Saturday, 6 September 2025

फार्मर कप’ ला लोकचळवळ बनवून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्नशील

 फार्मर कप’ ला लोकचळवळ बनवून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्नशील  

- आमीर खान

      राज्य शासनासोबतची भागीदारी पाणी फाउंडेशनला राज्यातील प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्याची मोठी संधी देत आहे. ज्ञानप्रशिक्षण आणि सामूहिकीकरणाच्या माध्यमातून शेतकरी कुटुंबांचे उत्पन्न आणि उत्पादकता वाढवण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करू. फार्मर कपला लोकचळवळ बनवून शेतकऱ्यांची उपजीविका उंचावण्यासाठी प्रयत्नशील राहूअसे मत पाणी फाउंडेशनचे संस्थापक आमीर खान यांनी व्यक्त केले.

पाणी फाउंडेशनने २०२१ पासून “सत्यमेव जयते फार्मर कप” या उपक्रमाच्या

 पाणी फाउंडेशनने २०२१ पासून सत्यमेव जयते फार्मर कप या उपक्रमाच्या माध्यमातून ५० हजाराहून अधिक शेतकऱ्यांना शेतकरी गटात संघटित केले आहे. यापैकी जवळपास अर्धे गट महिला शेतकऱ्यांचे असल्यामुळेहा उपक्रम महिला सक्षमीकरणासाठी एक प्रभावी व्यासपीठ ठरला आहे. सध्याहा उपक्रम महाराष्ट्रातील ४६ तालुक्यांमध्ये आयोजित केला जातो. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ झाली आहे. तरीहीग्रामीण भागातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी शेतीमध्ये सामूहिकीकरणासाठी लोकचळवळीला प्रोत्साहन देण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्हा आणि गावात विस्तार करण्याची क्षमता आणि गरज आहे.

पाणी फाउंडेशनने २०२१ पासून “सत्यमेव जयते फार्मर कप” या उपक्रमाच्या माध्यमातून

 पाणी फाउंडेशनने २०२१ पासून सत्यमेव जयते फार्मर कप या उपक्रमाच्या माध्यमातून ५० हजाराहून अधिक शेतकऱ्यांना शेतकरी गटात संघटित केले आहे. यापैकी जवळपास अर्धे गट महिला शेतकऱ्यांचे असल्यामुळेहा उपक्रम महिला सक्षमीकरणासाठी एक प्रभावी व्यासपीठ ठरला आहे. सध्याहा उपक्रम महाराष्ट्रातील ४६ तालुक्यांमध्ये आयोजित केला जातो. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ झाली आहे. तरीहीग्रामीण भागातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी शेतीमध्ये सामूहिकीकरणासाठी लोकचळवळीला प्रोत्साहन देण्यासाठी राज्यातील प्रत्ये

कृषी क्षेत्रात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर वाढविणे, उत्पादित शेतमालाला योग्य बाजारपेठ मिळवून देणे

 कृषी क्षेत्रात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर वाढविणे, उत्पादित शेतमालाला योग्य बाजारपेठ मिळवून देणे. शेतीमध्ये उत्पादकता वाढविणेशेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासन विविध पातळीवर अनेक उपाययोजना करत आहे. २३ मार्च २०२५ रोजी झालेल्या पाणी फाउंडेशनच्या वार्षिक कार्यक्रमात संपूर्ण महाराष्ट्रात सत्यमेव जयते फार्मर कप ची घोषणा करण्यात आली. सत्यमेव जयते फार्मर कप या उपक्रमाला व्यापक स्वरूपात राबविण्यासाठी राज्य शासन पाणी फाउंडेशनला सहकार्य करेल. फार्मर कप या उपक्रमाला राज्य शासनाशी जोडल्याने कृषी क्षेत्राच्या विकासासाठी मदत होणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी देखील शेतकरी उत्पादक संघटना तसेच शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी अनेक ठोस पावले उचलत आहेत. विकसित महाराष्ट्र २०४७ मध्ये कृषी विकासाला अत्यंत महत्त्व देण्यात आले आहे. त्याच दृष्टीने राज्यातील हा उपक्रम देखील महत्वपूर्ण ठरेलअसे मुख्यमंत्री यांनी सांगितले.

राज्यातील सर्व तालुके आणि गावांमध्ये होणार 'फार्मर कप' उपक्रमाची अंमलबजावणी

 राज्यातील सर्व तालुके आणि गावांमध्ये होणार

'फार्मर कपउपक्रमाची अंमलबजावणी

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

  • 'फार्मर कपद्वारे १५ हजार शेतकरी उत्पादक गट तयार करण्याचे उद्दीष्ट
  • राज्य शासन आणि पानी फाउंडेशनचा संयुक्त उपक्रम

 

मुंबईदि. ४ : राज्यातील सर्व तालुके आणि गावांमध्ये राज्य शासन व पाणी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने 'फार्मर कपया उपक्रमाची व्याप्ती वाढविण्यासाठी कृषी विभागाचे प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. राज्य शासनाची उच्चस्तरीय समिती व पाणी फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने राज्यात २०२६-२७ या वर्षासाठी १५ हजार शेतकरी उत्पादक गट तयार करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना सहभागी करून घेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

अतिवृष्टीने बाधित शेतक-यांना तातडीने मदत देणार; बाधित क्षेत्राचे पंचनामे अंतिम टप्प्यात

 अतिवृष्टीने बाधित शेतक-यांना तातडीने मदत देणार;


बाधित क्षेत्राचे पंचनामे अंतिम टप्प्यात


- कृषी मंत्री दत्तात्रय भरणे


 


        मुंबई, दि. ५ : गेल्या काही दिवसांपासून राज्यात पुन्हा एकदा मॉन्सून सक्रिय झाल्याने अनेक जिल्ह्यांना पावसाचा फटका बसत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्देशानुसार बाधित भागात सुरु केलेले पंचनाम्याचे काम अंतिम टप्यात असून शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्यात येईल. एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही. शेतकरी बांधवांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे, असे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.


            अतिवृष्टीमुळे राज्यातील २९ जिल्ह्यांतील १९१ तालुक्यांमध्ये मोठे नुकसान झाले आहे. या काळात झालेल्या पावसामुळे ६५४ पेक्षा जास्त महसूल मंडळांमधील खरीप पिकांचे नुकसान झाले आहे.राज्यात १४ लाख ४४ हजार ७४९ हेक्टर क्षेत्र (३६, ११, ८७२.५ एकर) बाधित झाले आहे. त्यापैकी १० हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र बाधित असलेले १२ जिल्हे आहेत. यामध्ये दि.१५ ते २० ऑगस्ट दरम्यान पडलेल्या सर्वाधिक पावसामुळे शेती पिकांचे जास्त नुकसान झाले आहे. 


          सर्वाधिक बाधित जिल्हे : नांदेड – ६,२०,५६६ हेक्टर,वाशीम – १,६४,५५७ हेक्टर, यवतमाळ - १,६४,९३२ हेक्टर, धाराशिव - १५०,७५३,बुलढाणा – ८९,७८२ हेक्टर,अकोला - ४३,८२८ हेक्टर,सोलापूर - ४७,२६६ हेक्टर,हिंगोली - ४०,००० हेक्टर क्षेत्रामध्ये बाधित पिके सोयाबीन, मका, कापूस, उडीद, तूर, मूग या पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. काही ठिकाणी भाजीपाला, फळपिके, बाजरी, ऊस, कांदा, ज्वारी व हळद या पिकांनाही फटका बसला आहे.एकूण बाधित जिल्हे नांदेड, वाशीम, यवतमाळ, बुलढाणा, अकोला, सोलापूर, हिंगोली, धाराशिव, परभणी,अमरावती, जळगाव, वर्धा, सांगली, अहिल्यानगर, छ. संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धुळे, जळगाव, रत्नागिरी, चंद्रपूर, सातारा, नाशिक, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, गडचिरोली, रायगड व नागपू

सह्याद्रीच्या हृदयातील अभेद्य गड : प्रतापगड*

 सह्याद्रीच्या हृदयातील अभेद्य गड :  प्रतापगड*

 

सह्याद्रीच्या उंचसखल डोंगररांगांमध्येदाट जंगलांच्या कुशीत आणि नागमोडी घाटांच्या वळणावर अभिमानाने उभा असलेला प्रतापगड हा मराठा इतिहासातील एक सोनेरी पान आहे. या गडाचे सामरिक महत्त्व केवळ त्याच्या उंचसखल भौगोलिक रचनेत नाहीतर आजूबाजूच्या दऱ्याखोऱ्या आणि घाटांवर ठेवलेल्या नियंत्रणातही दडलेले आहे. महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध डोंगरी किल्ला म्हणून या किल्ल्याची ओळख आहे. सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यात महाबळेश्वरच्या नैर्ऋत्येस 13 कि.मी. वर हा किल्ला असून त्याची समुद्रसपाटीपासून उंची 1,092 मी. आहे. पूर्वेकडील बाजूस 340 मी. आणि पश्चिमेकडे 870 मी. खोल दरी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळी खोरे जिंकल्यानंतर मोरो त्रिंबक पिंगळे यांना 1656 मध्ये हा किल्ला बांधून घेण्याची आज्ञा दिली.

प्रतापगड हा बालेकिल्ला आणि त्याच्या सभोवतालचा खालचा भागअशा दोन प्रमुख भागात विभागलेला आहे. डोंगराच्या शिखरावर असलेल्या बालेकिल्ल्यात राजवाडासदरकेदारेश्वर मंदिरेपाण्याच्या टाक्या आणि धान्य-रसद साठवणीसाठीच्या कोठाऱ्या यांसारखी महत्त्वाची बांधकामे होती. तर दक्षिण व पूर्व उतारावर बांधलेल्या खालच्या भागात पहिली तटबंदी आणि प्रचंड बुरुज शत्रूला दरीतच अडकवून ठेवण्यासाठी होती.

मुख्य किल्लामाची आणि बालेकिल्ला असे या किल्ल्याचे तीन भाग होतात. मुख्य किल्ला व बालेकिल्ला भागांत तलाव असून संरक्षणाच्या दृष्टीने किल्ल्याच्या चोहोबाजूंस भक्कम तटबंदी व बुरूज आहेत. बालेकिल्ल्याचे क्षेत्रफळ 3,660 चौ. मी.तर मुख्य किल्ल्याचे 3,885 चौ. मी असून दक्षिणेकडील बुरूज 10 ते 15 मी. उंचीचे आहेत. त्यांपैकी रेडकाराजपहाराकेदार इ. बुरुजांचे अवशेष टिकून आहेत. बुरूज वैशिष्ट्यपूर्ण असून निमुळत्या डोंगर धारेच्या शेवटी आहे. या भागाला माची म्हणतात. कारण अशाच स्वरूपाचे बांधकाम राजगड (सुवेळा व संजीवनी)तोरणा ( झुंजार) या किल्ल्यांवरील माच्यांना आहे. किल्ल्याची तटबंदी काही ठिकाणी तब्बल 40 फूट उंच असून तिच्या भक्कम रचनेमुळे प्रतापगड अभेद्य बनला होता. संपूर्ण बांधकाम काळ्या पाषाणात केले गेले आहे. गडाच्या उंच बुरुजांवरून जावळीच्या खोऱ्यातील डोंगर-दऱ्यांवर सतत नजर ठेवता येत असेत्यामुळे शत्रूच्या हालचाली वेळेत ओळखणे सोपे होत असे.

Featured post

Lakshvedhi