Saturday, 23 August 2025

सामान्यांसाठी घरे उभारण्याचा ‘सोलापूर पॅटर्न’ राज्याला मार्गदर्शक

 सामान्यांसाठी घरे उभारण्याचा सोलापूर पॅटर्न’ राज्याला मार्गदर्शक

ग्रामीण भागात  प्रधानमंत्री आवास  योजनेअंतर्गत ३० लाख घरकुलांना केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. त्यामुळे २०१८ पर्यंत प्रतिक्षा यादीतील सर्व नागरिकांना घरे देण्यात येणार आहे. देशात सर्वाधिक वेगाने घरे ग्रामविकास विभागामार्फत उभारण्यात येत आहेत. २० लाखापेक्षा अधिक घरांचे काम सुरू करण्यात आले आहे. पुढील दोन वर्षात सर्व ३० लाख कुटुंबांचे घराचे स्वप्न पूर्ण होईल. २०१८ च्या यादीतून सुटलेल्या नागरिकांसाठी नव्याने नोंदणी करण्याची परवानगी मिळाल्याने त्यांनाही लवकरच केंद्र सरकारच्या माध्यमातून घरकूल मिळेल. महाराष्ट्र हे पहिले बेघरमुक्त राज्य करायचे आहे. या ३० लाख घरांना केंद्र सरकारच्या अनुदानासोबत राज्य सरकार ५० हजार रुपये देईल आणि प्रत्येक घरावर सौर ऊर्जेचा वापर करून त्यांना मोफत वीज उपलब्ध होईल. याच पद्धतीने सुंदर घरे उभारून गृहनिर्माण क्षेत्रात सोलापूर पॅटर्न’ तयार झाला आहे. एखाद्या खाजगी विकासकाच्या प्रकल्पालाही लाजवेल अशी घरे उभारण्यात आली आहे. सोलापूरने महाराष्ट्राला गरजूंना कमी खर्चात दर्जेदार घरे देण्यासंदर्भात दिशा दाखवली आहेअशा शब्दात श्री.फडणवीस यांनी प्रकल्पाचे कौतुक केले.

सोलापूर शहरात ४८ हजार कुटुंबांना हक्काचे घर देण्याचे नियोजन

 सोलापूर शहरात ४८ हजार कुटुंबांना हक्काचे घर देण्याचे नियोजन

देशाला नवीन दिशा देणारे आणि नवभारताचा पाया रचणारे भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी   यांच्या स्मरणार्थ  प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत राष्ट्रतेज अटल गृहनिर्माण संस्थेने सुंदर गृहनिर्माण प्रकल्प साकारला असल्याचे नमूद करून मुख्यमंत्री म्हणालेगृहनिर्माण प्रकल्पांतर्गत अतिशय सुंदर घरांची निर्मिती करण्यात आली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात  शिक्षणआरोग्यरोजगाराच्या समस्या दूर करतांना सामान्य माणसाला  हक्काचे घर उपलब्ध करून देण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना सुरू करण्यात आली. त्याअंतर्गत पीपीपीच्या माध्यमातून काही प्रकल्प हाती घेण्यात आलेत्यातील हा प्रकल्प आहे.

 या प्रकल्पाला अटल बांधकाम योजनेतून २ लाख रुपये देण्यात आले. हरितपट्टयात मान्यता दिल्याने जागेची किंमत कमी झालीप्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अनुदान मिळाले. त्यामुळे लाभार्थ्याला कमी दरात घरकूल उपलब्ध झाले आहे. लाभार्थ्याला घरभाड्या एवढाच बँकेचा हप्ता भरावा लागणार आहे आणि घर त्याच्या नावाने होईल असे नियोजन करण्यात आले आहे.  प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत केवळ सोलापूरमध्ये ४८ हजार घरांचे नियोजन करण्यात आले आहेत्यापैकी २५ हजार घरांचे काम पूर्ण करण्यात आले. २० हजार घरांचे नगारिकांना वितरण करण्यात आले आणि उर्वरीत घरांचे काम सुरू आहे. याकरिता प्रधानमंत्री महोदयांनी १ हजार कोटी उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गरिबाच्या घराचे स्वप्न पुर्ण करता येणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दहिटणे आणि शेळगी येथील १ हजार ३४८ सदनिकांचे वितरण

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दहिटणे आणि शेळगी येथील १ हजार ३४८ सदनिकांचे वितरण

सोलापूर येथे रोजगार निर्मितीसाठी आयटी पार्क उभारण्यात येईल-मुख्यमंत्री

सोलापूर दि. १७ :  सोलापूरमध्ये आयटी पार्क उभे केल्यास युवकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल. जिल्हा प्रशासनाने उत्तम जागा शोधल्यास महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या माध्यमातून आयटी पार्क उभारण्यात येईल आणि इथे आयटी उद्योग आणण्यात येतील.  शहरात  उद्योगासाठी आवश्यक चांगले रस्ते आणि विमानसेवा उपलब्ध झाल्याने इथल्या औद्योागिक विकासावर भर देण्यात येईलअसे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

शिवकालीन खेळांना प्रोत्साहन देऊन नव्या पिढीपर्यंत

 शिवकालीन खेळांना प्रोत्साहन देऊन नव्या पिढीपर्यंत सांस्कृतिक वारसा पोहोचवण्यासाठी ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव परंपरागत देशी खेळांच्या क्रीडा महाकुंभाचे आयोजन करण्यात आले. परंपरागत खेळांना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून आगामी काळात मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात परंपरागत देशी खेळांचे आयोजन केले जाईल असे कौशल्यरोजगारउद्योजकता व नाविन्यता मंत्री श्री. मंगलप्रभात लोढा यांनी यावेळी सांगितले.

सुदृढ करणाऱ्या परंपरागत खेळांच्या क्रीडा महाकुंभाचे आयोजन

 विधान परिषदेचे सभापती श्री. राम शिंदे म्हणाले कीकौशल्यरोजगारउद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून तन-मनाने सुदृढ करणाऱ्या परंपरागत खेळांच्या क्रीडा महाकुंभाचे आयोजन  करण्यात आले. तसेच  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर देशी खेळांचे मैदान अल्पावधीत उभारण्यात आले. परंपरागत देशी खेळ सामान्यतः ग्रामीण भागात खेळले जातातमात्र लोढा यांनी मुंबईसारख्या शहरात या खेळांचे आयोजन करून खऱ्या अर्थाने देशी खेळांना पुनरुज्जीवित केले. परंपरागत कबड्डीखो-खोकुस्तीपंजा लढवणेतलवारबाजीपावनखिंड दौड (मॅरेथॉन)रस्सीखेचविटी-दांडूमल्लखांब,फुगडी आणि मंगळागौर यासारख्या १८ देशी खेळांच्या या स्पर्धेत २७ हजार खेळाडूंनी मैदान गाजवले. ४५० खेळाडूंना विधान परिषदेचे सभापती राम शिंदे आणि कौशल्य विकास मंत्री श्री.मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. यावेळी लेझीमसह लाठीकाठीतलवारबाजी या साहसी खेळांची प्रात्यक्षिकेही सादर करण्यात आली.

परंपरागत देशी खेळ केवळ शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य देणारेच नाहीत तर या खेळांमुळे संस्कृती

 मुंबईदि.२२ : परंपरागत देशी खेळ केवळ शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य देणारेच नाहीत तर या खेळांमुळे संस्कृती संवर्धनाचे बहुमूल्य कामही होत असल्याचे प्रतिपादन विधान परिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांनी केले. कुर्ला येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मैदानात आयोजित करण्यात आलेल्या ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव देशी खेळांच्या क्रीडा महाकुंभाचे पारितोषिक वितरण आणि समारोप झाला. कौशल्यरोजगारउद्योजकता व नाविन्यता मंत्री श्री. मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त १३ ऑगस्टपासून क्रीडा भारतीच्या सहयोगाने या पारंपरिक देशी क्रीडा महाकुंभचे आयोजन करण्यात आले.

शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य देणारे परंपरागत देशी खेळ, संस्कृती संवर्धनाचेही माध्यम - सभापती प्रा.राम शिंदे ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव परंपरागत देशी खेळांच्या क्रीडा महाकुंभाची जल्लोषात सांगता तब्बल २७ हजार स्पर्धकांनी गाजवले देशी खेळांचे मैदान महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पारंपरिक क्रीडा महाकुंभ भरवणार

 शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य देणारे परंपरागत देशी खेळ,

संस्कृती संवर्धनाचेही माध्यम - सभापती प्रा.राम शिंदे

  • ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव परंपरागत देशी खेळांच्या क्रीडा महाकुंभाची जल्लोषात सांगता
  • तब्बल २७ हजार स्पर्धकांनी गाजवले देशी खेळांचे मैदान

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पारंपरिक क्रीडा महाकुंभ भरवणार


Featured post

Lakshvedhi