), मुरबाड, केज, आजरा, संग्रामपूर, खंडाळा, वडूज, देवगड-जमसंडे, नेवासा, मौदा, शिराळा (जि.सांगली), नायगाव, सेनगाव, महागाव.

  • खुला प्रवर्गातील महिलांसाठी :- (पदे 38)

1. बाभुळगांव2. मुक्ताईनगर3. कुही4. देहू5. शहापूर6. पारशिवनी7. वडगांव-मावळ8. तिवसा9. मंडणगड10. शिंदखेडा11. लांजा12. देवरुख13. वाडा14. लोणंद15. मेढा16. जळकोट17.    दिंडोरी18. सडक-अर्जुनी19. म्हसळा20. नातेपुते21. रेणापूर22. लाखणी23. औंढा-नागनाथ24. पाटण25. पेठ26. कडेगांव27. अनगर28. महादूला29. सोयगांव30. वैराग31. लाखांदूर, 32. राळेगांव33. गुहागर34. नांदगांव-खडेश्वर35. महाळुंग-श्रीपूर36. वाशी,  जि.धाराशिव37.            बार्शी-टाकळी38. मोहाडी.

आरक्षण सोडत पारदर्शकपणे राबविली – राज्यमंत्री माधुरी मिसाळ

राज्यातील नगरपरिषदा व नगर पंचायतीच्या नगराध्यक्ष पदांची आरक्षण सोडत प्रक्रिया पारदर्शकपणे राबविण्यात आलीअसे सांगून महिला प्रवर्गासाठी आरक्षित जागांवर निवडणूक लढविणाऱ्या भगिनींना तसेच या निवडणुकीसाठी सर्वांना नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी शुभेच्छा दिल्या.

0000

Featured post

Lakshvedhi