Thursday, 21 August 2025

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते ई-पुस्तकांचे प्रकाशन

 उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते ई-पुस्तकांचे प्रकाशन

महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित (एमकेसीएल) च्या रौप्य महोत्सवी स्थापना दिवसाच्या सकाळच्या सत्रातील  कार्यक्रमात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते हायब्रिड फ्युचर ऑफ हायर एज्युकेशन इकोसिस्टीम’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. युनिफाईड क्रेडीट इन्टरफेस’ या ॲपचे लोकार्पणही श्री.पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या ॲपच्या माध्यमातून विद्यार्थ्याने विविध अभ्यासक्रमातून मिळविलेले क्रेडीट त्याच्या पदवीत रुपांतरीत करण्यात सुलभता येणार आहे.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील म्हणालेमहाराष्ट्राच्या डिजीटल साक्षरतेतील मोठी क्रांती एमकेसीएलने केली आहे. डिजीटल ज्ञान ग्रामीण भागापर्यंत पोहोचविण्यासाठी ‘एमकेसीएल’ने नव्या ॲपची माहिती सोप्या सुलभ भाषेत तयार करावी आणि अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावी. डिजीटल ज्ञानाच्या क्षेत्रात नवे संशोधन करून देशाला पुढे नेण्यात ‘एमकेसीएल’ने योगदान द्यावे. समाज साक्षर होत असतांना डिजीटल निरक्षरता दूर करण्यासाठी ‘एमकेसीएल’ने मोबाईल संगणक प्रयोगशाळेसह विशेष प्रयत्न करावे,  असे आवाहन त्यांनी केले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi