Friday, 22 August 2025

राष्ट्रीय व राज्य महिला आयोगाच्यावतीने शक्ती संवादाचे आयोजन

 विकसित महाराष्ट्राच्या उद्दिष्टपूर्तीत महिलांचा सहभाग वाढविणे गरजेचे

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

•          महिलांच्या सहभागाने विकसित महाराष्ट्र २०४७ चे उद्दिष्ट गाठणे शक्य

•       राष्ट्रीय व राज्य महिला आयोगाच्यावतीने शक्ती संवादाचे आयोजन

 

मुंबईदि. २२ : विकसित महाराष्ट्र २०४७ चे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी विकासाच्या प्रक्रियेत महिलांचा सहभाग वाढविणे गरजेचे आहे. शक्ती संवादाच्या माध्यमातून महिला सुरक्षा आणि सक्षमीकरणाबाबत चर्चा आणि विचार मंथन होत असूनयावर सकारात्मक विचार करून महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी धोरणात्मक निर्णय घेणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

राष्ट्रीय महिला आयोग व महाराष्ट्र राज्य महिला आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय शक्ती संवाद कार्यक्रमाचे हॉटेल ट्रायडंट येथे आयोजन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. या कार्यक्रमास विधानपरिषद सभापती प्रा.राम शिंदेविधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकरउपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरेसहकार मंत्री बाळासाहेब पाटीलमहिला व बाल विकास राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकरगृह (ग्रामीण) राज्यमंत्री डॉ.पंकज भोयरराष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकरराज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकरआमदार चित्रा वाघमनीषा चौधरी, विद्या ठाकूर, सदस्य सचिव नंदिनी आव्हाडेसहसचिव राधिका चक्रवर्ती यांच्यासह विविध राज्यातील महिला आयोगाच्या अध्यक्षासहसचिवसदस्य उपस्थित होते. यावेळी पॉश कायद्यासंदर्भातील पुस्त‍िकेचे प्रकाशन करण्यात आले.

मुंबई ते गोवा राष्ट्रीय महामार्गावर गणेशोत्सवादरम्यान जड वाहनांना वाहतूक बंदी

  

मुंबई ते गोवा राष्ट्रीय महामार्गावर गणेशोत्सवादरम्यान

जड वाहनांना वाहतूक बंदी

 

मुंबईदि. 20 : गणेशोत्सवासाठी मुर्तीचे आगमनगौरी गणपती विसर्जनपरतीचा प्रवास आदींसाठी सार्वजनिक हितास्तव मुंबई ते गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वर वजनक्षमता 16 टन किंवा 16 टनापेक्षा जास्त वाहनांना मोटार वाहन अधिनियम 1988 च्या कलम 155 मधील तरतूदीनुसार वाहतूक बंदी करण्यात आली आहे.  गणेशोत्सवाच्या पूर्व तयारीचा प्रवास म्हणून 23 ऑगस्ट रोजी मध्यरात्री 12 वाजेपासून ते 28 ऑगस्ट रोजी रात्री 11 वाजेपर्यंत या कालावधीत जड वाहनांना वाहतूक बंदी असणार आहे. यामध्ये अवजड वाहनेट्रकमल्टीएक्सलट्रेलरलॉरी आदी वाहनांचा समावेश आहे.

तसेच 5 व 7 दिवसांच्या गणपतीचे विसर्जनगौरी गणपती विसर्जन आणि परतीच्या प्रवासासाठी 31 ऑगस्ट आणि 2 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वाजेपासून रात्री 11 वाजेपर्यंतअनंत चतुर्दशी 11 दिवसांचे गणपती विसर्जनपरतीचा प्रवासाकरिता 6 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वाजेपासून ते 7 सप्टेंबर 2025 रोजी रात्री 8 वाजेपर्यंत या कालावधीत जड वाहतूकीस बंदी राहील.

महामार्गावर बंदी असलेल्या कालावधी व्यतिरिक्त उर्वरित कालावधीत ज्यांची वजन क्षमता 16 टन किंवा 16 टनांपेक्षा जास्त आहेअशा वाहनांना 28 ऑगस्ट रोजी रात्री 11 वाजेपासून ते 31 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत, 31 ऑगस्ट रोजी रात्री 11 वाजेपासून ते 2 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत आणि सप्टेंबर रोजी रात्री 11 वाजेपासून ते 6 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत वाहतूकीस परवानगी राहील. तसेच सर्व वाहनांना 7 सप्टेंबर रोजी रात्री 8 वाजेनंतर नियमित वाहतूकीस परवानगी असेल. 

मच्छीमार्केट उभारण्याची प्रक्रिया गतीने पूर्ण करावी

 मच्छीमार्केट उभारण्याची प्रक्रिया गतीने पूर्ण करावी असे सांगून मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे म्हणाले कीनिधी मंजुरीसह इतर सर्व मंजुरी प्रक्रिया नोव्हेंबरपर्यंत पूर्ण कराव्यात. या मार्केटच्या ठिकाणी कोळी भवनकम्युनिटी हॉलही उभारण्यात यावा. तसेच यानंतर पुणे आणि इतर महत्वाच्या शहरांमध्ये मच्छी मार्केट उभारण्याचे प्रस्ताव तयार करावेतअसे निर्देशही श्री. राणे यांनी दिले.

 तळघरासह चार मजले असलेल्या या मार्केटमध्ये वाहन पार्किंगलोडिंगअनलोडिंग डेकसुक्या मासळीचा बाजारबर्फ कारखानाप्रसाधनगृहउच्च दर्जाचे मासळी बाजारकोळी भवनउपाहारगृहशीतगृहप्रशिक्षण हॉल यांचा समावेश असणार आहे.

०००००

मरोळ येथे उभारण्यात येणारे मच्छीमार्केट सुसज्ज आणि सर्वसोयीयुक्त असावे

 मरोळ येथे उभारण्यात येणारे मच्छीमार्केट

सुसज्ज आणि सर्वसोयीयुक्त असावे

- मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

 

मुंबईदि. 20 : मुंबईतील मरोळ येथे उभारण्यात येत असलेले मच्छी मार्केट सर्व सोयींनी युक्त आणि सुसज्ज असावे, असे निर्देश मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिले.

मंत्रालयात मरोळ मच्छी मार्केट विषयी बैठक झाली. यावेळी मत्स्यव्यवसाय विभागाचे सचिव एन रामास्वामीमत्स्यव्यवसाय आयुक्त किशोर तावडे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

चिंचभुवन येथील पर्यायी गावठाणातील नागरी सुविधा मनपाला हंस्तातरण

 जिल्हाधिकारी डॉ. इटनकर यांनी चिंचभुवन येथील पर्यायी गावठाणातील नागरी सुविधा मनपाला हंस्तातरण करण्याबाबत संक्षिप्त माहिती दिली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मनपा आयुक्तांना हस्तांतरण प्रमाणपत्र सुपूर्द करण्यात आले. मिहान इंडिया लिमिटेडकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 50 लाख रूपयांचा धनादेश यावेळी मुख्यमंत्र्यांनी स्वीकारला. मिहान इंडिया लिमिटेडच्या सामाजिक उत्तरदायीत्व निधी (सीएसआर) अंतर्गत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा रूग्णालयला 45 लाख 43 हजार 936 रूपयांचा धनादेशइंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय तथा रूग्णालयाला 30 लाखांचामहानगरपालिकेला 25 लाखांचा तर वुमेन एज्युकेशन सोसायटीला (एलएडी महाविद्यालय) 24 लाख 93 हजारांचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते चिंचभुवन गावठाणातील तयार नागरी सुविधा मनपाला हस्तांतरीत मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी मिहान लि. कडून 50 लाखांचा धनादेश सुपूर्द

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते चिंचभुवन गावठाणातील

तयार नागरी सुविधा मनपाला हस्तांतरीत

  • मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी मिहान लि. कडून 50 लाखांचा धनादेश सुपूर्द
  • सीएसआर फंडातून जीएमसीआयजीएमसीमनपा व एलएडी महाविद्यालयास धनादेश सुपूर्द

 

नागपूरदि. 20 : चिंचभुवन येथील पर्यायी गावठाणातील सेक्टर क्रमांक ३४३५ व ३६ मध्ये तयार करण्यात आलेल्या नागरी सुविधा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागपूर महानगरपालिकेस हस्तांतरीत करण्यात आल्या. तसेच मिहान इंडिया लिमिटेडकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 50 लाखांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.

रामगिरी शासकीय निवासस्थानी एका छोटेखानी कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरी सुविधांचे हस्तांतरण केले. मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरीजिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकरमनपाच्या अतिरिक्त आयुक्त वसुमना पंतशासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा रूग्णालय नागपूरचे अधिष्ठाता डॉ. राज गजभियेइंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय तथा रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रवि चव्हाणमिहान इंडिया लिमिटेडचे वरिष्ठ विमानतळ संचालक एम. ए. आबीद रूही आदी यावेळी उपस्थित होते.

बीडीडीवासियांच्या घरांची स्वप्नपूर्ती वरळी बीडीडी पुनर्विकास प्रकल्पातील इमारतींचे व सदनिकांची मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडून पाहणी

 बीडीडीवासियांच्या घरांची स्वप्नपूर्ती

वरळी बीडीडी पुनर्विकास प्रकल्पातील इमारतींचे व सदनिकांची

मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडून पाहणी

 

वरळीतील बीडीडी चाळीत अनेक पिढ्यांपासून राहणाऱ्या कुटुंबांसाठी आजचा दिवस विशेष ठरला. बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील बांधकाम पूर्ण झालेल्या दोन पुनर्वसन इमारतीतील सदनिकांच्या वाटप कार्यक्रमापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मान्यवरांनी इमारतीची व सदनिकेची पाहणी केली. 

Featured post

Lakshvedhi