पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे निवासी आयुक्त आर. विमला यांचे आवाहन
गणेशमूर्ती विक्री प्रदर्शनाला दिल्लीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
नवी दिल्ली, 22 :- महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळ ‘मऱ्हाटी’ महाराष्ट्र एम्पोरियम येथे सुरू असलेल्या गणेशमूर्ती विक्री प्रदर्शनास निवासी आयुक्त तथा सचिव आर. विमला यांनी भेट देऊन पाहणी केली.
'गणेश उत्सव' हा राज्य उत्सव म्हणून साजरा करण्यात येणार आहे. राजधानी दिल्लीत मराठी तसेच मराठी भाषिक भाविकही मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा करीत असून महाराष्ट्र शासनाच्या लघुउद्योग विकास महामंडळाकडून दरवर्षी पर्यावरणपूरक अशा गणेश मूर्तींचे विक्री प्रदर्शन लावण्यात येते. ही खुप समाधानाची बाब असल्याचे नमूद करून श्रीमती विमला यांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले. शाडू मातीच्या गणेशमूर्तीमुळे पर्यावरणाचे संतुलन राखले जाते. निसर्गाशी आपली नाळ घट्ट राहावी यासाठी अशा उपक्रमांना प्रोत्साहन देणे अत्यंत आवश्यक असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले
No comments:
Post a Comment