Saturday, 23 August 2025

सुदृढ करणाऱ्या परंपरागत खेळांच्या क्रीडा महाकुंभाचे आयोजन

 विधान परिषदेचे सभापती श्री. राम शिंदे म्हणाले कीकौशल्यरोजगारउद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून तन-मनाने सुदृढ करणाऱ्या परंपरागत खेळांच्या क्रीडा महाकुंभाचे आयोजन  करण्यात आले. तसेच  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर देशी खेळांचे मैदान अल्पावधीत उभारण्यात आले. परंपरागत देशी खेळ सामान्यतः ग्रामीण भागात खेळले जातातमात्र लोढा यांनी मुंबईसारख्या शहरात या खेळांचे आयोजन करून खऱ्या अर्थाने देशी खेळांना पुनरुज्जीवित केले. परंपरागत कबड्डीखो-खोकुस्तीपंजा लढवणेतलवारबाजीपावनखिंड दौड (मॅरेथॉन)रस्सीखेचविटी-दांडूमल्लखांब,फुगडी आणि मंगळागौर यासारख्या १८ देशी खेळांच्या या स्पर्धेत २७ हजार खेळाडूंनी मैदान गाजवले. ४५० खेळाडूंना विधान परिषदेचे सभापती राम शिंदे आणि कौशल्य विकास मंत्री श्री.मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. यावेळी लेझीमसह लाठीकाठीतलवारबाजी या साहसी खेळांची प्रात्यक्षिकेही सादर करण्यात आली.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi