Sunday, 5 October 2025

गडचिरोली पोलाद सिटी

 गडचिरोली पोलाद सिटी

गडचिरोली येथे पोलाद सिटीत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येत असूनहा एक आकांक्षित जिल्हा आहे. महाराष्ट्र राज्य मायनिंग कॉर्पोरेशनला एरिया लिमिटमध्ये सवलत मिळावीअशी विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे केली. गडचिरोलीत पोलाद उत्पादनाची प्रचंड क्षमता असूनहे स्टील, ग्रीन स्टील असणार आहे. चीनपेक्षाही कमी किंमतीत हे स्टील उपलब्ध होणार आहे. गडचिरोलीत १ लाख कोटींहून अधिकची गुंतवणूक यापूर्वीच आलेली आहे. हा जिल्हा नक्षलमुक्त करुन विकासाच्या अमाप संधी यातून निर्माण होणार आहेत.

आदिवासी विकास विभागाचा गोदरेज एंटरप्रायजेस व एएसडीसीसोबत सामंजस्य करार

 आदिवासी विकास विभागाचा गोदरेज एंटरप्रायजेस व एएसडीसीसोबत

सामंजस्य करार

  • आदिवासी युवकांना मिळणार औद्योगिक प्रशिक्षण

मुंबईदि. २६ : आदिवासी युवकांना उद्योग क्षेत्रात रोजगार मिळवून देण्यासाठी आदिवासी विकास विभागाने गोदरेज एंटरप्राईजेस व ऑटोमोटिव्ह स्कील डेव्हलपमेंट कौन्सिल (ASDC) यांच्यासोबत सी एस आर अंतर्गत सामंजस्य करार केला आहे.

 

  हा सामंजस्य करार आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली व आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त तथा शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोड यांच्या उपस्थितीत मंत्रालयात झाला.

 

   या कराराअंतर्गत २१० आदिवासी युवकांना मोफत फोर्कलिफ्ट ऑपरेटर व मोटर ड्रायव्हिंगचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. या प्रशिक्षणाद्वारे युवकांना उद्योग क्षेत्रातील आवश्यक तांत्रिक कौशल्येप्रमाणपत्रे व परवाने मिळतील तसेच उद्योगांमध्ये थेट रोजगाराच्या संधी निर्माण होणार असल्याचे आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे यांनी सांगितले.

 

  यावेळी गोदरेज एंटरप्राईजेसचे सी एस आर प्रमुख अश्विनी देवदेशमुखप्रफुल मोरेएएसडीसीचे प्रादेशिक प्रमुख आनंद खाडेस्टेट कोऑर्डिनेटर प्रसाद राठोडतसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 

 युवकांनी एकलव्य कौशल्य योजनेच्या पोर्टलवर नोंदणी करून या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा असे आवाहन विभागामार्फत करण्यात आले आहे.

 

ग्रामीण भागाच्या विकासासाठी अभियान महत्त्वपूर्ण असून यातील विविध बाबींची अंमलबजावणी करताना

 ग्रामीण भागाच्या विकासासाठी अभियान महत्त्वपूर्ण असून यातील विविध बाबींची अंमलबजावणी करताना गावातील रस्तेशाळा यासह विविध सुविधांमध्ये सकारात्मक बदल दिसून येतील असेही त्यांनी सांगितले.

            प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबर २०२५ रोजी अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. अभियान ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत सुरू राहणार आहे. यामध्ये पारदर्शक प्रशासनआरोग्यशिक्षणमहिला सक्षमीकरणरोजगारपर्यावरणकर वसुलीलोकसहभाग या बाबींचा समावेश आहे. एकूण १०० गुणांच्या आधारे मूल्यांकन केले जाणार आहे.

            मंत्रालयात अभियानाच्या आढाव्यासाठी झालेल्या बैठकीस ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले आणि विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

गाव भेटीतून ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाला’ गती देणार

 गाव भेटीतून मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाला गती देणार

- ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे

मुख्य कार्यकारी अधिकारीगटविकास अधिकारी यांना ग्रामसभांना उपस्थित राण्याचे निर्देश

 

मुंबईदि. २६ :- गावभेटीतून मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत अभियानाला गती देण्यावर भर देण्यात येत असून या अभियानांतर्गत होणाऱ्या ग्रामसभा  उपक्रमांना वरिष्ठ अधिकारी यांनी उपस्थित राहून उपक्रम राबविण्यात सक्रिय सहभाग घेवून गावकऱ्यांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांनी केले.

            ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे म्हणालेराज्यात या अभियानाची अंमलबजावणी सुरू झाली असून राज्यस्तरीय शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झाला. अभियान अंतर्गत गावांमध्ये चांगली कामे होत असून या अभियानाला अधिक प्रभावी बनविण्यासाठी ग्रामविकास विभागातील वरिष्ठ अधिकारी तसेच जिल्हा पातळीवरील मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारीगटविकास अधिकारी यांनी गावांमध्ये ग्रामसभांना उपस्थित राहून सक्रिय सहभाग घेवून गावकऱ्यांना प्रोत्साहन द्यावे.

          अभियान अंमलबजावणीच्या पाहणीसाठी मुख्यमंत्री फडणवीस हे देखील विविध जिल्ह्यातील गावांमध्ये जाणार आहेत. मी स्वतः दोन महिने अभियान कालावधीत राज्यातील सर्व भागातील गावात जात असून यातून गावातील विकासकामांना देखील गती मिळणार आहे, असे मंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले.

स्वदेशी '४जी' तंत्रज्ञान फक्त 22 महिन्यात विकसित करून भारताने जगात नवी ओळख निर्माण केली

 केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे म्हणाल्याप्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आत्मनिर्भरतेचे स्वप्न बीएसएनएलच्या माध्यमातून पूर्ण होताना दिसत आहे. स्वदेशी '४जी' तंत्रज्ञान फक्त 22 महिन्यात विकसित करून भारताने जगात नवी ओळख निर्माण केली आहे. नेटवर्किंगसंरक्षण क्षेत्रअवकाश विज्ञानमाहिती तंत्रज्ञान आदी क्षेत्रात भारताची क्षमता जगासमोर येऊ लागली आहे. पुढील काळात आपण '५जी' आणि '६जी' कडे जाणार आहोत. या नेटवर्कच्या माध्यमातून ग्रामीणआदिवासी भागात जाणार असून 25 हजार ठिकाणी पोहोचणार आहोत. स्वतःचे तंत्रज्ञान विकसित झाल्याने राष्ट्रीय सुरक्षेसाठी हे अत्यंत महत्वाचे पाऊल आहेअसेही त्यांनी यावेळी सांगितले.

प्रास्ताविकात हरिंदर कुमार यांनी महाराष्ट्रात 9 हजार 30 टॉवर्सचे उद्घाटन होत असून त्यात डिजिटल भारत निधी '४जीप्रकल्पांतर्गत 2 हजार 174 टॉवर्सचा समावेश आहे. राज्य शासनाने 2 हजार 751 टॉवर्ससाठी विनामूल्य जमीन उपलब्ध करून दिली असून वीजेची व्यवस्थाटॉवर्सपर्यंत पोहोचण्याचा रस्त्यांचा अधिकार (राईट ऑफ वे) आदी सुविधांद्वारे सहकार्य केले आहे. आगामी काळात 930 अतिरिक्त टॉवर्सद्वारे जोडणी नसलेल्या गावांपर्यंत पोहणार असल्याची माहिती दिली.

बीएसएनएलची स्वदेशी '४जी' ची यशोगाथा जगात उल्लेखनीय ठरेल

 बीएसएनएलची स्वदेशी '४जीची यशोगाथा जगात उल्लेखनीय ठरेल

- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

उपमुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणालेआत्मनिर्भर सशक्त भारताच्या दृष्टीने आजचा क्षण अत्यंत महत्वाचा आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताने आपली ओळख निर्माण केली आहे. औद्योगिक क्रांतीच्या नंतरचे हे सर्वात मोठे अभियान आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात भारताने एक महासत्ता म्हणून आपले स्थान पक्के केले आहे.

बीएसएनएल आता नफ्यात आले असून पुढे जात असल्याचा आनंद आहे. स्वदेशी '४जीतंत्रज्ञान विकसित करून डिजिटल भारताकडे आपली वाटचाल सुरू आहे. बीएसएनएल पुढे जाण्यासाठी हे तंत्रज्ञान म्हणजे महत्वाचे पाऊल आहे. जे अमेरिकेला साध्य झाले नाही ते भारताने करून दाखविले आहे. ग्रामीण भागालाग्रामीण भागात शिक्षणदूरस्थ आरोग्य सेवा (टेलिमिडेसिन)पर्यटन आदीला याचा फायदा होईल. बीएसएनएलची स्वदेशी '४जी'ची यशोगाथा जगात उल्लेखनीय ठरेल. या तंत्रज्ञानामुळे बीएसएनएलचा नवा प्रवास सुरू होत आहे. 2047 पर्यंत विकसित भारताचे प्रधानमंत्री श्री. मोदी यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जे जे साहाय्य लागेल ते महाराष्ट्र करेलअसेही उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

सी-डॉट, तेजस, आयआयटी, टीएसएस आणि बीएसएनएल यांनी शुद्ध, देशी तंत्रज्ञानावर

 सुरूवातीला स्वतःचे '४जी' तंत्रज्ञान फिनलँडस्वीडनचीन आणि दक्षिण कोरिया या चार देशांकडे होते. चीन हे तंत्रज्ञान देण्यासाठी सहकार्य करणार नव्हते. त्यामुळे आत्मनिर्भर भारत करण्यासाठी तंत्रज्ञान निर्मितीसाठी देशातील कंपन्यांना एकत्रित करून प्रयत्न सुरू झाले. सी-डॉटतेजसआयआयटी,  टीएसएस आणि बीएसएनएल यांनी शुद्धदेशी तंत्रज्ञानावर आधारित '४जी' तंत्रज्ञानाची निर्मिती करून भारत या क्षेत्रातील पाचवा देश बनला आहे. भारताला ज्या-ज्यावेळी कोणी आव्हान दिले त्यावेळी भारताने आपली क्षमता दाखवून दिली आहे. भारतातील ज्ञानतेजकर्मण्यते्द्वारे आपण जगाला उत्तर देऊ शकतो आणि आजचा कार्यक्रम त्याचाच एक भाग आहेअसे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

गावात इंटरनेट पोहोचते तेव्हा आपण गावाला जगाशी जोडत असतो. आरोग्यशिक्षण क्षेत्रासाठी कनेक्टीव्हीटी महत्वाची आहे. शेतकऱ्यांना हवामानाचीवातावरण बदलाची माहिती देऊन त्यांचे नुकसान टाळता येते. स्मार्ट व्हिलेजच्या सहाय्याने गावातील सर्व व्यवस्था उत्तम करता येतात. उद्योगशेतीबाजारासाठी कनेक्टीव्हीटी महत्वाची आहे. कनेक्टीव्हीटीमुळे व्यवस्थेत परिवर्तन होण्यासोबत पारदर्शकता येते. तंत्रज्ञान ही भेदरहित व्यवस्था आहे. ते गावापर्यंत पोहोचविण्याचे साधन म्हणजे ही '४जी' कनेक्टिव्हिटी आहे. या टॉवर्समध्ये '५जी' मध्ये अद्ययावत होण्याची क्षमता आहे. तंत्रज्ञान निर्माण करण्यात यश आल्याने जगाच्या एक पाऊल पुढे जाण्याची आपली तयारी आहेअसे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

Featured post

Lakshvedhi