Saturday, 23 August 2025

प्रधानमंत्री मातृ वंदन योजना ही महिला व बालकल्याण विभागाकडे अंमलबजावणीसाठी हस्तांतरित

 प्रधानमंत्री मातृ वंदन योजना ही महिला व बालकल्याण विभागाकडे अंमलबजावणीसाठी हस्तांतरित करण्यात आली आहे. विभागाने मागील प्रलंबित असलेल्या लाभार्थ्यांचा आढावा घेऊन त्यांना लाभ देण्याची कार्यवाही पूर्ण करावी. प्रधानमंत्री आयुष्मान भारत आरोग्य पायाभूत सोयी सुविधा मिशन अंतर्गत राज्यात मंजूर असलेल्या विविध कामांसाठी नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोलकडे प्रलंबित असलेल्या परवानग्या तातडीने प्राप्त करून घ्याव्यात.

आपत्कालीन परिस्थितीत उपयोगात येणाऱ्या तात्पुरत्या रुग्णालयाची सुविधा असणारे भीष्म क्यूबनियमितपणे देखरेखीखाली असावेअशा निर्देशही मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी दिले.

पॅरामेडिकलमध्ये लागणाऱ्या मनुष्यबळाचा विचार करावा. नर्सिंग महाविद्यालयांना परवानगी

 आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण विभागाने वैद्यक क्षेत्रात उपलब्ध मनुष्यबळ आणि भविष्यात लागणारे मनुष्यबळाचा अभ्यास करावा. यामध्ये विशेषतः पॅरामेडिकलमध्ये लागणाऱ्या मनुष्यबळाचा विचार करावा. नर्सिंग महाविद्यालयांना परवानगी देताना तेथ पायाभूत सुविधा असल्याच खात्री करून घ्यावी. त्यानंतरच परवानगी देण्यात यावी. आरोग्य क्षेत्रात तातडीने मनुष्यबळ उपलब्ध होण्यासाठी धोरण तयार करावेअसे निर्देशाही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी दिले.

नागरी भागातील नागरिकांना दर्जेदार व आरोग्य सुविधा सहज उपलब्ध होण्यासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत ' हेल्थ अँड वेलनेस सेंटर' ची कामे

 प्रकल्प पूर्णत्वातील विलंब टाळण्यासाठी प्रकल्प होऊ घातलेल्या जागेच्या परवानग्या प्राप्त करून घ्याव्यात. त्यानंतरच प्रकल्पाचे काम सुरू करण्यात यावेसे निर्देश देत मुख्यमंत्री श्री फडणवीस म्हणालेविविध विभागयंत्रणांकडून काम सुरू करण्यासाठी सबंधित परवानगी आगाऊ स्वरूपात दिल्यास काम तातडीने सुरू होऊ शकते. टप्पानिहाय कामांमध्ये पाहिल्या टप्प्याचे काम सुरू करून पुढील टप्पा पूर्ण होईपर्यंत परवानगी प्राप्त करून घ्यावी. नागरी भागातील नागरिकांना दर्जेदार व आरोग्य सुविधा सहज उपलब्ध होण्यासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत हेल्थ अँड वेलनेस सेंटरची कामे पूर्ण करावीत.

नागरी भागात पाणीपुरवठा, मलनिःसारण, हरित उद्याने व सरोवर पुनरुज्जीवन करण्यासाठी केंद्र शासनाकडून अमृत अभियानांतर्गत निधी

 अमृत २.० अभियानाचा आढावा घेताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेनागरी भागात पाणीपुरवठामलनिःसारणहरित उद्याने व सरोवर पुनरुज्जीवन करण्यासाठी केंद्र शासनाकडून अमृत अभियानांतर्गत निधी देण्यात येत आहे. नागरी भागात जनसामान्यांच्या जीवनात लाग्र बदल  घडवून त्यांचे जीवन सुसह्य करण्याची क्षमता या अभियानात आहे. त्यामुळे यंत्रणांनी मिशन मोडवर या अभियानांतर्गत प्रलंबित असलेल सर्व कामे ३१ मार्च २०२६ पूर्वी पूर्ण करावीत. अभियानांतर्गत प्रलंबित असलेल्या प्रशासकीय मान्यता तातडीने देण्यात याव्यात. तसेच नियमानुसार स्थानिक स्वराज्य संस्थेंकडून त्यांचा सहभाग उपलब्ध करुन द्यावा.

जनसामान्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी

 जनसामान्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी

योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी

-         मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

  • सामाजिक क्षेत्र वॉर रूम मधील योजनांची आढावा बैठक

 

मुंबईदि. २२ : जनसामान्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासन विविध योजनाउपक्रम व अभियानांची अंमलबजावणी करीत असते. या सर्वांचे प्रभावी कार्यान्वयन करण्याची जबाबदारी संबंधित यंत्रणांची आहे. यंत्रणांनी योजनांच्या परिणामकारक अंमलबजावणीतून जनसामान्यांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवून आणावेअसे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. केंद्रीय योजनांच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र कुठेही मागे पडणार नाहीयाबाबत यंत्रणांनी सतर्क राहण्याचे निर्देशही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

 

गणपती विशेष रेल्वे सेवागणेशोत्सव २७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर दरम्यान साजरा

 गणपती विशेष रेल्वे सेवा

गणेशोत्सव २७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर दरम्यान साजरा होणार असून११ ऑगस्टपासून गणपती विशेष रेल्वे सेवा सुरू झाल्या आहेत. या विशेष रेल्वे सेवांचा विस्तार कोकण रेल्वेमध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे मार्गांवर झाला आहे. या विशेष रेल्वेगाड्यांचे थांबे  वाढविले आहेत.

             यामध्ये कोल्हापूरसोलापूरछत्रपती संभाजी नगरनांदेडपुणेमुंबईठाणेपनवेलकर्जतलोणावळाखान्देश्वररत्नागिरीसावंतवाडीथिवीमकरमाळीमडगावकाणकोणगोवावास्कोसांगलीमिरजकुडाळसिंधुदुर्गराजापूरनांदगाववलवईवेंगुर्लामालवणदेवगडनिपाणीसावर्डेकोलादतारकर्लीमालगुंडआचरावेंगुर्ला रोडसावर्डे रोडकणकवली रोडकुडाळ रोडसिंधुदुर्ग रोडराजापूर रोडनिपाणी रोड आदी ठिकाणांचा समावेश आहे.

या रेल्वे सेवांबाबत अधिक माहिती आयआरसीटीसी वेबसाईटरेल्वे वन ॲप आणि संगणकीकृत पीआरएस वर उपलब्ध आहे.

पिठोरी पूजन (मातृदिन) : संततीसाठी मातृशक्तीची प्रार्थना 🌸

 पिठोरी पूजन (मातृदिन) : संततीसाठी मातृशक्तीची प्रार्थना 🌸


भारतीय संस्कृतीत "माता" हाच सृष्टीचा मूलाधार मानला गेला आहे. संततीचे कल्याण, आरोग्य आणि दीर्घायुष्य यासाठी माता जी उपासना करते, त्यात पिठोरी अमावस्या (म्हणजेच मातृदिन) विशेष स्थान आहे. हा दिवस केवळ धार्मिक व्रत नसून आईच्या निःस्वार्थ भावनेचे व त्यागमय शक्तीचे प्रतीक आहे.



---


📜 ऐतिहासिक पार्श्वभूमी


भाद्रपद कृष्ण पक्षातील अमावस्येला पिठोरी अमावस्या पाळली जाते. याची मुळे वैदिक व पुराणकालीन परंपरेत दिसतात.


स्कंद पुराणात व्रतकथेचे वर्णन असून यात "संततीचे रक्षण व वृद्धी" हा प्रमुख उद्देश आहे.


"पिठोरी" या शब्दाचा अर्थ पीठापासून घडविलेली मूर्ती. या दिवशी देवीच्या 64 योगिनींची पीठातील प्रतिकात्मक मूर्ती घडवून त्यांची पूजा केली जाते.


पिठोरी अमावस्या ही स्त्रीप्रधान परंपरा आहे. माता आपल्या मुलांच्या सुरक्षिततेसाठी देवतेचे स्मरण करून निसर्गाशी एकरूप होते.




---


🌺 पूजनकथा


लोकमान्यतेनुसार एकेकाळी एका राणीला अनेक मुलं असूनसुद्धा त्यांचा अकाली मृत्यू होत असे. दुःखाने ग्रस्त राणीला एका ऋषींनी "पिठोरी व्रत" सांगितले. राणीने पीठापासून 64 योगिनींच्या प्रतिमा बनवून मातृदेवतेची पूजा केली. तिच्या प्रार्थनेने मुलांचे रक्षण झाले.

या कथेवरून पिठोरी पूजन ही परंपरा प्रचलित झाली.



---


🪔 पूजन पद्धती


1. स्नान व संकल्प – स्त्री उपवास करून व्रताचा संकल्प घेते.



2. पीठाची मूर्ती निर्मिती – 64 योगिनी व मातृदेवता यांच्या पीठातील मूर्ती किंवा प्रतीके बनवली जातात.



3. पूजन व नैवेद्य – फुले, दुर्वा, अक्षता, हळद-कुंकू अर्पण करून देवीला नैवेद्य दाखविला जातो.



4. कथा वाचन – संध्याकाळी व्रतकथा ऐकली जाते.



5. आरती व उद्यापन – देवीची आरती करून व्रताची सांगता केली जाते.





---


🌼 धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व


संततीच्या दीर्घायुष्य, आरोग्य व यशासाठी आईची प्रार्थना.


"मातृदेवो भव" या वेदवचनाची अनुभूती.


मातृत्वाचा त्याग, माया व जपण्याची भावना अधोरेखित करणारा दिवस.


महिलांच्या एकत्र येऊन केलेल्या सामूहिक पूजनामुळे सामाजिक ऐक्य वृद्धिंगत होते.




---


🧭 आधुनिक संदर्भ


आज पाश्चात्य पद्धतीने "मदर्स डे" एका दिवसापुरता साजरा होतो. पण आपल्या परंपरेतील पिठोरी अमावस्या हा खरा मातृदिन आहे.

तो केवळ आईवर प्रेम व्यक्त करणारा दिवस नाही, तर आईने मुलांच्या कल्याणासाठी उपवास, प्रार्थना आणि व्रत करणे ही त्याची वैशिष्ट्ये आहेत.



---


🌿 निष्कर्ष


पिठोरी पूजन हा फक्त धार्मिक विधी नसून आईच्या उदात्ततेचे आणि मातृशक्तीच्या सामर्थ्याचे सांस्कृतिक दर्शन आहे. संततीसाठी आई जेव्हा देवीचे स्मरण करून प्रार्थना करते, तेव्हा ती स्वतः देवतेचे रूप धारण करते. म्हणूनच पिठोरी अमावस्या हा दिवस मातृदिन म्हणून भारतीय संस्कृतीत विशेष महत्वाचा ठरतो.



---

ज्योती प्रकाश म्हात्रे

ग्रंथपाल

स्व प्रभाकर पाटील सार्वजनिक वाचनालय

Featured post

Lakshvedhi