Saturday, 23 August 2025

पर्यावरण संवर्धनाचा सुंदर संगम त्यांच्या सृजनशीलतेत दिसून



 श्रीमती विमला यांनी ठाण्याचे मूर्तिकार मंदार सुर्यकांत शिंदे यांच्या कलाकृतींचे विशेष कौतुक करताना म्हटले, “या गणेशमूर्ती अतिशय आकर्षक, सुंदर आणि मनोहारी असून त्यातून परंपरा, कला आणि पर्यावरण संवर्धनाचा सुंदर संगम त्यांच्या सृजनशीलतेत दिसून येतो. त्याचप्रमाणे, “लालबागचा गणपती आणि पुण्याच्या दगडूशेठ हलवाई गणपतीच्या प्रतीकृती पाहून मन प्रसन्न झाले. अशा अप्रतिम कलाकृतींमुळे महाराष्ट्राची समृद्ध परंपरा आणि भक्तीभाव दिल्लीकरांना जवळून अनुभवता येतो,”  अशा भावना व्यक्त केल्या.

पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन

  

पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे निवासी आयुक्त आर. विमला यांचे आवाहन

गणेशमूर्ती विक्री प्रदर्शनाला दिल्लीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

 

नवी दिल्ली, 22 :- महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळ मऱ्हाटी’ महाराष्ट्र एम्पोरियम येथे सुरू असलेल्या गणेशमूर्ती विक्री प्रदर्शनास निवासी आयुक्त तथा सचिव आर. विमला  यांनी भेट देऊन पाहणी केली.

'गणेश उत्सव' हा राज्य उत्सव म्हणून साजरा करण्यात येणार आहे. राजधानी दिल्लीत मराठी तसेच मराठी भाषिक भाविकही मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा करीत असून महाराष्ट्र शासनाच्या लघुउद्योग विकास महामंडळाकडून दरवर्षी पर्यावरणपूरक अशा गणेश मूर्तींचे विक्री प्रदर्शन लावण्यात येते. ही  खुप समाधानाची बाब असल्याचे नमूद करून श्रीमती विमला यांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले.   शाडू मातीच्या गणेशमूर्तीमुळे पर्यावरणाचे संतुलन राखले जाते. निसर्गाशी आपली नाळ घट्ट राहावी यासाठी अशा उपक्रमांना प्रोत्साहन देणे अत्यंत आवश्यक असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले

न्यायिक सेवा स्पर्धा परीक्षेसाठी ‘सीईटी २०२५’ जाहीर

 न्यायिक सेवा स्पर्धा परीक्षेसाठी सीईटी २०२५’ जाहीर

 

मुंबईदि. २२ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थापुणे (बार्टी) यांच्या मार्फत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या न्यायिक सेवा स्पर्धा परीक्षेपूर्व प्रशिक्षणाकरिता सामायिक प्रवेश परीक्षा म्हणजेच सीईटी २०२५’ जाहीर करण्यात आली आहे.

 

यासाठीची जाहिरात २९ जुलै रोजी प्रसिद्ध झाली असून अर्ज प्रक्रिया दि. १ ऑगस्टपासून सुरू झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या २० मे रोजीच्या आदेशानुसार, ‘न्यायिक सेवा सीजे-जेडी’ व जेएमएफसी’ परीक्षेस पात्र होण्यासाठी किमान तीन वर्षांचा कायदेशीर सराव अनिवार्य करण्यात आला आहे.

 

त्यामुळे उमेदवारांनी अर्ज सादर करताना सनद आणि न्यायालयीन सरावाचा दाखला जोडणे आवश्यक आहे. ज्या उमेदवारांनी आधीच ऑनलाईन अर्ज भरले आहेतत्यांनी अर्जाची प्रतसनद आणि अनुभव प्रमाणपत्र २५ ऑगस्टपर्यंत bartijmfc@gmail.com या ईमेलवर सादर करणे बंधनकारक आहे.

 

निर्धारित मुदतीत आवश्यक कागदपत्रे सादर न केल्यास उमेदवाराचा सीईटी २०२५’ साठी विचार केला जाणार नाहीअशी माहिती बार्टी संस्थेकडून देण्यात आली आहे.

पिठोरी पूजा फोटो रवींद्र गायकर,


 

जागतिक कौशल्य स्पर्धा खालील अभ्यासक्रम/क्षेत्राकरिता आयोजित केली जाणार आहे :-

 जागतिक कौशल्य स्पर्धा खालील अभ्यासक्रम/क्षेत्राकरिता आयोजित केली जाणार आहे :-माहितीसाठी उमेदवारांनी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुंबई उपनगर १७५ श्रेयस चेंबर, १ ला मजला, डॉ.डी.एन. रोड, फोर्ट, मुंबई ४०० ००१ येथे प्रत्यक्ष अथवा दूरध्वनी

जागतिक कौशल्य स्पर्धा २०२६ करीता वयोमर्यादा हा एकमेव निकष ठरविण्यात आलेला आहे. या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी ५० क्षेत्रांकरिता उमेदवाराचा जन्म १ जानेवारी२००४ किंवा तद्नंतरचा असणे अनिवार्य आहे. तसेच, Digital Construction, Cloud Computing, Cyber Security, ICT Network Infrastructure, Additive Manufacturing, Industrial Design Technology, Industry ४.०, Mechatronics, Optoelectronic Technology, Robot Systems Integration, Water Technology, Dental Prosthetics, Aircraft Maintenance या क्षेत्राकरिता उमेदवाराचा जन्म १ जानेवारी२००१ किंवा तद्नंतरचा असणे अनिवार्य आहे. त्याअनुषंगाने जागतिक कौशल्य स्पर्धा २०२६ स्पर्धेसाठी निश्चीत करण्यात आलेल्या क्षेत्रांची यादी संकेतस्थळावर  पाहता येईल.

 

तसेच स्पर्धेचे सविस्तर वेळापत्रक नोंदणी केलेल्या उमेदवारांना यथावकाश कळविण्यात येईलतसेच काही अडचणी असल्यास अधिक माहितीसाठी उमेदवारांनी जिल्हा कौशल्य विकासरोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रमुंबई उपनगर १७५ श्रेयस चेंबर१ ला मजलाडॉ.डी.एन. रोडफोर्टमुंबई ४०० ००१ येथे प्रत्यक्ष अथवा दूरध्वनी ०२२-२२६२६४४० यावर संपर्क करावाअसे आवाहन प्रसिद्धीपत्रकाद्वारे करण्यात आले आहे.


जगातील सर्वात मोठी व्यवसायिक शिक्षण आणि कौशल्य उत्कृष्टता स्पर्धा असून जगभरातील २३ वर्षांखालील तरुणांकरिता त्यांच्यातील कौशल्य सादर

 जागतिक कौशल्य स्पर्धा दर दोन वर्षांनी होते आणि ही जगातील सर्वात मोठी व्यवसायिक शिक्षण आणि कौशल्य उत्कृष्टता स्पर्धा असून जगभरातील २३ वर्षांखालील तरुणांकरिता त्यांच्यातील कौशल्य सादर करण्याची ही ऑलिम्पिक खेळासारखीच स्पर्धा आहे. ही स्पर्धा यापूर्वी ४७ जागतिक कौशल्य स्पर्धेमध्ये ६३ सेक्टर मधून ५० देशातील दहा हजारहून जास्त उमेदवार समाविष्ट असून ही स्पर्धा १५ देशात १२ आठवड्यासाठी आयोजित करण्यात आली होती.

शिवकालीन खेळांना प्रोत्साहन देऊन नव्या पिढीपर्यंत

 शिवकालीन खेळांना प्रोत्साहन देऊन नव्या पिढीपर्यंत सांस्कृतिक वारसा पोहोचवण्यासाठी ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव परंपरागत देशी खेळांच्या क्रीडा महाकुंभाचे आयोजन करण्यात आले. परंपरागत खेळांना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून आगामी काळात मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात परंपरागत देशी खेळांचे आयोजन केले जाईल असे कौशल्यरोजगारउद्योजकता व नाविन्यता मंत्री श्री. मंगलप्रभात लोढा यांनी यावेळी सांगितले.

Featured post

Lakshvedhi