Friday, 5 September 2025

पंचायत विकास अभियान

 अभियानाचे ७ प्रमुख घटक

१. सुशासनयुक्त पंचायत — पारदर्शक व लोकाभिमुख प्रशासन

२. सक्षम पंचायत — आर्थिक स्वावलंबनकंपनी सामाजिक उत्तरदायित्व निधी (CSR) व लोकवर्गणी

३. जलसमृद्धस्वच्छ व हरित गाव — पर्यावरण संरक्षण व पाणी व्यवस्थापन

४. योजनांचे अभिसरण — मनरेगा व इतर योजनांची प्रभावी अंमलबजावणी

५. संस्था सक्षमीकरण — शाळाअंगणवाडीआरोग्य केंद्रे यांची बळकटी

६. उपजीविका विकास व सामाजिक न्याय — रोजगार निर्मिती व महिला सक्षमीकरण

७. लोकसहभाग व श्रमदान — ग्रामस्थांचा प्रत्यक्ष सहभाग व श्रमदान

खरं तर सातवा घटक वैशिष्ट्यपूर्ण असून गावकऱ्यांचा थेट सहभाग व श्रमदान याचा अर्थ लोकसहभाग व श्रमदान यातून हे अभियान लोकचळवळ बनणे अपेक्षित आहे. अभियानाला प्रोत्साहन देण्याचे काम पुरस्काराच्या रूपाने होईल. पुरस्कारांसाठी एकूण २४५.२० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. एकूण १९०२ यशस्वी स्थानिक स्वराज्य संस्थांना पुरस्कार देण्यात येणार आहेत. या गावांच्या विकास कामांसाठी या ग्रामपंचायतींना मोठा निधी उपलब्ध होईल.

पुरस्कार रचना :

 राज्यात प्रथम विजेत्या ग्रामपंचायतीस ५ कोटी रुपयांचा राज्यस्तरीय पुरस्कार दिला जाईल. तर द्वितीय ३ कोटी रुपयेतृतीय २ कोटी रुपये पुरस्कार असेल .

विभागस्तरीय पुरस्कार -

प्रत्येक विभागात ३ ग्रामपंचायतीना पुरस्कार. प्रथम रुपये १कोटीद्वितीय रुपये ८० लाखतृतीय रुपये ६० लाख

शाश्वत विकास साधण्यासाठी ठिबक सिंचन, शेततळी, बंधारे, जलसंवर्धन, जलयुक्त शिवार

 शाश्वत विकासअभियानाचे उद्दिष्ट

            या अभियानाचा मुख्य उद्देश गावागावात सुशासन प्रस्थापित करणेग्रामस्थांमध्ये आत्मनिर्भरता निर्माण करणे आणि विकासासाठी स्पर्धात्मक वातावरण तयार करणे आहे. योजना केवळ प्रशासकीय यंत्रणेपुरती मर्यादित नसूनग्रामस्थांच्या थेट सहभागावर आधारलेली आहे.

ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामविकास विभाग शाश्वत विकास साधण्यासाठी ठिबक सिंचनशेततळीबंधारेजलसंवर्धनजलयुक्त शिवार यांसारख्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करत आहे. सेंद्रिय शेतीला प्रोत्साहनरासायनिक खतांचा वापर टाळण्यासाठी प्रयत्नआवास योजनांतर्गत घरेमहिलांना बचतगटांच्या माध्यमातून सक्षम करणेतसेच दुग्धोत्पादनमधमाशीपालनमत्स्यव्यवसाय आणि कुक्कुटपालन यांना चालना देऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यावर भर देण्यात येत आहे. या प्रयत्नांना अभियानातून प्रोत्साहन मिळणार आहे.

शाश्वत विकासाची दूरदृष्टीपूर्ण लोकचळवळ; "मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान"

 शाश्वत विकासाची दूरदृष्टीपूर्ण लोकचळवळ;

"मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान"

 

आपला भारत देश हा कृषिप्रधान आहे आणि गाव हे त्याचे प्राणकेंद्र आहे. त्यामुळे गावांचे प्रश्न सोडविल्याशिवाय आणि त्यांचा शाश्वत विकास साधल्याशिवाय देशाचा सर्वांगीण विकास शक्य नाही. शाश्वत विकास हा असा विकास आहेजो सध्याच्या पिढीच्या गरजा भागविताना पुढील पिढ्यांसाठी साधन संपत्तीचे सातत्याने संवर्धन करत राहतो. म्हणूनच गावांचा शाश्वत विकास हा आपल्या राज्याच्या व राष्ट्राच्या प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.

आज अनेक गावांमध्ये शिक्षणआरोग्यरोजगाररस्तेपिण्याचे पाणीवीजपुरवठा या मूलभूत गरजांसह रोजगारमाहिती तंत्रज्ञानशाळांमध्ये शिक्षणाचा उच्च दर्जाशिक्षक व विद्यार्थ्यांसाठी सर्वांगीण सुविधाप्राथमिक आरोग्य केंद्रे तेथे औषधांची उपलब्धतातज्ञ डॉक्टरांची सेवा अशा प्राथमिक चांगल्या सुविधा उपलब्ध करणे यासाठी शासन मोठ्या प्रमाणात काम करते.

            या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने ग्रामीण विकासासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलत मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. अभियानाचा शुभारंभ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी १७ सप्टेंबर २०२५ रोजी होणार आहे. ही अंमलबजावणी केवळ स्पर्धात्मक राहणार नसून ग्रामविकास अभियानाला लोकचळवळीचे स्वरूप देणारी ठरेल.

हे अभियान राबविण्याची संकल्पना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आहे. २९ जुलै २०२५ रोजी राज्य मंत्रिमंडळाची यास मंजुरी मिळाली व अभियानाच्या अंमलबजावणीसाठी महत्वाचे पाऊल टाकले गेले. अभियान राबविण्यासाठी ₹२९०.३३ कोटींची तरतूद करण्यात आलीत्यापैकी ₹२४५.२० कोटी पुरस्कारांसाठीतर उर्वरित निधी प्रचारप्रशिक्षण आणि मार्गदर्शनासाठी वापरण्यात येणार आहे.


झुलेलाल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नालॉजी संस्थेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट

 झुलेलाल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नालॉजी संस्थेस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट

 

नागपूरदि. २ :-  गोधनी येथील झुलेलाल इंस्टीट्यूट ऑफ टेक्नालॉजी या संस्थेतर्फे श्री गणेश उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज या संस्थेस भेट देवून श्री गणेशाचे पूजन करुन आरतीत सहभाग घेतला.

यावेळी आमदार परिणय फुकेअल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खानसंस्थेचे अध्यक्ष महेश साधवानीविरेंद्र कुकरेजानॅशनल कॅन्सर इंस्टिट्यूटचे प्रमुख शैलेश जोगळेकरजिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकरतसेच घनशामजी कुकरेलाजयप्रकाश गुप्तागिरीष साधवानीअसरानीसंस्थेचे प्राचार्य डॉ. विवेक नानोटीउपाध्यक्ष एस.ई. चौधरी आदी लोकप्रतिनिधीपदाधिकारी व विद्यार्थींनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

श्री गणेश उत्सवानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. संस्थेचे प्रमुख महेश साधवानी यांनी स्वागत करुन संस्थेच्या उपक्रमाबद्दल माहिती दिली.


जगातील पहिल्या सर्वात लांब डबल डेकर व्हायाडक्ट या पुलाचे सर्व देशांना आकर्षण

 जगातील पहिल्या सर्वात लांब डबल डेकर व्हायाडक्ट या पुलाचे सर्व देशांना आकर्षण आहे. प्रत्यक्ष निर्मितीसंदर्भातील माहिती घेण्यासाठी अभियांत्रिकी व वास्तुकलेतील तज्ञ भेट देवून पाहणी करत आहे. अशा प्रकारच्या डबल डेकर पुलांची निर्मिती करणारे महामेट्रो व नागपूर हे पायोनिअर असल्याचे महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी सांगितले.

प्रारंभी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. त्यानंतर महामेट्रोतर्फे बांधण्यात आलेल्या भारतातील सर्वात लांब डबल डेकर मेट्रो व्हायाडक्ट या पुलाच्या निर्मितीसंदर्भातील चित्रफित यावेळी दाखविण्यात आली. तंत्रज्ञानाचा अतुलनिय वापर करुन उड्डाणपुलावर गड्डीगोदामकडबीचौकइंदोरा चौकनारी रोडऑटोमोटीव्ह चौक या पाच मेट्रो स्थानके बांधण्यात आली आहे. हा उड्डाणपुल चार पदरी असून पहिल्या स्तरावर महामार्गदुसऱ्या स्तरावर मेट्रो आणि जमिन स्तरावर आधीच असलेला महामार्ग आहे. या उड्डाणपुलामुळे कामठी मार्गावरील प्रचंड वाहतूक कोंडीतून नागरिकांना दिलासा मिळाला आहे. यापूर्वी छत्रपती चौकाचा समावेश असलेल्या उड्डाणपुलाला देखील गिनिज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये समावेश करण्यात आला आहे.

कामठी मार्गावरील डबल डेकर व्हायाडक्ट (मेट्रो) हा जगातील

 कामठी मार्गावरील डबल डेकर व्हायाडक्ट (मेट्रो) हा जगातील डबल डेकर व्हायाडक्ट आहे. मेट्रो व हायवे वाहतुकीसाठी ५.६३७ कि.मी. लांबीचा सिंगल कॉलम पिल्लरवर उभा असून हा स्थापत्य कलेचे उत्कृष्ट उदाहरण आहे. तंत्रज्ञानाचा उपयोग करुन बांधलेल्या या उड्डाणपुलाची गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डतर्फे नोंद घेतली आहे. यापुर्वी छत्रपतीनगर येथील ३.२ कि.मी. लांबीच्या डबल डक्ट उड्डाणपुलाची निर्मितीसाठी जागतिक स्तरावर नोंद घेण्यात आली होती. नागपूरला या निर्मितीमुळे संत्रा शहरासोबतच पायाभूत सुविधांचे शहर म्हणून नवीन ओळख मिळाली आहे. या पुरस्काराने नागपूरचा गौरव जागतिक स्तरापर्यंत पोहचला आहे. या डबल डेकर पुलाच्या निर्मितीसोबतच कामठी मार्गावर रेल्वेमहामार्ग वाहतूक तसेच मेट्रो वाहतुकीसाठी जगात प्रथमच अशा प्रकारच्या उड्डाणपुल तयार करण्यात आला आहे. हे जगातील अभियांत्रिकीमधली आश्चर्य आहे. या पुलासाठी १ हजार ६५० टन स्टिलचा वापर करण्यात आला आहे.

जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा असलेले शहर म्हणून नागपूरची नवीन ओळख

 जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा असलेले

शहर म्हणून नागपूरची नवीन ओळख

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये मेट्रोच्या

कामठी मार्गावरील डबल डेकर उड्डाणपुलाची नोंद

 

नागपूरदि. २ :-  महामेट्रोने अल्पावधीत जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांचा विकास केल्यामुळे नागपूर या शहराला जागतिक ओळख मिळाली आहे. महामेट्रोने कामठी मार्गावरील सर्वात लांब ‘डबल डेकर’ पुलाची निर्मिती केली असून या पुलाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. जागतिक दर्जाच्या या पुरस्कारामुळे नागपूर हे जगातील उत्कृष्ट पायाभूत सुविधा असलेले शहर म्हणून नवीन ओळख निर्माण झाली असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. या जागतिक पुरस्काराबद्दल महामेट्रोच्या अधिकाऱ्यांना त्यांनी यावेळी शुभेच्छा दिल्या.

रामगीरी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष उपस्थितीत गिनिज वर्ल्ड रेकॉर्डचे भारतातील प्रतिनिधी स्वप्नील डोंगरीकर यांनी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांना गिनिज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाल्याचे प्रमाणपत्र प्रमाणपत्र प्रदान केले.

Featured post

Lakshvedhi