Wednesday, 20 August 2025

पायाभूत सुविधांच्या महत्वाच्या प्रकल्पांमुळे महाराष्ट्राच्या विकासाला गती

 पायाभूत सुविधांच्या महत्वाच्या प्रकल्पांमुळे महाराष्ट्राच्या विकासाला गती

                                                                                                – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

·         पुणे–लोणावळा उपनगरीय रेल्वे मार्गावर तिसरी व चौथी मार्गिका

·         एमयूटीपी अंतर्गत मुंबईसाठी नवीन 268 एसी रेल्वे गाड्यांची खरेदी

·         ठाणे ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळदरम्यान एलिव्हेटेड रोड

·         मेट्रो मार्गिका 11 या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला हिरवा कंदील

·         नागपुरात नवनगर तयार करण्यास मान्यता

मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांची राज्य आपत्कालीन कार्य केंद्राला भेट

 मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांची

राज्य आपत्कालीन कार्य केंद्राला भेट

अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा घेतला आढावा

 

मुंबईदि. 20 : राज्यात अनेक ठिकाणी सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी मंत्रालयातील राज्य आपत्कालीन कार्य केंद्राला भेट देऊन अतिवृष्टीमुळे राज्यात उद्भवलेल्या परिस्थितीचा नुकताच आढावा घेतला.

मदत व पुनर्वसन मंत्री श्री. जाधव-पाटील यांनी या भेटी वेळी राज्यात अतिवृष्टीमुळे निर्माण परिस्थितीची माहिती घेऊन पावसामुळे उद्भवलेली पूरस्थितीवाहतुकीतील अडथळेपिकांचे नुकसान आणि आपत्कालीन सेवांच्या कार्यवाहीची माहिती  घेतली. आवश्यक तेथे राज्य आपत्ती प्रतिसादात दल व राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची पथके पाठवावीत अशा सूचना त्यांनी दिल्या.

अतिवृष्टीमुळे नदीकाठच्या लोकांचे स्थलांतर सुरक्षितस्थळी करावे. या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तात्काळ उपाययोजना कराव्यात. यासाठी प्रशासनाने वेगाने कारवाई करावीआशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

पावसामुळे बाधित होणाऱ्या शेत पिकांचे तातडीने पंचनामे करावेतअतिवृष्टी काळात विशेषतः नद्याधरणे व पाणीपातळीवर सतत लक्ष ठेवून आवश्यकतेनुसार प्रतिबंधात्मक उपाययोजना करून हवामान विभागाशी सतत संपर्क साधून येणाऱ्या पावसाचा अंदाज जनतेपर्यंत वेळीच  पोहचवण्यात याव्यात असेही मदत व पुनर्वसन मंत्री श्री. जाधव-पाटील यांनी सांगितले.

राज्य आपत्कालीन कार्य केंद्राचे संचालक डॉ. भालचंद्र चव्हाण यांनी अतिवृष्टीमुळे निर्माण झालेली परिस्थितीमदत व बचाव कार्य या विषयी माहिती दिली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून मंत्रालयातील आपत्कालीन कार्य केंद्रातून राज्यातील पूर परिस्थितीचा आढावा

 उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून मंत्रालयातील

आपत्कालीन कार्य केंद्रातून राज्यातील पूर परिस्थितीचा आढावा

 

        मुंबई दि. 20 : राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयातील राज्य आपत्कालीन कार्य केंद्रास भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी नियंत्रण कक्षातील अधिकाऱ्यांकडून मुंबई शहर व उपनगरठाणेपालघररायगडरत्नागिरीसिंधुदुर्ग तसेच राज्यातील पावसाने प्रभावित झालेल्या इतर भागातील परिस्थितीची सविस्तर माहिती घेतली.

   हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार येत्या काही दिवसांत पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता असल्याने जिल्हा प्रशासनआपत्ती व्यवस्थापन यंत्रणा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांनी सतर्क रहावे. पूरस्थिती किंवा भूस्खलनामुळे धोक्यातील नागरिकांना तातडीने सुरक्षित स्थळी स्थलांतरित करावेबचाव व मदत कार्यासाठी एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या पथकांना सज्ज ठेवावेअशा सूचना त्यांनी दिल्या.

पावसामुळे शेतपिकेघरांची हानी किंवा इतर नुकसानाचे तत्काळ पंचनामे करून अहवाल शासनाकडे सादर करावे. तसेच रुग्णालयेशाळानिवारा केंद्रेरस्तेपूलवीज व पाणीपुरवठा यासारख्या आवश्यक सेवा खंडित होऊ नयेतयासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावेअसे निर्देशही उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी यावेळी दिले.

टाटा मेमोरिअल सेंटरच्या रायगड मधील तांबटी खालापूर कर्करोग संशोधन केंद्र pl share

 टाटा मेमोरिअल सेंटरच्या रायगड मधील कर्करोग संशोधन केंद्राच्या

रुग्णालयासाठी मुद्रांक शुल्कात सवलत

 

टाटा मेमोरिअल सेंटर एकात्मिक आयुर्वेदिक कर्करोग दवाखाना आणि संशोधन केंद्राच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यात तांबाटी (ता. खालापूर) येथे शंभर खाटांचे रुग्णालय उभारणार आहे. या रुग्णालयासाठी दिलेल्या १० हेक्टर जमिनीच्या भाडेपट्टा करारवरील मुद्रांक शुल्कात सवलत देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.  बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

            राज्य शासनाने हे शंभर खाटांचे रुग्णालय उभारण्यासाठी तांबाटी ( ता.खालापूरजि.रायगड) येथील दहा हेक्टर जमीन एक रूपया प्रतिवर्षी या नाममात्र दराने दिली आहे. या जमिनीच्या करारनाम्यावरील मुद्रांक शुल्कात सवलत मिळावी अशी विनंती टाटा मेमोरिअल संस्थेने केली होती. या रुग्णालयामुळे रायगड जिल्ह्यातील ग्रामीण भागासहलगतच्या शहरातील नागरिकांना कर्करोगा संदर्भातील उपचार व आरोग्य सुविधा उपलब्ध होणार आहेत. रुग्णालयातील १०० खाटांपैकी १२ टक्के खाटा समाजातील गरीबदारिद्र्यरेषेखालील कुटुंबशासकीय कर्मचारी या घटातील रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात याव्यात. तसेच शासकीय योजनेनुसार कर्करोगावर सवलतीच्या दरात उपचार उपलब्ध करून द्यावेत. रुग्णासोबतच्या एका व्यक्तीस अत्यल्प दरामध्ये रहिवासी सेवा उपलब्ध करुन देण्यात यावीअशा अटींसह या रुग्णालयाला मुद्रांक शुल्कात सवलत देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजूरी देण्यात आली.   

ग्रामीण भागातील तरुणांनाही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्यासाठी प्रोत्साहन मिळणार

 राज्यात तालुका स्तरावरील तीन दिवसीय क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील तरुणांनाही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्यासाठी प्रोत्साहन  मिळणार असल्याचा विश्वास क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांनी यावेळी व्यक्त केला.

केंद्रीय क्रीडा मंत्री मांडवीय यांनी सांगितले कीदेशात मजबूत स्पोर्ट्स इको सिस्टम निर्माण करून 2036 मध्ये ऑलिंपिकचे यशस्वी आयोजन हे शासनाचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी ग्रामीण भागातील खेळाडूंपर्यंत पोहोचणेत्यांना संधी उपलब्ध करून देणे आणि त्यांना प्रोत्साहन देणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या क्रीडा महोत्सवात जिल्हाविद्यापीठमहाविद्यालय व स्टेडियम स्तरावर विविध क्रीडा प्रकारांचे आयोजन केले जाणार आहे.  यामध्ये क्रीडा स्पर्धावादविवाद व चर्चासत्रेतज्ज्ञ आणि क्रीडा क्षेत्रातील सेलिब्रिटींचा सहभाग असणार आहे. योगबुद्धिबळासारख्या मानसिक खेळांना प्रोत्साहन देण्यात येणार असून३१ ऑगस्ट रोजी सांगता समारोपादिवशी सायकलिंग उपक्रम  देशभर घेण्यात येणार आहे.

खेळ ही केवळ मैदानी मर्यादा नसून आरोग्यफिटनेस आणि राष्ट्रीय एकतेचे प्रतीक आहे. प्रत्येकाने मैदानी खेळयोगा किंवा सायकलिंगमध्ये सहभाग घेऊन फिट इंडिया चळवळीत योगदान द्यावे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची विकसित भारत’ ही संकल्पना साकारण्यासाठी क्रीडा क्षेत्राची मोठी भूमिका आहेअसे केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांनी अधोरेखित केले.

00000

मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त देशभर क्रीडा महोत्सव

 मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त देशभर क्रीडा महोत्सव

-         केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा मंत्री डॉ. मनसूख मांडवीय

क्रीडा महोत्सवाच्या आयोजनातून  खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्यासाठी प्रोत्साहन

-         क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे

मुंबई 19 : पद्मभूषण मेजर ध्यानचंद सिंह यांच्या जयंतीनिमित्त 29 ते 31 ऑगस्ट दरम्यान देशभर राष्ट्रीय क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.  राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा भावना आणि ऐक्याच्या या उत्सवात प्रत्येक नागरिकाने किमान एक तास खेळासाठी द्यावाअसे आवाहन  केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा  मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी केले आहे.

या क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून देशात क्रीडा परिसंस्था उभारण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.  युवक कल्याण व क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या क्रीडा महोत्सवाच्या आयोजनाबाबत दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीचे आयोजन करण्यात आले.  यावेळी मंत्रालयातून क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटेउपसचिव श्री. सुनील पांढरे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. तसेच विविध राज्यांचे क्रीडा मंत्री आणि सचिव दूरदृश्य प्रणालीद्वारे  उपस्थित होते.

ठाणेकर आणि नवी मुंबईकरांसाठीही महत्त्वाची पायाभूत सुविधा उभारणीचा

 ठाणेकर आणि नवी मुंबईकरांसाठीही महत्त्वाची पायाभूत सुविधा उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे. ठाणे ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळादरम्यान 25 किलोमीटर लांबीचा एलिव्हेटेड रोड उभारण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे ठाणेनवी मुंबई आणि मधल्या औद्योगिक क्षेत्रांना वेगवान व समर्पित दळणवळण मार्ग उपलब्ध होणार आहे.

Featured post

Lakshvedhi