कृत्रिम बुद्धीमत्तेबाबत जाणून घेत या क्रांतीत आघाडी घेण्याची ही योग्य वेळ आहे असे नमूद करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, तीच्या प्रत्येक टप्प्यावर या तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांना उपयोग होणार असून त्यांचे जीवन अधिक सुकर होईल. पुण्यात झालेल्या ॲग्री हॅकेथॉनमध्ये कृत्रिम बुद्धीमत्तेवर आधारित उपयुक्त तंत्रज्ञान प्रदर्शित करण्यात आले.
सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Thursday, 21 August 2025
सिम्बायोसिस आर्टिफिशियल इंटेलिजन्स इन्स्टिट्यूट’चे उद्घाटन
‘सिम्बायोसिस आर्टिफिशियल इंटेलिजन्स इन्स्टिट्यूट’चे उद्घाटन
कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात ‘साई’ देशातील यशस्वी आणि पथदर्शक संस्था ठरेल
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पुणे, दि. २० : कृत्रिम बुद्धीमत्तेच्या वेगवान लाटेतही यशस्वी होण्याची क्षमता भारतीयांमध्ये आहे. त्यासाठी हे ज्ञान सामान्यजनांपर्यंत पोहोचविणाऱ्या शैक्षणिक संस्थांची आवश्यकता आहे. सिंम्बायोसिसने यासाठी योग्य वेळी पुढाकार घेतला असून या प्रयत्नात ‘साई’ ही देशातील यशस्वी आणि पथदर्शक संस्था ठरेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ, लवळे येथे सिम्बायोसिस आर्टिफिशियल इंटेलिजन्स इन्स्टिट्यूटच्या (एसएआयआय- साई) उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. सिम्बायोसिस आंतराष्ट्रीय विद्यापीठाचे संस्थापक आणि कुलपती पद्मभूषण डॉ. शां. ब. मुजुमदार, यावेळी सिम्बायोसिसच्या प्रधान संचालक तथा सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या प्र-कुलपती डॉ. विद्या येरवडेकर, कुलगुरू डॉ. रामकृष्णन रमण, ‘एसएआयआय’च्या संचालक प्रा. डॉ. लवलीन गौर आदी उपस्थित होते.
आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी अतिवृष्टीस्थितीचा घेतला आढावा
आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी
अतिवृष्टीस्थितीचा घेतला आढावा
मुंबई, दि. २० :- राज्यात गेल्या तीन चार दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी आज घेतला. आपत्ती व्यवस्थापन मंत्री श्री. महाजन यांनी राज्य आपत्कालीन कार्य केंद्रास भेट देऊन राज्यातील परिस्थितीची माहिती घेतली. यावेळी राज्य आपत्कालीन कार्य केंद्राचे संचालक डॉ.भालचंद्र चव्हाण यांनी राज्यातील हवामानाविषयी अनुषंगिक माहिती दिली. यावेळी आमदार विजय रहांगडाले उपस्थित होते.
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार ज्या जिल्ह्यात रेड अलर्ट, ऑरेंज अलर्ट दिले आहेत, त्या ठिकाणी संभाव्य आपत्तीच्या अनुषंगाने आवश्यक उपाययोजना कराव्यात. नागरिकांना वेळीच दक्षता इशारा देण्यात यावेत. धरणातून सोडण्यात येणाऱ्या विसर्गामुळे नदीच्या पाणी पातळीत होणारी वाढ याबाबत नागरिकांना सूचना देण्यात याव्यात. पुराचे पाणी येणाऱ्या भागातील नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात यावे, अशा सूचना आपत्ती व्यवस्थापन मंत्री श्री. महाजन यांनी दिल्या.
भारतीय हवामान विभागाशी सातत्याने संपर्कात राहून राज्यातील पर्जन्यमांचे अंदाज नागरिकांना वेळेत दिले जावेत. आवश्यक त्या ठिकाणी राज्य व राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची पथके पाठवावीत, अशा सूचनाही आपत्ती व्यवस्थापन मंत्री श्री. महाजन यांनी यावेळी दिल्या.
महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी घेतला विभागाच्या योजनांचा आढावा
महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी
घेतला विभागाच्या योजनांचा आढावा
मुंबई, दि. २० : राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी राबविण्यात येत असलेल्या आदिशक्ती अभियानासह बाल संगोपन, मिशन वात्सल्य आणि मातृ वंदना योजना यांच्या अंमलबजावणीचा सविस्तर आढावा महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी घेतला.
मंत्रालयात आयोजित बैठकीत सचिव डॉ. अनुपकुमार यादव, आयुक्त कैलास पगारे, सहसचिव वी. रा. ठाकूर आदीसह अधिकारी उपस्थित होते.
आदिशक्ती अभियानांतर्गत महिलांच्या आरोग्य समस्या, कुपोषण, बालमृत्यू व मातृमृत्यूचे प्रमाण कमी करणे, लैंगिक व शारीरिक अत्याचारांना प्रतिबंध घालणे तसेच हिंसामुक्त कुटुंब व समाज निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यासाठी राज्यभर ३६ जिल्ह्यांमध्ये व १५० तालुक्यांमध्ये समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. ग्रामस्तरावर समिती गठित करण्याचे काम सुरू असून उर्वरित तालुक्यांमध्ये समित्या तातडीने स्थापन करण्याचे निर्देशही महिला व बाल विकास मंत्री तटकरे यांनी दिले.
कोरोना काळात सुरू झालेल्या एकल महिलांसाठीच्या योजनेची व्याप्ती वाढवून विधवा, परित्यक्ता व एकल महिला यांचा समावेश करण्यात यावा, असे निर्देश तटकरे यांनी यावेळी दिले. बाल संगोपन योजनेसाठी निधी तातडीने उपलब्ध करून देण्यात देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. तसेच मिशन वात्सल्य आणि प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचाही त्यांनी आढावा घेतला.
आयुक्त कैलास पगारे म्हणाले की, मातृ वंदना योजनेअंतर्गत राज्यातील जिल्ह्यांचे शंभर टक्के मॅपिंग पूर्ण झाले असून लाभार्थींना योजनेचा थेट फायदा होणार आहे.
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते ई-पुस्तकांचे प्रकाशन
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते ई-पुस्तकांचे प्रकाशन
महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित (एमकेसीएल) च्या रौप्य महोत्सवी स्थापना दिवसाच्या सकाळच्या सत्रातील कार्यक्रमात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते ‘हायब्रिड फ्युचर ऑफ हायर एज्युकेशन इकोसिस्टीम’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. ‘युनिफाईड क्रेडीट इन्टरफेस’ या ॲपचे लोकार्पणही श्री.पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या ॲपच्या माध्यमातून विद्यार्थ्याने विविध अभ्यासक्रमातून मिळविलेले क्रेडीट त्याच्या पदवीत रुपांतरीत करण्यात सुलभता येणार आहे.
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, महाराष्ट्राच्या डिजीटल साक्षरतेतील मोठी क्रांती एमकेसीएलने केली आहे. डिजीटल ज्ञान ग्रामीण भागापर्यंत पोहोचविण्यासाठी ‘एमकेसीएल’ने नव्या ॲपची माहिती सोप्या सुलभ भाषेत तयार करावी आणि अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावी. डिजीटल ज्ञानाच्या क्षेत्रात नवे संशोधन करून देशाला पुढे नेण्यात ‘एमकेसीएल’ने योगदान द्यावे. समाज साक्षर होत असतांना डिजीटल निरक्षरता दूर करण्यासाठी ‘एमकेसीएल’ने मोबाईल संगणक प्रयोगशाळेसह विशेष प्रयत्न करावे, असे आवाहन त्यांनी केले.
कृत्रिम बुद्धीमत्ता सक्षम ग्रामीण युवक तयार करा -
कृत्रिम बुद्धीमत्ता सक्षम ग्रामीण युवक तयार करा - डॉ.अनिल काकोडकर
डॉ.अनिल काकोडकर म्हणाले, ज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात मोठी उलाढाल होत असतांना व्यावसायिक दृष्टीकोन ठेवून देखील समाज परिवर्तनाचे कार्य करणे शक्य आहे हे महाराष्ट्र ज्ञान मंडळाने दाखवून दिले. देशात आर्थिक आणि तंत्रज्ञान विषयक प्रगती घडवून आणण्यासाठी ज्ञानक्षेत्रात खूप काही करण्यास वाव आहे. येत्या काळात विकसीत राष्ट्र म्हणून पुढे येण्यासाठी सामरिक आणि आर्थिक शक्तीसोबत तात्विक शक्ती मिळणे आवश्यक आहे आणि हे ज्ञानाच्या माध्यमातून शक्य आहे. ‘एमकेसीएल’चे हेच उद्दीष्ट असायला हवे.
Wednesday, 20 August 2025
गव्हर्नन्सकडून एआय गव्हर्नन्सकडे वळतांना ‘एमकेसीएल’चे
-गव्हर्नन्सकडून एआय गव्हर्नन्सकडे वळतांना ‘एमकेसीएल’चे सहकार्य आणि सहभाग अपेक्षित आहे. विकसीत महाराष्ट्र घडविण्यासाठी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगत संशोधन संस्था उभारण्यात ‘एमकेसीएल’बरोबर माहिती तंत्रज्ञान विभाग कार्य करेल आणि त्यासाठी आवश्यक सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
Featured post
-
एक सुट्टी घ्या ... लोक सुट्ट्या का घेत नाहीत याची कारणे काय असावीत बरे...? एक म्हणजे सुट्टी घेणारा माणूस हा गृहपाठ चुकवणाऱ्या मुला प्र...
-
मा. लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत रस्ते, गटारे व अन्य मुलभूत सुविधांच्या कामांबाबत. महाराष्ट्र शासन ग्राम ...
-
गुडघे दुखी / ढोपर दुखी कारणे - व्यायामाचा अभाव , वाढलेले जास्त वजन , बद्धकोष्ठता , थंड पाणी / पेय उभ्याउभ्याने ...