मुख्यमंत्री म्हणाले की, राज्याच्या विकासाला हातभार लावण्यासाठी प्रशासनाने ए.आय. चा वापर करून अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त विविध सेवा देण्याचा प्रयत्न करावा. यामुळे प्रशासनावरील कामाचा ताण कमी होण्यास मदत होईल. महाराष्ट्र तंत्रज्ञान वापरत असून हा अग्रकम कायम राखण्यासाठी व देशात प्रथम क्रमांकावर राहण्यासाठी नाविन्यपूर्ण व सातत्याने केलेल्या बदलांची प्रभावी अंमलबजावणी करावी. 150 दिवसांच्या कार्यक्रमात अधिकाधिक काम पूर्ण करुन प्रशासनामध्ये बदल करण्यासाठी सामान्य प्रशासनाबरोबरच प्रशिक्षित मनुष्यबळ महत्त्वाचे आहे. आपल्या सर्वांना खूप काम एका वेळेला पद्धतशीरपणे करणे अत्यंत आवश्यक आहे.
सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Sunday, 31 August 2025
जनतेला देण्यात येणा-या सेवा पारदर्शक, गतिशील आणि तंत्रज्ञानयुक्त असाव्यात
शासनाची संस्थात्मक बांधणी करण्यासाठी काळानुरूप बदल आवश्यक’
जनतेला देण्यात येणा-या सेवा पारदर्शक, गतिशील आणि तंत्रज्ञानयुक्त असाव्यात
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
ई-गव्हर्नन्स सुधारणा मोहिमेचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा
मुंबई, दि.29 : शासनाकडून जनतेला देण्यात येणा-या सेवा पारदर्शक, गतिशील आणि तंत्रज्ञानयुक्त असाव्यात. शासनाची संस्थात्मक बांधणी करताना नाविन्यपूर्ण आणि सातत्याने केलेल्या बदलांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासनाने सज्ज असले पाहिजे. प्रशासनाने लोकाभिमुख सेवा वाढविल्या तरच शासनाचे उत्तरदायित्व वाढेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे 150 दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत ई-गव्हर्नन्स सुधारणा मोहिमेत सहभागी विभाग आणि कार्यालये यांच्या अंतरिम प्रगतीचा आढावा बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी मुख्य सचिव राजेश कुमार यांच्यासह विविध विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव, संबंधित जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त, वरिष्ठ पोलीस अधिकारी आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले की, ई-गव्हर्नन्सचे दीडशे दिवसांचे विविध विभागांचे सादरीकरण झाले ते चांगेल आहे. शासनाची संस्थात्मक बांधणी करण्यासाठी शासनाचे सर्व विभाग ई-गव्हर्नन्स सुधारणा मोहिमेत नाविन्यपूर्ण काम करत आहेत, ही चांगली बाब आहे. शासनात अनेक चांगले अधिकारी येतात आणि ते नाविन्यपूर्ण संकल्पना मांडतात पण ती संकल्पना कायमस्वरूपी टिकवण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. प्रशासनात गुणवत्तापूर्ण बदल करताना शासन आणि जनता यांच्यामध्ये समन्वय साधणारी यंत्रणा तयार होणे गरजेचे आहे.
बांद्रा पश्चिम येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळास भेट
बांद्रा पश्चिम येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळास भेट
सध्या होत असलेला गणेशोत्सव हा महाराष्ट्र राज्य महोत्सव 2025म्हणून साजरा होत आहे. मुंबई दौऱ्यावर आलेले केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांनी या निमित्ताने बांद्रा पश्चिम येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळास भेट दिली. यावेळी विविध गणेशभक्तांशी संवाद साधला. गणेश उत्सवानिमित्त मंडळाच्या वतीने प्रेरणादायी देखाव्यांचे प्रदर्शन केले आहे. यातील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्यास त्यांनी अभिवादन केले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड आशिष शेलार उपस्थित होते.
oooo
केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री जे. पी. नड्डा यांनी स्वामी नारायण मंदिर येथे भेट
केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री जे. पी. नड्डा यांनी
स्वामी नारायण मंदिर येथे भेट
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत स्वामीनारायणाचे घेतले दर्शन
मुंबई, दि.31 :- केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री जे. पी. नड्डा यांनी दादर येथील बीएपीएस स्वामी नारायण मंदिर येथे भेट देऊन दर्शन घेतले. यावेळी त्यांच्या समवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड आशिष शेलार, कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा होते.
मंत्री श्री.नड्डा व मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी मंदिर , योगी सभागृह या मंदिर परिसरातील स्थळांची पाहणी केली. प्रभू पूज्य प्रमुख स्वामी महाराज यांनी त्यांना यावेळी मंदिराच्या कार्याची, ब्रम्हानंद शिबिर हिंदोला उत्सव व वर्षभर होणाऱ्या उपक्रम यांची माहिती दिली. यावेळी वैदिक विद्यार्जन करणाऱ्या अनुयायांनी मंत्रोच्चाराच्या घोषात स्वागत केले.
उदयोन्मुख कृषी औद्योगिक क्षेत्रातील शैक्षणिक संधी शैक्षणिक शुल्क प्रतिकृती योजना
उदयोन्मुख कृषी औद्योगिक क्षेत्रातील शैक्षणिक संधी शैक्षणिक शुल्क प्रतिकृती योजना
वसंतदादा साखर संस्था, पुणे येथील इंडस्ट्रियल फर्मिनेशन अँड अल्कोहोल टेक्नॉलॉजी (IFAT) आणि Wine Brewing and Alcohol Technology (WBAT) विद्यार्थ्यांकरिता शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजना असून या अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळालेल्या सर्व पात्र विद्यार्थ्यांना 100 टक्के शैक्षणिक शुल्क रक्कम प्रतिपूर्ती स्वरूपात देण्यात येते. IFAT मधील एकूण 80 विद्यार्थ्यांना 49.40 लाख व WBAT मधील एकूण 28 विद्यार्थ्यांना 34.54 लाख रूपये शैक्षणिक शुल्क अदा करण्यात आले. यापैकी 2022-23 मधील पास झालेल्या विद्यार्थ्यांपैकी एकूण सात विद्यार्थ्यांना नोकरी लागलेली आहे.
उदयोन्मुख कृषी औद्योगिक क्षेत्रातील शैक्षणिक संधी शैक्षणिक शुल्क प्रतिकृती योजना
उदयोन्मुख कृषी औद्योगिक क्षेत्रातील शैक्षणिक संधी शैक्षणिक शुल्क प्रतिकृती योजना
वसंतदादा साखर संस्था, पुणे येथील इंडस्ट्रियल फर्मिनेशन अँड अल्कोहोल टेक्नॉलॉजी (IFAT) आणि Wine Brewing and Alcohol Technology (WBAT) विद्यार्थ्यांकरिता शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजना असून या अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळालेल्या सर्व पात्र विद्यार्थ्यांना 100 टक्के शैक्षणिक शुल्क रक्कम प्रतिपूर्ती स्वरूपात देण्यात येते. IFAT मधील एकूण 80 विद्यार्थ्यांना 49.40 लाख व WBAT मधील एकूण 28 विद्यार्थ्यांना 34.54 लाख रूपये शैक्षणिक शुल्क अदा करण्यात आले. यापैकी 2022-23 मधील पास झालेल्या विद्यार्थ्यांपैकी एकूण सात विद्यार्थ्यांना नोकरी लागलेली आहे.
डॉ. पंजाबराव देशमुख सारथी उच्च शिक्षण देशांतर्गत शिष्यवृत्ती
डॉ. पंजाबराव देशमुख सारथी उच्च शिक्षण देशांतर्गत शिष्यवृत्ती
देशातील नामवंत 200 विद्यापीठात शिकणाऱ्या 300 विद्यार्थ्यांना दरवर्षी शिष्यवृत्ती देण्यात येते. यामध्ये शिक्षण शुल्क, लायब्ररी शुल्क, परीक्षा शुल्क, वसतीगृह शुल्क व भोजन शुल्काची 100 टक्के रक्कम प्रतिपूर्ती स्वरूपात देण्यात येते. सन 2022-23 व 2023-24 मध्ये या योजनेअंतर्गत 441 विद्यार्थ्यांची निवड करण्यात येऊन पाच कोटी रुपयांचा लाभ देण्यात आला आहे. सन 2024-25 मध्ये या योजनेसाठी 270 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. या योजनेसाठी मार्च 2025 अखेर सहा कोटी रुपयांचा लाभ देण्यात आला आहे
Featured post
-
सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव विरेंद्र सिंह म्हणाले की , कर्करोगाविरुद्ध जो लढा आहे , त्यामध्ये प्रत्येकाच्या वाटा फार महत्त्वाचा आहे. ...
-
कोण होता 'चेन्दरू मडावी'...? (विदेशी फिल्म ला ऑस्कर मिळवून देणारा जगातला एकमेव भारतीय आदिवासी मोगली चेन्दरू मडावी...) एक ...
-
नवीन एक्सेस कंट्रोल रस्त्यामुळे कोकणचा कायापालट कोकणात सुरू असलेल्या रेवस रेड्डी सागरी महामार्गावर नऊ ठिकाणी खाडीवर पूल उभारण्याचे काम सुर...