गाव भेटीतून ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाला’ गती देणार
- ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे
मुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी यांना ग्रामसभांना उपस्थित राहण्याचे निर्देश
मुंबई, दि. २६ :- ‘गावभेटीतून मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत अभियाना’ला गती देण्यावर भर देण्यात येत असून या अभियानांतर्गत होणाऱ्या ग्रामसभा व उपक्रमांना वरिष्ठ अधिकारी यांनी उपस्थित राहून उपक्रम राबविण्यात सक्रिय सहभाग घेवून गावकऱ्यांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांनी केले.
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे म्हणाले, राज्यात या अभियानाची अंमलबजावणी सुरू झाली असून राज्यस्तरीय शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झाला. अभियान अंतर्गत गावांमध्ये चांगली कामे होत असून या अभियानाला अधिक प्रभावी बनविण्यासाठी ग्रामविकास विभागातील वरिष्ठ अधिकारी तसेच जिल्हा पातळीवरील मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी यांनी गावांमध्ये ग्रामसभांना उपस्थित राहून सक्रिय सहभाग घेवून गावकऱ्यांना प्रोत्साहन द्यावे.
अभियान अंमलबजावणीच्या पाहणीसाठी मुख्यमंत्री फडणवीस हे देखील विविध जिल्ह्यातील गावांमध्ये जाणार आहेत. मी स्वतः दोन महिने अभियान कालावधीत राज्यातील सर्व भागातील गावात जात असून यातून गावातील विकासकामांना देखील गती मिळणार आहे, असे मंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment