मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, झवेरी बाजार हा भारतीय रत्न व दागिने उद्योगाचा कणा असून, येथील कारागिरीला जगभरात मान्यता आहे. काळानुसार अडचणी असूनही झवेरी बाजाराने आपली परंपरा व वैभव टिकवले आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून येथील व्यापाऱ्यांना जागतिक स्तरावरील व्यापाऱ्यांशी संवाद साधण्याची संधी उपलब्ध झाली आहे. भारताच्या निर्यात क्षेत्रात या उद्योगाचा मोठा वाटा असून व्यावसायिकांनी आपल्या क्षमता वाढवत न्याव्यात, या उद्योगाचे अर्थव्यवस्थेतील योगदानही वाढतच राहील. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी नेहमी अडचणींमध्ये संधी शोधण्याची प्रेरणा देतात, त्याप्रमाणे आंतरराष्ट्रीय स्तरावर कितीही अडचणी आल्या तरीही रत्न व दागिन्यांच्या बाजाराचे महत्त्व कधीही कमी होणार नाही, उलट भविष्यात तो अधिक विस्तारेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Monday, 6 October 2025
झवेरी बाजार परिसराचा कायापालट करण्यास शासन सहकार्य करणार
झवेरी बाजार परिसराचा कायापालट करण्यास
शासन सहकार्य करणार
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
- पहिल्या ‘झवेरी बाजार जेम्स अँड ज्वेलरी फेस्टिवल 2025’ चे उद्घाटन
मुंबई, दि. 6 - अनेक दशकांचा वारसा आणि देशाच्या अर्थव्यवस्थेत मोलाचा वाटा असलेल्या झवेरी बाजार परिसराला रत्न आणि आभूषण उत्सवामुळे सध्या नवे रूप आले आहे. या बाजार परिसराची पुनर्रचना आणि सुशोभीकरण करण्यासाठी झवेरी बाजार वेल्फेअर असोसिएशनने पुढाकार घ्यावा, राज्य शासनाच्या यंत्रणा त्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
मुंबईच्या ऐतिहासिक दागिने बाजाराचे वैभव, परंपरा आणि आर्थिक महत्त्व पुन्हा प्रदर्शित करण्यासाठी झवेरी बाजार वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने प्रथमच 'झवेरी बाजार जेम्स अँड ज्वेलरी फेस्टिव्हल 2025' चे आयोजन करण्यात आले आहे. हा उत्सव 22 सप्टेंबर ते 26 ऑक्टोबर 2025 दरम्यान आयोजित करण्यात आला असून 6 ते 16 ऑक्टोबर 2025 दरम्यान चालणाऱ्या मुख्य प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झवेरी बाजार परिसरात झाले. कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, झवेरी बाजार वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष हितेश जैन, सचिव किशोर जैन यांच्यासह ज्वेलरी क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते
प्रचार-प्रसिद्धीसाठी 'डिजिटल कुंभ' संकल्पना
प्रचार-प्रसिद्धीसाठी 'डिजिटल कुंभ' संकल्पना
कुंभमेळ्याच्या प्रचार-प्रसिध्दीसाठी 'डिजिटल कुंभ' ही संकल्पना राबविण्यात यावी. प्रचार प्रसिध्दीसाठी स्वतंत्रपणे वेगळा आराखडा तयार करून नियोजन करण्यात यावे. कुंभमेळा कामांसंदर्भात कोणत्याही प्रकारची नकारात्मक प्रसिद्धी होत असल्यास संबंधित विभागांनी यासंदर्भातील वस्तूनिष्ठ खुलासा त्वरित संबंधित माध्यमांना द्यावा. कुंभमेळ्यासाठीच्या आवश्यक कामांसाठी जिल्हास्तरावरील नोकरभरतीलाही गती देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, कुंभमेळ्यासाठीची विविध कामे वेगाने पूर्ण करण्यावर भर देण्यात यावा. तयार होणाऱ्या सुविधा या दीर्घकालीन असाव्यात असेही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, कुंभमेळ्यासाठीची सर्व कामे दर्जेदार आणि वैशिष्ट्यपूर्ण होतील याकडे लक्ष द्यावे. पोलिसांच्या निवासव्यवस्थेसही प्राधान्य द्यावे, असे श्री. पवार यांनी सांगितले.
अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ म्हणाले, कुंभमेळा कालावधीत व नेहमीसाठीही नदीपात्रातील पाणी शुद्ध राहील यासाठी उपाययोजना करण्यात याव्यात. तसेच नागरिकांची गैरसोय होणार नाही यादृष्टीने नियोजन करण्यात यावे.
शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे म्हणाले, अनेक तीर्थक्षेत्रे कुंभमेळ्याच्या परंपरेशी जोडलेली असल्याने कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर जवळपासच्या तीर्थक्षेत्रांच्या विकासकामांनाही गती देण्यात यावी.
जलसंपदा मंत्री गिरीश महाजन म्हणाले, कुंभमेळ्यापुर्वी रस्त्यांची तसेच मलनिस्सारणाची कामे पूर्ण करण्यात यावीत.
प्रचार-प्रसिद्धीसाठी 'डिजिटल कुंभ' संकल्पना
प्रचार-प्रसिद्धीसाठी 'डिजिटल कुंभ' संकल्पना
कुंभमेळ्याच्या प्रचार-प्रसिध्दीसाठी 'डिजिटल कुंभ' ही संकल्पना राबविण्यात यावी. प्रचार प्रसिध्दीसाठी स्वतंत्रपणे वेगळा आराखडा तयार करून नियोजन करण्यात यावे. कुंभमेळा कामांसंदर्भात कोणत्याही प्रकारची नकारात्मक प्रसिद्धी होत असल्यास संबंधित विभागांनी यासंदर्भातील वस्तूनिष्ठ खुलासा त्वरित संबंधित माध्यमांना द्यावा. कुंभमेळ्यासाठीच्या आवश्यक कामांसाठी जिल्हास्तरावरील नोकरभरतीलाही गती देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, कुंभमेळ्यासाठीची विविध कामे वेगाने पूर्ण करण्यावर भर देण्यात यावा. तयार होणाऱ्या सुविधा या दीर्घकालीन असाव्यात असेही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
नदीपात्रातील पाणी स्वच्छ राहील यावर कटाक्षाने भर द्यावा
नदीपात्रातील पाणी स्वच्छ राहील यावर कटाक्षाने भर द्यावा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, सिंहस्थ कुंभमेळा हा धार्मिक श्रद्धेचे प्रतीक आहे .संपूर्ण कुंभमेळा कालावधीत रामकुंडात आणि नेहमीसाठीच नदीपात्रातील पाणी स्वच्छ राहील हे कटाक्षाने पहावे. मलनि:स्सारणाची कामे प्राधान्याने हाती घेवून पूर्ण करण्यात यावीत. विमानतळे आणि रेल्वे सुविधांची कामेही गतीने पूर्ण करावीत. नाशिकमधील नवीन रिंग रोडचे काम त्वरित पूर्ण करावे. या कामात दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही. यासाठी संबंधित विभागांनी आवश्यक निधी त्वरित मंजूर करुन घ्यावा. इतर रस्त्यांची कामेही त्वरित हाती घेण्यात यावी. कामे अपूर्ण राहिल्याने नागरिकांची गैरसोय होता कामा नये याकडे लक्ष द्यावे. विविध आखाड्यांशी चर्चा करून त्यांच्या गरजेनुसार साधूग्राममध्ये सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात. सीसीटीव्ही कॅमेरे प्रणाली केंद्रीकृत पद्धतीने तयार करण्यात यावी. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी 'एआय'च्या विविध पर्यायांचा वापर करण्यात यावा. 'मार्व्हल'चाही उपयोग करून घेण्यात यावा. पोलिसांच्या निवासासाठीची व्यवस्था प्राधान्याने करण्यात यावी. द्वारका सर्कल येथील कामे त्वरित पूर्ण करावी. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेव्दारे बस सेवेचे नियोजन करण्यात यावे. वाहनतळांच्या ठिकाणी भंडारा/लंगरची व्यवस्था करण्यात यावी असे निर्देश श्री. फडणवीस यांनी दिले.
नाशिकमधील नवीन रिंग रोडचे व साधूग्रामचे काम त्वरित पूर्ण करावे
नाशिकमधील नवीन रिंग रोडचे व साधूग्रामचे काम त्वरित पूर्ण करावे
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
§ सिंहस्थ कुंभमेळ्यासाठीची पायाभूत सुविधांची सर्व कामे
दर्जेदार व गतीने पूर्ण करण्याचे निर्देश
§ नाशिक - त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा 2027 आढावा बैठक
मुंबई, दि. 4 : कुंभमेळा श्रद्धा, सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेचे प्रतीक आहे. नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यासाठीची पायाभूत सुविधांची सर्व कामे दर्जेदार आणि गतीने पूर्ण करण्यात यावीत असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. नाशिकमधील नवीन रिंगरोडचे काम पूर्ण करण्याबरोबरच साधू ग्राम/टेंटसीटीसाठीची भूसंपादनाची कामेही गतीने पूर्ण करण्यात यावीत असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे नाशिक - त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा 2027 आढावा बैठक झाली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे, पणनमंत्री जयकुमार रावल, नाशिक जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, मुख्य सचिव राजेशकुमार, पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला, संबंधित विभागांचे सचिव उपस्थित होते. नाशिकचे विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांनी सादरीकरणाव्दारे नियोजनाची माहिती दिली. जिल्हाधिकारी जलज शर्मा, आयुक्त मनीषा खत्री, कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त करिश्मा नायर हे उपस्थित होते.
गर्दीचे नियोजन, कोणतीही दुर्घटना होऊ नये यासाठीच्या उपाययोजना करण्यात आल्याचे तसेच रस्त्यांची व मलनि:स्सारणाची कामे वेगाने पूर्ण करण्यास प्राधान्य देण्यात येत असल्याचे श्री. गेडाम यांनी सांगितले.
शेतकऱ्याला आपली ताकदओळखायला लावायची आणि सहकारच्या माध्यमातून
शेतकऱ्याला आपली ताकद
ओळखायला लावायची आणि सहकारच्या माध्यमातून त्याला सशक्त करायचं या विचारातूनच आशिया खंडातील पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरानगरला उभा राहिला. हा केवळ उद्योग नव्हता तर तो ग्रामीण भारतातील परिवर्तनाचा एक आरंभबिंदू होता. आज या कारखान्याची क्षमता वाढत असताना शेतकऱ्यांनाही नवे तंत्रज्ञान स्वीकारून उत्पादन वाढवावे लागेल. सहकाराच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या घरामध्ये समृद्धी आली, त्यांच्या मदतीने शिक्षण संस्था उभ्या राहिल्या, ग्रामीण भागामध्ये लक्ष्मी बरोबरच सरस्वतीदेखील नांदू लागली. सहकार चळवळ अडचणीत येत असताना केंद्र सरकारने 'सहकारातून समृद्धी' ही संकल्पना व्यवहारात आणली. मोलायसिसवरील कर २८ टक्क्यावरून ५ टक्क्यावर आणण्याचा निर्णय केंद्राने घेतला आहे. नव्याने स्थापन झालेल्या सहकार क्षेत्रातील संस्थानमुळे राज्याच्या सहकार क्षेत्राला संजीवनी मिळाली आहे, असे श्री. पवार म्हणाले. नैसर्गिक आपत्तीतून शेतकऱ्यांना सावरण्यासाठी लवकरच पंचनामे पूर्ण करून शेतकऱ्यांना भरीव मदत करण्यात येईल, शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहील असेही ते म्हणाले.
प्रास्ताविकात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, आजचा दिवस सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाईल. सहकारमंत्री प्रवरानगरमध्ये दुसऱ्यांदा येत आहेत. देशातील पहिल्या सहकार मंत्रालयाची जबाबदारी ते सक्षमपणे सांभाळत आहेत. केंद्र शासनाच्यावतीने सहकार चळवळीला दिशा देण्याचे काम केले जात आहे. राज्य दुष्काळमुक्त करण्यासाठी पश्चिम वाहिनींच्या नद्यांचे पाणी मराठवाड्यात आणण्याचे काम राज्य शासन करत आहे. येत्या काळात राज्य निश्चितच दुष्काळमुक्त होईल. सहकार चळवळीच्या विचारांशी कधीही प्रतारणा होऊ दिली जाणार नाही.
प्रवरा उद्योग समूहाच्यावतीने राज्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी १ कोटी रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
याप्रसंगी आमदार रविंद्र चव्हाण, शिवाजीराव कर्डिले, मोनिका राजळे, अमोल खताळ, आशुतोष काळे, किरण लहामटे, विक्रम पाचपुते, विठ्ठलराव लंघे, काशिनाथ दाते, प्रवरा अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. राजेंद्र विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील आदी उपस्थित होते.
Featured post
-
एक सुट्टी घ्या ... लोक सुट्ट्या का घेत नाहीत याची कारणे काय असावीत बरे...? एक म्हणजे सुट्टी घेणारा माणूस हा गृहपाठ चुकवणाऱ्या मुला प्र...
-
मा. लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत रस्ते, गटारे व अन्य मुलभूत सुविधांच्या कामांबाबत. महाराष्ट्र शासन ग्राम ...
-
गुडघे दुखी / ढोपर दुखी कारणे - व्यायामाचा अभाव , वाढलेले जास्त वजन , बद्धकोष्ठता , थंड पाणी / पेय उभ्याउभ्याने ...